अनपेक्षित भाग-१

Submitted by मी मधुरा on 22 December, 2019 - 11:40

पडकं गॅरेज. रात्रीची वेळ. टेबलावरच्या दिव्याचा तेवढा प्रकाश होता. तावडे वाट पाहत बसला होता. समोरून एक आकृती आली. मध्यम उंची. टेबलावर त्या व्यक्तीने हातातली बॅग खाली केली.

"हे घे. चार आहेत पुर्ण."
तावडेने नजर फिरवली. टेबलावर कोऱ्या-करकरीत नोटांच्या काही गड्ड्या पडल्या होत्या. इतके पैसे?
"काम काये?"
समोर एक फोटो सरकावण्यात आला.
"टपकवायचाय?"
"नाही."
"मग?"
"याच्याकडे एक फाईल आहे. निळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवतो तो."
तो हसला. "मी काय भुरटा चोर वाटलो का काय हे असलं फाईल वगैरे चोरायला?"
"काम करणार आहेस की नाही?" समोरून प्रश्न आदळला. त्याने पैश्यांकडे बघत सिगारेट पेटवली.
"डु यु माईंड इफ.....?"
मान नकारार्थी हलली. ग्रीन सिग्नल मिळाला आणि त्याने दोन झुरक्या मारल्या.
"पुढे बोला....."
"उद्या ११ वाजता वेस्टर्न मॉलच्या कॉफी शॉप मध्ये असणार आहे हा. तिथे एक जण ह्याला भेटायला येईल. हा त्याला फाईल दाखवेल आणि एक चावी घेईल."
"नक्की चोरायचंय काय? फाईल की चावी?" तोंडातून धूर सोडत त्याने विचारले.
"दोन्ही." एवढ्याशा कामाचे ४ लाख? काम महत्वाचे दिसते आहे.
"डबल चार्ज लागेल." त्याने पत्ता फेकला.
क्षणाचाही विलंब न लावता मान होकारार्थी हलली. "पण काम झाल्यावर."
"ठिक."
"चावी आणि फाईल मिळाली की तो पिझ्झा शॉपला जाईल. तो तिथे पोचेल त्यावेळी त्याच्या कडे ती फाईल आणि चावी नसली पाहिजे, ही तुझी जबाबदारी."
"काम झालंच म्हणून समजा."
"तरीही पैसे काम झाल्यावरच मिळतील. कौशिक अजहिरे नावाचे फेक बॅंक अकाउंट आहे. त्यात जमा होतील उरलेले पैसे. हे त्याचे चेकबुक आणि ही त्याची सही. पैसे काढलेस की अकाउंट बंद करायचे."
"आणि ती लूट? कुरियर करायची?" त्याच्या विनोदावर तो एकटाच हसला. मग गप्प झाला.
"जाळून टाक."
"काय?"
"बरोबर ऐकलंस तू."
"पण....."
बुटांचा टॉक-टॉक आवाज त्या गॅरेजच्या पोकळीत भरून राहिला.
साला, हे कसलं नवं झेंगाट? एकतर नविन कस्टंबर. चेहऱ्यावर बुरखा घालून आलं. आवाज पण घोगरा, विचित्र. जाणूनबुजून बदलल्या सारखा. कामही हलक्या दर्जाचं.
पण किंमत भक्कम! नेहमीप्रमाणे खून वगैरे असता तर सोबत त्या गोट्याला पण एंकाऊंटर च्या नावाखाली उडवता आला असता. त्याचं ते फडतूस न्याहारी सेंटर तरी बंद पडलं असतं.
आता काय हात चलाखीची कामं करायची?
ह्या अश्या कामांनी आपलं करियर अप चाल्लय का डाऊन तेच कळना झालंय.
त्याने नोटा हातात उचलल्या. नाकाजवळ धरल्या. आत्ताच छापखान्यातून बाहेर काढल्यात असं वाटत होतं.
एवढ्या पैशात ४ जण मरतात एरवी. इथे फक्त चोरी करायचीय..... वर लूट पण जाळायचीय. कागदपत्र बदलायला नकोत. हाताखालच्याला न् वरच्याला हिस्सा पण द्यायला नको. काम झाल्यावर अजून पैसे. तयारीनेच आलं होतं वाट्टं क्लाईंन्ट. फेक बॅंक अकाउंट वगैरे सगळं तयार. वैसे..... ये सौदा तो फायदेमंद रहा|
________

क्रमश:

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Cuty.

रत्न, युगांतरचे एकूण ४५ भाग इथे पोस्ट केलेले आहेत. ते आता वाचू शकता तुम्ही. कारण पुढचे भाग इथे उपलब्ध नाहीत. युगांतरचे एकूण १०० हून जास्त भाग होतील, म्हणून त्याचे पुस्तक बनवण्याचे ठरवले आहे. Happy

Happy 45 भाग वाचूनच आलोय इथे

पुस्तक बनले की मला सांगा..
एक दोन ओळखीचे लोकही वाचत होते

लेखमालीका आवडली..!

सदर लेखिका नकारात्मक प्रतिक्रिया सहन करून घेत नाहीत. दुर्लक्ष करून अनुल्लेखाने अपमान करण्यात येईल. त्यामुळे कृपया नकारात्मक प्रतिसाद खरडण्याचे कष्ट घेऊ नयेत; त्या ऐवजी या लेखिकेच्या धाग्यावर न येण्याचा आणि आलातंच तर प्रतिसाद न देण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करावा.
>> मुर्ख लेखिकेला मायबोलीवरुन हाकलून दिले जावे. फालतू लिखाणाला छान छान कोणी कसं बोलेल?

पावसाळी कुत्र्याच्या छत्री सारखे मायबोलीवरचे हे लेख कधी उगवतात आणि गायब होतात तेच हल्ली कळेना झालंय राव Proud

पावसाळी कुत्र्याच्या छत्री सारखे मायबोलीवरचे हे लेख कधी उगवतात आणि गायब होतात तेच हल्ली कळेना झालंय राव
नवीन Submitted by भिकाजी on 26 December, 2
+१००१

हायला मला तर कथा दिसतेय! जबराट, भन्नाट!!!!
मधुराजी, तुमच्या या डोक्याला शॉट लावणाऱ्या कथा मला नेहमी आवडतात. हीदेखील वेगळीच भन्नाट कथा दिसतेय... पुढील भागाच्या आवर्जून प्रतीक्षेत.
(छोटे भाग टाकायची माझी सवय तुम्हालाही जडली वाटतं. Lol
बादवे तुमचं डिस्क्लेमर मला दिसत नाहीये, ते टाकलं तर बरं होईल. (इथे बऱ्याच जणांना गरज आहे त्याची) Rofl

हायला Lol
होय की Biggrin आता कथा उगवली तर ते डिस्क्लेमर गायब ... अमानवीय धागा वाटू लागलाय आता तर

छान सुरुवात
पुढील भागाच्या प्रतिक्षेत .