आजचे भविष्य

Submitted by बेफ़िकीर on 20 December, 2019 - 12:16

आजचे भविष्य - या नावाचा प्रकार पेपरात येतो.

त्यात भविष्य व सल्ले असे दोन्ही असते.

काही नमुने!

=====

- आप्तस्वकियांशी वाद घालू नका

- वाहन चालवताना खबरदारी घ्या

- जुने प्रेम भेटेल

- अन्नदान करा! स्त्रीकडून अनादर!

- वडिलधार्‍यांचा कोप होईल

- ताण घेऊ नका! नडगी सांभाळा!

- मुले डोक्यावर बसतील. वरिष्ठांची मर्जी राखा.

- धनलाभ संभवतो. मैत्रीण भेटेल.

- ताण वाढेल. कपड्यांवरील खर्च टाळा. भावनांवर नियंत्रण हवे.

- त्रस्त व्हाल. ध्यान करा. मार्गात अडथळे येतील.

- उत्तम दिवस. कराल ते होईल.

- घासाघीस नको.

- स्त्रीहट्ट पुरवावा लागेल

- घामेजून जाल

- स्पर्धा टाळा. वीज वाचवाल. नको तिथे पोचाल.

- टाळी मिळेल. उपवास घडेल.

- बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विसंवाद घडेल. ठेच लागेल.

- प्रवास टाळा. अधिक मेहनत नको.

- सोपा उपाय सापडेल. बोलणी खावी लागतील.

- पारा चढेल. गाढव दिसेल.

- दिसेल त्याला फोडून काढा

- आजचा दिवस तुमचा

- कालचा गोंधळ बरा होता असे वाटेल

- व्यवसायात घाटा! अध्यात्मात मन रमेल!

- प्रेम जुळेल

- विदेश यात्रा निश्चीत होईल

- धक्के खाल. अपघात टाळा

- जुने मित्र भेटतील. नवे मित्र होतील.

- सक्रीय सहभाग टाळा

- शिवीगाळ होईल.

- आजचा दिवस कसाबसा घालवा

- उद्या तुमचाच आहे

- हकालपट्टी होईल

- बावळट असल्यासारखे वाटेल

- संसारात मन रमेल

- परस्त्रीची अभिलाषा नको

- कळकट्ट दिसाल

- लाकुड जवळ ठेवा

- थोबाड फुटेल

- आज प्रवास नको! उधळपट्टी कराल

- हरवलेली वस्तू मिळेल

- दागिने लंपास होतील

- इतरांच्या संसारात मन रमेल

- उदास व्हा

- जाल तिथे जिंकाल

- अंतिम निर्णय घ्याल

- नसाल तिथे दिसाल

- विचित्र घटना घडेल

- प्रफुल्ल राहा

- काहीही होऊ शकेल

- हा दिवस विसरा

- खूप हसू नका

- आज कुत्रा चावणार नाही

- दाढी वाढवा

- साखरपुडा ठरेल

- जीवनाचा खरा अर्थ कळेल

- स्वतःला कंटाळाल

- थेट अपमान करा

- मग्रूर व्हा

- गुप्तधन मिळणार

- नवीन दिशेला झेप घ्या

- सोलून काढले जाल

- धरा आणि ठोका

=====

-;बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेष:-
हरहुन्नरीपणा दाखवून द्यावा. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
वृषभ:-
बोलण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. प्रवास मजेत घडेल. वाचनाची आवड भागवाल. वडीलांचा विरोध होऊ शकतो. आपल्या तरल बुद्धीचा वापर करावा.
मिथुन:-
जोडीदाराचे कौतुक करावे. विचारांना योग्य चालना द्यावी. भावंडांना मदत कराल. अचानक धनलाभ संभवतो. मुलांचे प्रश्न सावधगिरीने हाताळा.
कर्क:-
जोडीदाराची प्रगती अनुभवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जवळचा प्रवास घडेल. सहकुटुंब फिरण्याचा आनंद मिळेल. मनातील गैरसमज बाजूला सारावेत.
सिंह:-
इतरांचा विश्वास संपादन करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. नातेवाईकांना मदत करावी लागेल. कफाचे त्रास संभवतात. उगाचच भांडणात अडकू नका.
कन्या:-
लेखकांच्या कामाला वेग येईल. तुमच्यातील धाडस वाढेल. कौटुंबिक समाधान लाभेल. खर्च देखील काहीसा वाढेल. बोलता-बोलता शब्द देवू नका.
तूळ:-
रागावर नियंत्रण ठेवावे. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. आपले मत परखडपणे मांडाल. नवीन मित्र जोडाल.
वृश्चिक:-
तुमच्यातील उतावीळपणा वाढेल. सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. ज्ञान गोळा कराल. आपल्याकडची माहिती इतरांना द्याल. बोलतांना तोल जाऊ देवू नका.
धनू:-
गोड शब्दांनी सर्वांना जिंकाल. एखादे वाद्य शिकण्याची इच्छा होईल. कमिशनमधून चांगला लाभ होईल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका.
मकर:-
आपल्या बुद्धीचा सदुपयोग करावा. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी व्यक्तींना लाभ होईल. आपले मत चांगल्याप्रकारे मांडाल. बुद्धी चातुर्य दाखवावे.
कुंभ:-
महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मानसिक चंचलता जाणवेल. बढतीचे योग येतील. कामाच्या स्वरुपात बदल होईल. थोडे अधिक कष्ट पडण्याची शक्यता आहे.
मीन:-
मनातील इच्छा पूर्णत्त्वाला जातील. मित्रांची उत्तम साथ राहील. आभ्यासू लोकांच्यात वावराल. व्यापारीवर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या ओळखी वाढतील.

Pages