अव्यक्त ...!

Submitted by अमृत जोशी on 11 December, 2019 - 06:59

'छान गायलास खूप'
सांगितलेस..
म्हणजे, भान हरले नाही..!
गाण्यातली बेभानता कुणी
असं बोलून मोडत नाही ..!

'खूप छान लिहतोस'
म्हणालीस...
म्हणजे, आत काहीच हलले नाही....!
डोळ्यांतल्या पाण्याची सर
अश्या उपचाराला नाही....!

"माझे प्रेम आहे तुझ्यावर " ...
सांगितलेस..
तिथेच जिवलग उरलो नाही
अव्यक्ताला व्यक्तामध्ये
पालटलेस ..
तिथेच खोल मुरलो नाही

Group content visibility: 
Use group defaults