Submitted by Swamini Chougule on 20 December, 2019 - 09:30
भाऊ छोटा असो वा मोठा
असतो काळजाचा तुकडा
चैन पडत नाही बहिणीला
पाहिल्या शिवाय त्याचा मुखडा
त्यातून छोटा असेल भाऊ तर
जरा जास्तच लाडका असतो
नवीन काय आणलं त्याने की
पिंगा मागे पुढे घालत असतो
कसा दिसतो शर्ट म्हणून
दंगा नुसता घालतो
छान आहे म्हणाल्या शिवाय
शर्टच घालत नाय
मागे पुढे घालत राहतो
नुसतीच रुंजी
पैलवान म्हणून चिडवायची
सोडत नाही संधी
मोठा झालास राजा आता
किती ही सांगा
माझ्या साठी कधी घेतो
पप्पांशी पंगा
तू असाच हसत रहा
एवढीच इच्छा
उदंड आयुष्य लाभो तुला
हीच आज प्रार्थना
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा