खडतर आयुष्य ! तीच-१३

Submitted by रिना वाढई on 11 December, 2019 - 00:44

९ महिने झाले, त्यांचं ठरल्याप्रमाणे तिचे आई-वडील तिच्या पहिल्या डिलिव्हरीची जबाबदारी घेणार होते .राजीवने त्यांना समजावलं होत कि हि परंपरा आता जुनी झाली,
माझ्या बाळाची जबाबदारी हि माझीच असायला हवी त्यामुळे तुम्ही फक्त आमच्याकडे काही दिवस तिच्या सोबतीला या , बाकीची सगळी जबाबदारी मी घेईल पण तिच्या बाबांपुढे राजीव च काही एक चाललं नव्हतं .
ती आईकडे डिलिव्हरीसाठी गेली तेव्हापासूनच तिला लहान-सहान गोष्टीसाठी राजीवकडून आधीच पैसे मागून ठेवावे लागत होते .
आई-वडील खूप श्रीमंत नाही तरी आजपर्यंतच्या तिच्या सगळ्या इच्छा त्यांनी खुशीने पूर्ण केले होते .
आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देण्याइतपत तर त्यांची हैसियत होतीच .
कधी कोणाकडून दोन पैसे मागायची वेळ त्यांच्यावर कधीच आली नव्हती याउलट ते आपल्या आप्तांना गरजेच्या वेळी मदत करायला नेहमीच समोर असायचे .
पण ती तिथे राहायला गेल्यापासून तिला त्यांच्या स्वभावात फरक जाणवू लागला होता .
नेहमी आपल्या लाडक्या मुलीचे इच्छा पुरविणारे तिचे वडील तिला प्रत्येक गोष्ट," राजीवला आणायला सांग ", किंवा "तुझ्याकडे असतील ना पैसे मग आन त्यामधून " अशे बोलू लागले होते .

त्यावर्षी पीक जास्त निघाला नव्हता म्हणून तिला वाटायचं कि बाबाकडे जास्त पैसे नसेल, म्हणून ते आपल्याला आपलं स्वखर्च करायला सांगत आहेत .
एके दिवशी तिच्या कानावर पडलं कि तिची नवव्या महिन्याची ओठी खूप धुमधडाक्यात करणार आहेत .
त्यावर तिने तिच्या आई-बाबाना समजवण्याचा प्रयत्न केला कि
" आता हे कार्यक्रम खूप मोठं करण्याची काही एक आवश्यकता नाही , समोर माझ्या डिलिव्हरीचा खर्च सुद्धा तुम्हीच करतो म्हणत आहात तर आता हे राहू द्या . " पुढे जाऊन पैशांची गरज पडेल तर ?

पण तिच्या आईनी म्हटलं कि "तुझ्या सासरी सातवा महिना केला त्यापेक्षा बघ मी किती चांगल्याने तुझा नववा महिना करतो ". ती समोर काही बोलूच शकली नाही .
तिचे बाबा जुन्या विचारांचे होते ,पण आजवर तिला त्यांच्या त्या स्वभावाचा कधी त्रास झाला नव्हता मात्र समोर काहीतरी मोठं घडणार हे तिला दिसत होत . नऊ महिने झाले ,
डॉक्टर ने तिला जी तारीख दिली होती त्याच्या एक दिवस आधीच तिला चेकअप साठी शहरात जाणे भाग होते .
राजीव ने आधीच तिच्या घरच्यांना आणि तिलाही सांगितलं होत कि "तुझी डिलिव्हरी हि हॉस्पिटल मध्येच होणार , "
मला काहीही रिस्क घ्यायची नाही आहे , त्यामुळे तुम्ही सगळे माझ्या घरी जाणार ठरल्याप्रमाणे आणि तिथल्या हॉस्पिटलमध्येच मग डिलिव्हरी करू .

ती आणि तिची आई दुसऱ्या दिवशी शहरात जाण्यासाठी तयारी करू लागल्या , तेवढ्यात तिचे बाबा , "तुम्हाला तिथे जाऊन राहण्याची काही आवश्यकता नाही , तिची डिलिव्हरी आपण घरीच करू , या गावात बाकीच्या मुलीही आहेत , त्यांची डिलिव्हरी इथे होऊ शकते तर हिची का नाही ?"

आणि शहरात जाऊन तुम्ही फक्त फक्त माझा खर्च वाढवणार आहात बाकी काही नाही . त्यांचं बोलणं एवढं क्रूर होत कि एक-एक शब्द तिच्या काळजात जाऊन घाव करत होता .
बाबाना आपली हालत माहिती आहे तरी ते अशे कसे बोलू शकतात , कि बाकीच्या मुलींप्रमाणे माझीही डिलिव्हरी इथेच व्हावी . तिला अजूनही उलट्या , मळमळ हा त्रास सुरूच होता .
रक्त हि कमी असल्याकारणाने काही दिवसाआधीच रक्त वाढवायची ट्रीटमेंट घेतली होती तिने .
बाबांच्या बोलण्यात तिच्याबद्दल काळजीचा लवलेशही दिसत नव्हता उलट त्यांचे पैसे खर्च होतील याची काळजी होती . तिच्या आईने बाबाला समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते .
शेवटी त्यांच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं कि
"आता तिची आणि तिच्या बाळाची काळजी हि राजीवची जबाबदारी आहे , त्याने समोरच काय करायचं ते ठरवावे ". आणि पैशाचं काय ते हि बघावं , नाहीतर मग इथेच राहून तिची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात करू द्यावी .
बाबांसमोर आईच काहीच चालत नव्हतं तरी तिच्या आईने जमेल तेवढा प्रयत्न केला होता तिच्या बाबाला समजावण्याचा , "
राजीवला अचानक तिच्या डिलिव्हरीचा खर्च कर म्हणणे हे चुकीचे होईल , आपण संपूर्ण जबाबदारी घेणार होतो , म्हणून त्याने हिला आपल्याकडे पाठविलं , तिचा आजवरचा छोटा छोटा खर्च सुद्धा ते च करत आलेत , पण कधी आपल्याला म्हटलं नाही कि तुमच्या घरी हि आहे तर तुम्ही बघा म्हणून , "
पण समोरचा विचार आता आपल्यालाच करायला पाहिजे , देवाने दिलेलं सगळं आहे आपल्याकडे , यावर्षी पीक नाही झालं तर काय झालं , पुढल्या वेळेस भरगोस पीक घेऊ आपण . पण आपल्या मुलीची पहिली डिलिव्हरी आपणच करू , कितीही खर्च आला तरी चालेल .
पण तिच्या बाबांपर्यंत तिचे शब्द जणू पोहचलेच नव्हते , त्यांनी तुम्हाला काय करायचं आहे ते करा म्हणून आपला काढता पाय घेतला .
या दोघीही ठरल्याप्रमाणे उद्याच सकाळी जायचं म्हणून उर्वरित तयारी करू लागल्या . सायंकाळचे जेवण आटोपले . घरात शांतता होती , कोणीच कोणाशी बोलत नव्हते . ती आपल्या रूमध्ये जाऊन राजीवला फोन केली ,
ती , "हॅलो राजीव , ऑफिस मधून आले काय ? जेवण वैगेरे झालं का ?" आणि अशेच औपचारिक प्रश्न ती राजीवला विचारू लागली , तिला बोलायचं काही वेगळं होत पण तोंडातून शब्द काही वेगळेच निघत होते .
राजीवला ते जाणवलं , तो तिला विचारू लागला कि काही झालं का घरी .
तिला राजीवसमोर आपल्या बाबांचा मान कमी होऊ द्यायचा नव्हता , म्हणून तिने कसतरी काहीही सांगून ते गोष्ट पालटवली .
पण तिला कळून चुकलं होत कि बाबा तिचा हॉस्पिटलचा खर्च करणार नाहीत , म्हणून तिने राजीव ला गळ घातली .
ऐक ना राजीव , मी काय म्हणते, कि माझ्या डिलिव्हरीचा खर्च किती येईल , म्हणजे आपण दोघांनीं काही saving केली होती तर त्यामध्ये होऊन जाईल ना सगळं . ती बोलत होती पण राजीवच्या डोक्यात विचारचक्र फिरत होते .
राजीव , तू अशी का म्हणत आहेस , तुझे बाबा करणार आहेत ना सगळा खर्च , मग एवढी काळजी तू कशाला करत आहेस , आणि बघ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तू नको करू , आता जास्त विचार करणे तुझ्यासाठी चांगले नाही .
ती, अ रे मी काही चुकीचं विचार नाही करत आहे , हे बघ आपल्या बाळाची जबाबदारी हि आपलीच असायला हवी , आणि तुला माहित आहे ना राजीव , यावर्षी पाहिजे तेवढा पीक नाही झाला बाबांना ,म्हणून ते चिंतेत आहेत आणि मला आणखी एक ओझं त्यांच्यावर टाकायचं नाही आहे . त्यामुळे समोरचा
सगळा खर्च आपणच करू .
राजीव , तुला समजत कसं नाही आहे , जेवढी सेविंग्स होती त्याची अर्धीच राहिली आता . मी दर पंधरा दिवसातून तुला भेटायला येतो , आल्यावर तुला काही पैसे हि देतो . यामध्येच तर कितीतरी पैसे निघून गेले . महिन्यातून तुझी ट्रीटमेंट हि असते त्यामुळे महिन्यालाच पगार होऊनही संपून जातो . थोडीफार बचत आहे ती आपला बाळ घरी आल्यावर लागेल .
मग कुठून आणू मी आता पैसे . त्यांनी आधीच तयारी नसती दाखवली तर आपण इकडेच तुझी डिलिव्हरी करणार होतो , निदान माझा येण्या-जाण्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचला असता . अगदी शेवटच्या टोकावर येऊन ते आपले हात कसेकाय झटकू शकतात . बरं ते राहू दे त्यांना म्हणा त्यांच्याकडून जेवढं जमेल तेवढं करा बाकी मी बघतो .
पण एकट्यालाच मला कस जमणार हे त्यांनाही कळायला पाहिजे ना , त्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत . राजीवचा आवाज आता चढला होता . तिने फोन ठेवला आणि झोपायला आली . पण ज्या
मुलीला तिच्या जवळच्याच माणसाने दुखवल होत ते हि अशी नाजूक स्थिती असताना , तिच्या डोळ्याला झोप तरी कशी येणार होती .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ही सत्य कथा आहे .
एखादा 'बाप' असा वागु शकतो याचच वाईट वाटतंय. >> परिस्थिती जबाबदार असते , माणूस मात्र एक निमित्य असतो .
'तो बाप ' त्याआधी एवढा वाईट नव्हता , पण पीक नाही झालं हे दुःख आणि समोरचा खर्च , यांचा ताळमेळ नाही जमला त्या बापाला .
आणखी एक गोष्ट , त्यांचा जावई चांगला इंजिनिअर होता , त्यामुळे त्यांच्या मनात अशे भावना आले .