आज भूमिका बदलून बघ...

Submitted by सोहनी सोहनी on 12 December, 2019 - 01:52

आज भूमिका बदलून बघ...

नजरेत येण्याच्या भीतीने खुंटीत केला शृंगार
पावलोपावली टपलेत हैवान करण्या स्त्रीत्वाची शिकार,
या हिन दरिद्री वखवखल्या नजरांचे तप्त अंगार
रोजच स्पर्शाविन होणारे मूक बलात्कार
पुरुषा तूही अनुभवून बघ
आज भूमिका बदलून बघ. . .

मर्जीविन भोगून असुरी वासना तिला चुरगळून शमते
स्त्रीजन्म अपराधाची सजा तिला व्याजासकट मिळते,
क्षणात आयुष्य उध्वस्त होण्याची अगतिक भावना
फक्त स्त्री आहे म्हणून वाट्याला आलेली हि विवशता
पुरुषा तूही अनुभवून बघ
आज भूमिका बदलून बघ. . .

(किती बदल केले तोकड्या कपड्यात तरीही
बलात्कारी नजर रोखणारे कापड बनतेच कुठे
शापित स्त्रीजन्म घेणाऱ्या अपराध्यास
माणूस म्हणून वागवलं जाईल का कुठे ?? )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults