स्वप्न - ३

Submitted by 1987 on 21 December, 2019 - 18:44

दुसऱ्या दिवशी आठला डोळे उघडले. इतक्या उशिरा पर्यंत झोपायची सवय नव्हती तिला. रात्री अंथरुणावर पडली त्यानंतर आत्ता डोळे उघडले. गेल्या कित्येक वर्षात अशी झोप लागली नव्हती तिला. आडवी झाली की हजार विचार फेर धरून नाचायचे डोक्यात, मग विचार करत कूस बदलत कधीतरी लागायची झोप. आज मात्र अगदी फ्रेश वाटत होतं तिला. मूड पण मस्त बनला होतं त्यामुळे.
“आई जरा चहा टाकशील का?” हातात ब्रश घेत घेत आईला प्रश्न. आई हो म्हणाली. दहा पंधरा मिनिटात फ्रेश होऊन चहाचा कप हातात घेतला आणी सोबत आजचा पेपर. कित्येक दिवसात इतका फ्रेश वाटल नव्हतं तिला.
रोजच्या बातम्या वाचण्यात जराही इंट्रेस्ट वाटत नव्हता तिला. पेपर बाजूला ठेऊन ती गॅलरी मध्ये जाऊन बसली. समोरच मोकळ आकाश आज छान दिसत होतं. खाली रस्त्यावरची माणसाची वर्दळ आज तिला जीवंत वाटत होती. रोज याच गोष्टींचा तिला तिटकारा यायचा.
तासाभरात मधू येणार होती. तो पर्यंत तयार व्हायला हव. नाहीतर आल्यावर तिची बोंबाबोंब सुरू झाली असती.
मधू बरोबर दहाला हजर. मेघनाबाईंसाहेबांची आजून आंघोळ नव्हती आटपली. एकस्पेक्ट केल्याप्रमाणे माधुची बोंबाबोंब सुरू. आधी बाथरूमचा दरवाजा जोरात ठोठावला. दोन शिव्या घातल्यावर तिचा जीव शांत झाला. शॉपिंग असल्याने वेळ पाळायची नव्हती म्हणून नशीब. ब्रेकफास्टसाठी आईने उपमा बनवलेला. तो आईने तिला दिला. सोबत एक कप चहा. तिचा ब्रेकफास्ट होईपर्यंत झाली एकदाची मेघना तयार. तसपण तिला कधीच वेळ नाही लागायचा. हौसच नव्हती कसली जास्त.
साधारण अकराला बाहेर पडल्या दोघी. कुठे जायचं ही पण ठरवलं नव्हतं. माधुने जवळचाच मॉल सुचवला. पण मेघना म्हणाली “वाहा तो बोहोत बार जा चुके है| मूवी भी तो वही देखनी थी| कही और चालते है|” नशिबाने जास्त आढेवेढे न घेता मधू तयार झाली. मेघनाच नशीब जोरावर होतं आज.
ट्रेन घेऊन दोघी जुन्या मार्केट प्लेस ल आल्या. साधारण बारा वाजलेले. इथे खूप जुनी दुकान पण होती. खूप व्हरायटी मिळणार म्हणून दोघीही खुश होत्या. आता दोन चार तास कसे जाणार ते कळणार नव्हतं. निदान दोन पर्यंत आटपून जेउन घेऊ असं ठरवत झाली एकदाची शॉपिंग सुरू.
दीड झाला असेल आणी कुजबूज सुरू झालेली लक्षात आली. कोणत्यातरी मॉलला मोठी आग लागलेली. दोघीनिहि मोबाइल काढला. चॅटिंगवर मेसेज आलेले. आग त्याच मॉलला लागलेली जिथे दोघी मूवी बघायला जाणार होते. काय बोलायच हेच दोघीना सुचेना. थिएटर मधल्यान्नी सगळ्यात जास्त जीव गमावलेला. दोगीहि सुन्न.
शॉपिंग थांबाऊन एका रेस्टोरंट मध्ये जाऊन बसल्या. दोघीही निशब्द. पहिली पाच मिनिटतर कोणीच काही बोलेना. “यार तूने आज बचा लिया| शो हौसफुल्ल था| जाते तो डेफिनेटली आज उपर जाते|” मधुने सुरवात केली. “समझमे नही आ रहा है, तेरा शुक्रीया अदा करू या भगवान का|”
मेघनाच्या मनात एक विचार चमकून गेला. देवाला थॅंक्स म्हण. तिचा आजूनही विश्वास बसत नव्हता जे ऐकल त्यावर. तिला हेच आठवत नव्हतं की आपण मूवील नक्की नाही का म्हणालो. खरंच भविष्य दिसल की काय आपल्याला. काल बटाट्याची भाजी आज मॉल. नक्की काय चालले. निव्वळ योगायोग असणार असं म्हणून तिने शांत व्हायच ठरवलं. मधूला स्वप्ना बाबत सांगावं असं तिला खूप स्ट्रॉंगली वाटत होतं. पण तिने स्वत:ला थांबवलं. नावाला काहीतरी खायच म्हणून खाल्लं दोघींनी आणी निघाल्या.
संध्याकाळ पूर्ण विचारात निघून. डोक्यात नुसता शंका कुशंकांचा कल्लोळ. काय खर कशावर विश्वास ठेवावा ते कळत नव्हतं. स्वप्न खर होतं की काय. या विचारच तिचा तिलाच हसू आल. रात्री खूप मुश्किलीने डोळा लागला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्रेन घेऊन दोघी जुन्या मार्केट प्लेस ल आल्या>> तुम्हाला कार / स्कुटी असं काही म्हणायचं आहे का??

वीरू मला म्हणायचं होतं, त्या दोघी ट्रेनने मार्केट असलेल्या जागी पोहोचल्या.
लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. चुका सांभाळून घ्याव्यात पण जरूर दाखाऊन द्याव्यात.
धन्यवाद!