गांव

Submitted by दर्शन जोशी on 25 December, 2019 - 20:49

आता कुठे हरवला
डोंगरातला गाव माझा ?
शेतीवाडी गावकरी अन्
वावरातला गाव माझा

केव्हा आटून गेले
येथील थंडगार पाणी
जेथे बायलेकरांची
चालतात गप्पागाणी

साखरेहून मधुर असा
चहा हरवला कोठे
वडपिंपळाच्या पारावरची
माणसे करवली कोठे

नाहीच आज कोणी
क्षेमकुशल विचारणारा
शुभकार्यास उरला नाही
जेवणास जेवणारा

गावगावाहून जो तो
शहरास येत आहे
घर कौलारु म्हणते मजला
अरे खुळ्या ! मी इथेच आहे.

दर्शन जोशी
संगमनेर
७०५७४४९३१४

Group content visibility: 
Use group defaults