स्वप्न - ४

Submitted by 1987 on 23 December, 2019 - 19:40

दुसऱ्या दिवशी जाग लवकरच आली. रविवार असल्याने तयारी करायची घाई नव्हती. आई किचन मधे काम करीत होती. बहुतेक पोह्याची तयारी. रविवार होता ना. भाऊ मस्त घोरत होता.
उठून ब्रश केल. तोंड धुतल. फ्रेश होऊन पेपर हातात घेतलं. मेघनाची हि जुनी सवय. टीव्ही वर बातम्या बघण्यापेक्षा तिला पेपर वाचायला आवडे. पहिल्याच पानावर मॉल मधल्या आगीची बातमी. परत डोक्यात विचार सुरू. इतका मोठा योगायोग कसं असू शकतो? पण सायन्स बॅकग्राऊंड असल्याने स्वप्नावर विश्वास ठेवणं तिला पटत नव्हतं. जास्त विचार नाही करायचा असं लॉजिकल ठरऊन ती कमाल लागली. रविवारी वेळ आहे तर थोडा घर लावावा असं तीने ठरवलेल. आंघोळी आधी ते आटपू असा विचार करून ती कमाला लागली. दोनीही कपाट साफ झाली तस तिला थोड बर वाटल.
संध्याकाळी सोसायटीची मीटिंग होती. दुपारी जेवताना आईने विषय काढला. बिल्डिंग रिपेर्स साठी प्रत्येक घरमागे वीस हजार भरायचे होते. पैशाची जमवाजमव आजून झाली नव्हती म्हणून आई नाही जायच म्हणत होती. मेघना हसून म्हणाली “जा बिनधास्त. नाही पैसे मागणार कोणी. उलट देतील तुला. घ्यायचे की नाही ते तू ठरव म्हणतील.” आता हसायची वेळ आईची होती. “भविष्य वगैरे बघायला लागलीस की काय” आईच्या प्रश्नावर मेघना गालातल्या गालात हसली. “तू जात नाहीस म्हणून मला जाव लागतय. कधीतरी तू पण जात जा जरा ” इतका बोलून आईने पण विषय संपवला.
दुपारी एक मस्त झोप काढली. आई बहुदा मीटिंग ल गेलेली. संध्याकाळी थोडा बाहेर फेरफटका मारून यावा असं वाटल. नाहीतर नेहेमीच्या सीक्रेट ठिकाणी मित्राला भेटावा का असं सुध्धा विचार मनात येऊन गेला. पण आत्ता उठून जायची जराही इच्छा नव्हती. तीने मग मोर्चा टीव्ही कडे वळवला. एखादा छानसा मूवी बघवा म्हणून रीमोट हातात घेतला. एक पूर्वी पाहिलेलाच् मूवी ती परत बघायला लागली.
अर्धा पाऊण तास जल असेल, तितक्यात आई आली. येऊन मेघनाच्या बाजूलाच बसली. “तुझी जीभ दाखव” आई म्हणाली. मेघनाने पटकन पूर्ण जीभ बाहेर काढली. चापटी मारत आई म्हणाली “जीभ तर काळी नाही आहे तरी बोललेल कहर होतंय” “काय झाला” मेघनाचा आईला प्रश्न. “अग तू म्हणालीस तसंच झालाय. आपली ईमारत रिडीवेलपमेंटला जायचं नक्की झाल. बिल्डर हो म्हणाला आज सकाळीच. आता कसलाही रिपेर्स फंड वगैरे जमवायची गरज नाही. उलट जागा विकायची असेल तर मार्केटच्या पेक्षा पाच दहा लाख जास्तच देईल म्हणाले. तूला कोणी संगीतलेल ग आधीच?” “देवाने“ मेघना हसून म्हणाली. “देव पावला म्हणायचा तुला” आई पण हसत म्हणाली आणी किचन मधे गेली जेवणाला सुरवात करायला.

आता मात्र मेघनाला खात्री पटायला लागलेली. काहीतरी वेगळा घडतय याची जाणीव तर तिला काल पासूनच व्हायला लागली होती. पण अशा गोष्टींची शंभर टक्के खात्री कशी देणार? माधुशी शेअर करूया असं विचार डोक्यात येऊन गेला. पण ती तरी कसा विश्वास ठेवणार. मग तिनेच ठरवलं, कुणाशीच शेअर नाही करायच. बघू काय होतं ते. तस तर तिलाच नक्की कळत नव्हतं काय होत होतं ते. स्वप्न खर होत होतं की निव्वळ योगायोग. योगायोग असेल तर तो इतकेवेळा होऊ शकतो क? आणी दर वेळी आपल्यालाच असं का वाटावं? कोणत्याच प्रश्नाची उत्तर तिच्याकडे नव्हती.

आईने जेवायला बोलावत तेव्हा तिची विचारांची तंद्री भंगली. जेवण आटपली. अंथरूण पडली. पण डोक्यातल्या विचारांचं काहूर काही कमी होईना. शेवटी तीने ठरवलं, उद्या माधुशी बोलायचं. तिचा विश्वास बसण कठीण आहे. पण आपण सांगायचं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१९८७... अहो येवढं मस्त पोटेंशियल चे कथानक आहे, जरा मोठे भाग टाका की हो Wink