सनकी भाग १

Submitted by Swamini Chougule on 21 December, 2019 - 23:17

एक साधारण सत्तावीस -अठ्ठावीस वर्षांची मुलगी मलबार हिलमधील एका पॉश इमारती मध्ये असलेल्या साठाव्या मजल्यावर म्हणजे अगदी इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर लिफ्टने गेली . ती काया फॅशन हाऊस मध्ये शिरली .ती रागाने धुमसत होती.तिच्या हातात कसली तरी ब्याग होती .ती पाय आपटत त्या ऑफिसमध्ये गेली व एका तीस वर्षांच्या तरुणाच्या कॅबिनमध्ये घुसली. तिने बॅगेतुन एक ड्रेस काढला व त्या मुलाच्या अंगावर फेकला; तो मुलगा कामात व्यस्त होता .त्या मुळे तो दचकून उभा राहिला तशी ती मुलगी मोठं- मोठ्याने बोलू लागली.
मुलगी ,“ काय हीच का तुमची सर्व्हिस?” तणतणत बोलली.
मुलगा ,“काय झाले मॅडम?”
मुलगी ,“ हा माझा वेडिंग गाऊन तीन महिने अगोदर ओर्डर दिली होती .जो आज मिळाला .तो मला खूप टाईट होतोय .या साठी तुम्ही माझ्या कडून पाच लाख घेतलेत ना ?मग मुंबईतले सगळ्यात नावाजलेले फॅशन हाऊस आहे म्हणून इथे आले पण नाव मोठे आणि लक्षण खोटे ! दोन दिवसांनी माझं लग्न आहे हे नीट करून द्या आता ”असं ती रागाने तणतणत बोलत होती .
सगळा स्टाफ काम सोडून तिकडेच पाहत होता पण कोणाची हिम्मत नव्हती तिथे जाण्याची.हा सगळा गोंधळ एक तीस वर्षांची मुलगी तिच्या केबिन मधुन पाहत होती. ती तिच्या केबिन मधून बाहेर आली आणि त्या तरुणाच्या केबिनमध्ये गेली.ती केबिनमधून निघताच सगळा स्टाफ उठून उभा राहिला. ती केबिनच दार उघडून आत गेली.तिला पाहून तो तरुण एसी मध्ये ही घामाने भिजला.
तरुण,“मॅम तुम्ही कशाला तसदी घेतलीत. मी पाहतो”तो चाचरत बोलला. त्याला हातानेच बोलण्याचे थांबवून.ती टेबला जवळ गेली फोन करून एका मुलीला कसलीशी फाईल घेऊन बोलावले; ती मुलगी फाईल घेऊन आली.तिने फाईल उघडली आणि बोलली,
ती,“तुमचे नाव काय आहे?”
मुलगी ,“सारा जैन ”जरा झटक्यातच बोलली
ती, “ age- 28,
Chest -41” ¼=10.25”
Waist- 40” ¼=10”
Shoulder-14” ½=7”
Length -58”. 58-16=42
Waist length -16”
Weight – 60
Am I right मिस सारा ” चेहऱ्यावरची एक ही रेष न हलू देता,तिने विचारले
सारा,“yes you are right पण ड्रेससाठी वजन कशाला घेतले होते ते नाही कळले मला” सारा बोलली.
ती ,“ तुम्ही अजून एकदा वजन करा या वजन काट्यावर उभं राहा प्लिज”
सारा ,“ व्हॉट द हेल इट इज?”अस ती तणतणत बोलली.
ती,“प्लिज”
सारा, “ओके ”अस म्हणून ती काट्यावर उभारली .
ती ,“63 किलो; तुमचं वजन तीन महिन्यात वाढलाय मग ड्रेस टाईट होईल नाही तर काय? वरून तुम्ही आम्हाला म्हणताय आमची चूक आहे ? ” हे बोलताना तिचा आवाज चढला होता
सारा हे सगळं पाहून जरा वरमली आणि म्हणाली
सारा,“ मॅम माझा गाऊन तेव्हढा नीट करून द्या प्लिज इट्स रिक्वेस्ट!”ती थोडी शांत झाली कारण चूक तिची आहे ते तिच्या लक्षात आले.
तिने गाऊन घेतला .तो उघडला व त्यावर तिने टेबलावर ठेवलेली कॉफी ओतली.
सारा,“ हे काय करतेस तू ;पाच लाखाचा ड्रेस आहे तो; त्याचे पैसे मी तुला आधीच दिलेत .”अस सारा ओरडली .
ती ,“शूssss ! ओरडू नकोस सुधीर या मुलीला पाच लाख रुपयांचा चेक दे आणि हकल; हा गाऊन खाली सिग्नलवर भीक मागतेय ना ती बाई तिला देऊन टाक”
अस म्हणून ती तिथून निघाली सारा व तरुण म्हणजे सुधीर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आ वासून पाहतच राहिले.
ती तीस वर्षांची मुलगी जी काया फॅशन हाऊसची मालकीण काया जयसिंग होती.तीन -चार वर्षांच्या छोट्या कालावधीतच फॅशन इंडस्ट्रीत एक ब्रॅण्ड एक मोठं नाव बनली होती.पण ती कोणाला भेटत नसे ,कोणाशी बोलत नसे ,ऑफिसमध्ये ही क्वचितच येत असे सगळं काम ती घरूनच करत असे तिच्या असिस्टंट सुधीर मार्फत. ती सगळ्यासाठी एक गूढ होती.ज्या लोकांना ती भेटे ते तिला सनकी म्हणत.
क्रमशः

(जर शुद्ध लेखनाची चूक असेल तर सांगा आणि कथेचा पहिला भाग कसा वाटला? ,जमला का?तेही सांगा ही विनंती)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली सुरुवात..
फक्त "मिस्स सारा" ऐवजी
मिस सारा.
“ओक ” : ओके
मार्फद : मार्फत
पुर्ण विराम वाक्याच्या शेवटी लगेच द्या. स्पेस नको.

श्रीदेवी,अनिल कपूरचा तो चित्रपट आठवला ज्यात श्रीदेवी अशीच सनकी दाखवलीय. बहुतेक ' लाडला' असावा.

"सारा, तू काय करतेस "असं सारा ओरडली :हे सारा ओरडली की सुधीर? ते जरा बघा.
बडे अच्छे लगते हैंं मध्ये राम कपूर ची धाकटी बहीण अशीच फॅशन स्टुडिओ ची मालकीण व सटक दाखवली होती.

@जावेद खान
धन्यवाद पुढचा भाग लवकरच
@प्राचीन
सारा,“ हे काय करतेस तू अस ”सारा ओरडते कायाला
आणि माझी काया जयसिंग आणि बडे अच्छे लागते है मधली राम कपूरची बहीण या दोघीत खूप अंतर आहे हे पुढं कळेलच ,अहो सध्या सुरू असलेल्या कुंकूम भाग्य मध्ये ही अभिची बहीण सनकीच आहे
Wink
धन्यवाद प्राचीन

बेहद सिरीयल मधल्या माया सारखी वाटली कथेतील तरुणी..

भविष्यात ती सुधीरला लाईक करायला लागली तर सेम बेहद सारखी स्टोरी होईल
Biggrin Biggrin Biggrin

आणि
ब्याग - बॅग

पुलेशु

@नौटंकी
@shitalkrishna
@punekarp
धन्यवाद, पुढील भाग लवकरच कदाचित आज
Happy

@कविता९८
आत्ताच गेस नको; कारण काया ही मायाच्या जवळपास जाणारी असली तरी ती माया पेक्षा खूप वेगळी आहे वाचत राहा लक्षात येईल ,धन्यवाद

शिर्षकात भाग एक असे काहीतरी टाका जेणॅकरुन आधीच कळेल की क्रमश: आहे.
म्हणजे माझ्या सारखे अजुन कोणी असेल जे क्रमश: कथा वाचत नाही त्यांचा वेळ वाचेल.

@ अज्ञानी
धन्यवाद
@सस्मित ताई
सारा नंतर कॉमा आणि त्या नंतर “.....” अस आहे ते म्हणजे सारा ओरडली

(जर शुद्ध लेखनाची चूक असेल तर सांगा आणि कथेचा पहिला भाग कसा वाटला? ,जमला का?तेही सांगा ही विनंती)
>>>>>>>>>>>>>>>>> ती केबिनमधून निघताच सगळा स्टाफ उठून उभारला

पुर्ण विराम वाक्याच्या शेवटी लगेच द्या. स्पेस नको. >>>> पण पूर्णविरामानंतर नवीन वाक्य चालु करण्याआधी एक स्पेस नक्की द्या. कथा चांगली असली तरी व्याकरण, शुद्धलेखन आणि punctuation मुळे बऱ्याचदा वाचताना वैताग येतो. तुम्ही लिहिता चांगलं, पण सुरुवातीच्या attitude मुळे या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष जास्तच जातं. माझं तरी.
सुरुवात चांगली आहे . वाचते आहे. पुलेशु.

उभारला - उभा राहिला
ब्याग - बॅग

@मीरा
प्रथम तर धन्यवाद ,प्रतिसाद दिला त्या बद्दल
ब्यागच -बॅग केलं
उभारला - उभा राहिला अस केलं ( पण जरा शॉर्टकट म्हणून उभारला अस लिहल होत ते असो)
Happy

( पण जरा शॉर्टकट म्हणून उभारला अस लिहल होत ते असो) >>>>>>>शॉर्ट कट चे फुलफॉर्म पण नोट / ता.क. मध्ये खाली देत जा मग निदान ते वाचून तरी कळेल कि नक्की काय लिहिलेय. सगळ्यांनाच थोडी ज्ञान प्राप्ती झालीय. बाकी तुमच्या स्टोर्या छान असतात वाचायला विदाउट शॉर्टकटने अजून मज्जा येईल.

@Ajnabi
धन्यवाद, इथून पुढे शॉर्टकट नाही लिहणार
Wink

@आनंन्दा
कोल्हापूरमध्ये ही उभारला असाच म्हणतो आम्ही असो जितके शुद्ध लिहता येईल तितके लिहिण्याचा प्रयत्न Happy

Pages