मर्यादा . . .

Submitted by सोहनी सोहनी on 10 December, 2019 - 07:29

मर्यादा . . .

एक मनाची अशी बाजू जी खरेतर मनाने मानाली तरच अस्तित्वात असते, जो पर्यंत एखाद्या बंधनाला मर्यादेला मन मनात नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व आयुष्यात नगण्यच असतं.
संस्कारी कि असंस्कारी हि सुद्धा प्रत्येकाच्या मनाच्या मानण्यावर विसंबून असणारी बाब.
अशीच एक काल्पनिक कथा.

हाय, निघालीस का ??

"निघेल थोडा वेळात, तुम्ही ??"

मी निघालोय गाडी चालू करतोय. तुझ्या मेसेजची वाट पाहत होतो, मी येऊ का घ्यायला तुला??

"नाही नको, मी येते स्कुटी घेऊन."

हरकत नाही, निघ लवकर पण सांभाळून ये आणि हो मी तिथे पोहोचायला पहिला चेहरा मला तुझाच दिसला पाहिजे कळलं?

हो का? असं असेल तर मग मी उशिराच येईल.

वाट पाहतोय ...

इतकाच मेसेज करून फोन बाजूला ठेऊन त्याने कार स्टार्ट केली, स्वतःला एकवार हलकेच आरशात पाहत स्वतःशीच हसला. आपण पुन्हा आधीसारखे दिसायला लागलो आहोत, प्रसन्न आणि उत्साही स्वतःशीच हसत तो विचारात गुंतला.

किती जवळ आलो नकळत मी हिच्या,माझी असिस्टंट म्हणून ऑफिसला आली तेव्हा काम्पुटरमधून तोंड वर करून साधी स्माईल सुद्धा दिली नव्हती आपण तिला पण हळूहळू काम करताना बोलताना तिचं सगळ्यांपेक्षा तिचं वेगळं असणं जाणवत गेलं.
तीन मुली तिच्याआधी ऑफिसमध्ये माझ्या असिस्टंट म्हणून होऊन गेल्या,दोघीजणी तर मी दिसावा म्हणून किती वेळा केबिन बाहेरून फेऱ्या मारायच्या,मी पाहावं म्हणून किती काय काय कपडे मेकअप करून यायच्या, काम नसेल तरी असंच सहजचं बोलायचा प्रयत्न करायच्या, सगळं समोर दिसत आणि कळत असतानादेखील आपण कधी कामाबाहेर डोकं काढलं नाही, त्यांच्या भावनांचा अपमान नको म्हणून कधी ओरडलो नाही आणि कधी कोणाला अटेन्शन द्यावंसं एकवेळ हि वाटलं नाही ..
पण हि आली आणि वातावरणचं बदलून गेलं, आली तेव्हा अगदी सर्वसाधारण वाटली,पण हळूहळू काहीतरी होत गेलं तिला पाहून, रोज ते गोड़ हसून गुड मॉर्निंग म्हणणं, ऑफिसमध्ये सकाळचा नास्ता केबिनमध्ये कधी तिला तसाच दिसला तर खायची आठवण करून देणं, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणं, कामात चुकी असली कि स्वतः स्वीकारणं सॉरी बोलणं, सॉरी बोलताना तिचा चेहरा पाहून किती वेळा हसायला यायचं.
कधीतरी कोणी नसताना माझ्या शर्टची अगदी मनापासून तारिफ करणं, कधी चांगला नशेल तर सांगणं, नकळत आपण हि तिच्या आवडीनुसार वागू लागलो,माझ्या हि नकळत माझं बंदिस्त आयुष्य खुलत गेलं .
एक हक्काच्या मैत्रिणीसारखं तिचं आपल्यासोबत वागणंच तिच्याकडे खेचत गेलं आपल्याला.

अलंकार थोरात, वय वर्षे छत्तीस, गेली आठ वर्षे एका मॅनुफॅक्चरिंग कंपनीमध्ये प्रोडकशन हेड.

रंगाने गोरा, चांगली उंची, फिट बॉडी, अट्रॅक्टीव्ह ड्रेसिंग सेन्स, कुणी हि भुरळून जाईल अशी स्माईल, खेळकर आणि तल्लख.
असा हा अलंकार ऑफिसमध्ये नवीन आला तेव्हा सगळ्यांना आवडला, खूप कमी वेळात त्याने सगळ्यांना आपलंस केलं, खूप मेहनती, ऑफिसमध्ये त्याच्या सोबत काम करणाऱ्या ऋचा सोबत प्रेम झालं ,बरीच वर्षे रेलशनशिप, नंतर अलंकारला प्रोमोशन मिळालं, ऋचासोबत लग्न ठरलं तिच्या घरी ह्याच्या घरी सगळे खुश, हे दोघे हि खूप आनंदी होते, सुखी संसाराची पाहिलेली साखरमाखली स्वप्ने आणि लग्नाच्या आठ दिवस आधी कार ऍक्सीडेन्टमध्ये झालेला ऋचाचा मृत्यू ....
त्यानंतर स्वतःला बंदच करून घेतलं होतं आपण, आणि नंतर कामात गुंतून घेतलं, बोलणं बंद झालं,हसणं तर विसरूनच गेलो होतो, तब्येतीकडे दुर्लक्ष्य, ऐन तारुण्यात चाळीसचा दिसायला लागलो, लग्नाचा विषय तर दूरचं पण प्रेम हि भावना कधीची मनात मरून गेली होती. तिच्या जाण्याने आयुष्य पूर्णपणे अंधारात लोटलं होत आपण, फक्त काम आणि काम इतकंच काय ते केलं आपण त्या वर्ष्यात पण हिने येऊन माझ्या भेगाळलेल्या आयुष्याला मायेचा ओलावा दिला.
विचार करत करत तो पोहोचलादेखील.

आज ऑफिसला वीसवर्षे पूर्ण झाली म्हणून मोठी पार्टी ठेवली गेली होती, तिथलं वातावरण अगदी झगमगीत झालं होतं. खाणं पिणं नाचणं गाणं सगळं सुरेख.
खूप छान दिसत होते सगळे, आणि सगळेच खूप खुश दिसत होते पण अलंकारची नजर तिला शोधत होती. एकवार सगळीकडे नजर फिरवली पण ती काही दिसली नाही म्हणून तो जाऊन चेअरवर बसला.
त्याला पाहून दोनतीन जणींनी त्याच्या ड्रेसिंगला मनापासून दाद दिली. प्रोडकशन हेड असल्याने जुनिअर जास्त पर्सनल बोलत नसायचे पण ती आल्यापासून अलंकार पूर्ववत झालाय हे खूपजण ओळखून होते.
जुनी लोकं त्याला पहिल्यासारखा पाहून खुश होते तर काही नवीन लोकं तिच्यावर खार खायचे.
पण त्यांची इतकी जवळची मैत्री ऑफिसमध्ये अजूनतरी उघड नव्हती.

तो अजूनहि प्रवेशदाराकडे पाहत होता कधी ती येते असं झालं होत त्याला, कॉल केला पण तिने कट केला, तो तिला पाहण्यासाठी कासावीस झाला होता,तेवढ्यात माईकमध्ये तिचा आवाज आला.

तिचा नुसता आवाज ऐकूनच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली, ती आजची पार्टी होस्ट करत होती.
तो जवळपास धावतच आवाजाच्या दिशेने गेला आणि तिला पाहून थक्कच झाला.

सोहनी देशमुख, वय वर्ष 28, खेळकर, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणारी आणि कायम हसत राहणारी, केअरिंग पर्सन, पाणीदार डोळे, गोरा रंग, गोल हि नाही आणि लांबटहि नाही असा मध्यम चेहरा, बोल्ड लुक, बिनधास्थ आणि स्वतःच्या मर्जीने वागणारी व्यक्ती.
नेहमी शर्ट आणि जीन्समध्ये असणारी सोहनी, आज लॉन्ग ब्लॅक पार्टी गाऊनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती, एका बाजूने घेतलेले तिचे कुरुळे केस हळूहळू उडत होते, आणि तिला पाहून ह्याचं हृदयही.
त्याला पाहून जरा लाजलीच ती, डोळ्यांनीच त्याने तिला दाद दिली, स्वतःच्याहि नकळत तो तिला पुन्हा पुन्हा न्याहाळत राहिला.
हातात महागडी घड्याळ, दुसऱ्या हातात सोन्याचं नाजूक ब्रेसलेट, छोटे छोटे फुलपाखरांची कानातली, गळ्यात सोन्याची चैन आणि त्यात दोन काळे मणी.
तिच्या मंगळसूत्राकडे पाहून त्याला पुन्हा कसतरीच झालं.
तिचं लग्न झालंय हे आधीपासूनच माहित असूनदेखील आता त्याला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा.
गाणं जोरात वाजू लागलं सगळे तालावर थिरकू लागले,तीही मित्र मैत्रिनींसोबत थोडं थोडं नाचू लागली. तिला तसं छान एन्जॉय करताना तो तिला प्रेमाने न्याहाळत होता पण राहून राहून नजर मंगळसूत्राकडे जात होती. आता त्याला पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं, त्यामुळे तो सगळ्यांपासून लांब जाऊन उभा राहिला.

ती अलंकारजवळ येऊन त्याला सगळ्यांसोबत डान्स करण्यासाठी रिक्वेस्ट करत होती, त्याने डोळ्यांनीच नकार दिला, तशी ती त्याच्या शेजारी बसली.

" काय झालं ??"

"काही नाही, मूड नाही लागत आहे इथे."

"मग काय केल्याने मूड ठीक होईल तुमचा???"

बाहेर जाऊयात थोड्या वेळासाठी ?? त्याने अधीरतेने विचारलं.

"पार्टी सोडून ? ?" तिनेही आश्चर्याने पाहिलं .

तसंही कोणाचं लक्ष्य आहे आपल्याकडे, प्रत्येकजण आपल्या धुंदीत आहे, प्लिज जाऊयात ना. त्याने अजीजीने विचारलं.

सगळ्यांसोबत बोलून, थोडं थोडं खाऊन ती दोघे निघाली.
जागा नेहमीची, सोहनीचं घर जे शहरापासून थोडं लांब होतं आणि आजूबाजूला कुणी राहत नव्हतं, त्यामुळे त्यालाही तिथे बरंच कंफर्टेबल वाटायचं.
तुम्ही फ्रेश व्हा मी कॉफ़ी आणते, असं म्हणून ती किचनमध्ये गेली.

फ्रेश होऊन त्याला त्या जागेच बरंच मोकळं वाटलं. तिने आणलेल्या कॉफीचा वास नाकातून डोक्यात घुसवून तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला "तुला माहित आहे ह्या कॉफी आणि तुझ्यामध्ये काय साम्य आहे ? ??"

तुम्ही गुरु सरांचे डायलॉग इथे खपवू नका हा , असं म्हणून ती हसत हसत चेंज करायला गेली.

दोघींनाहि मला माझ्यामध्ये सामावून घ्यावसं वाटतं कधी कळेल तुला, तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो सोफ्यावर रेलून बसला ...

खूप वेळ बोलता बोलता त्याच्या बाजूला बसलेली तिचा कधी डोळा लागला त्याला देखील कळलं नाही.
कळलं तेव्हा गोड़ झोपली होती ती, तो एकटक तिला न्याहाळत बसला आणि स्वतःशीच विचार करू लागला.

किती विश्वास आहे हिला आपल्यावर, तिच्या नवऱ्याच्या वयाचा माणूस बाजूला बसलेला असतानादेखील निवांत झोपलीये हि, आपल्या मनातील भाव एकदाहि जाणवले नसतील का हिला ??

आपल्या मनाचे व्रण किती पटकन ओळखले तिने ऑफिसमधून आपल्या भूतकाळाविषयी तिला कळलं आणि किती हळुवार तिने त्या भळभळत्या जखमांवर मैत्रीची पट्टी बांधली, माझ्याही नकळत माझ्या जखमा भरत राहिली, फक्त आपल्यातला एक मित्र जागवावा ह्या एका आशेवर.
कसे विस्कटलो होतो आपण, तिने हळुवार जपलं आपल्याला, तिनेच बोलून बोलून आपण पुन्हा तब्येतीकडे लक्ष्य देऊ लागलो, हळू हळू मैत्री झाली.
कोणालाही सहज दिसून येईल इतका बदल आणला तिने आपल्यात, का माहित नाही पण तिचं ऐकावंस वाटलं, इतक्या वर्षात कधी बदललो नाही कोणाचं ऐकून, पण तिच्यासाठी करावंसं वाटलं सगळं आणि आता इतका जवळ आलोय तिच्या कि .. तिच्याशिवाय सगळं व्यर्थ आहे असंच वाटतंय..

तिने झोपेतच थोडीशी चुळबुळ केली.
सतत हसत राहण्याऱ्या चेहर्यामागे तिचं दुखी मन तिने आपल्या सोबत मोकळं केलं आणि त्याला त्या रात्रीचं त्या दोघांचं संभाषण आठवलं.

तुझ्या घरी असं रात्री माझं येणं तुला बरोबर वाटतं ??? असं आपण तिला विचारलं तेव्हा किती स्पष्ट बोलली ती
" का? काही चुकीचं करतो इथे आपण ???"

तसं नाही ग, पण तू एक लग्न झालेली मुलगी आहे, आणि नवरा घरी नसताना माझं तुझ्या घरी येणं कोणालाही खटकेल ? लोक चुकीचा अर्थ काढतील .

काढूदेत, जोपर्यंत मी जे करते ते मला चुकीचं वाटत नाही तोपर्यंत ते मी करेल, तुम्हाला आवडत नसेल, तुमच्या मनाला पटत नसेल इथे येणं तर तुम्ही नका येऊ.
जरी इथे पाहायला कुणी नाही तरी लोकांचं म्हणाल तर कोण काय म्हणेल त्याशी मला काही घेणं देणं नाही.

आणि नवरा ????

"तुम्हाला माहीत आहे अलंकार ? सुजयचं आणि माझं लग्न झालं, तेव्हा मी 23 वर्षाची होते, खूप स्वप्ने पहिली आम्ही दोघांनीसोबत, लग्नाच्या तीन महिन्यात आम्ही इथे शिफ्ट झालो, ७महिने राजा राणीचा संसार, स्वप्नांसारखे होते ते दिवस माझ्यासाठी ,खूप प्रेम करतो तो माझ्यावर, त्याचा हवाहवासा वाटणारा स्पर्श आज हि रडवतो मला.
तो दुबईला चांगल्या पदावर आहे, पण काही कारणांमुळे तो मला तिथे नेऊ शकत नाही. लग्नासाठी सहा महिने सुट्टी काढली होती, पाच महिने अजून वाढवली, ती संपली आणि तो पुन्हा गेला.
रोज कॉल करायचा. खूप काळजी घ्यायचा तिथून हि , पण थोड्याच दिवसांनी मला हे घर खायला उठायला लागलं, मग त्यानेच जॉब करायचं सुचवलं, त्याला खूप मिस करते, माझंहि प्रेम आहे त्याच्यावर खूप, आठ दहा महिन्यांनी पंधरा वीस दिवसांची सुट्टी काढून येतो माझ्यासाठी.
त्याच्या कामाचा व्याप खूप वाढला आहे तिकडे त्यामुळे जास्त बोलायला मिळत नाही पण
खूप प्रेम आणि विश्वास आहे त्याचा माझ्यावर, त्याला बोलून नाही दाखवत पण त्रास होतो खूप ह्या एकटेपणाचा, ऑफिसमध्ये नेहमी हसते, मिळून मिसळून राहते कारण मला नाही आवडत सतत रडत राहणं, सहानुभूतित जगणं, आणि तसंही सगळ्यांसोबत शेअर करायला मला आवडत नाहीच.

मग मी का??? ह्या आपल्या प्रश्नावर काहीवेळ निरुत्तर झाली होती ती

कारण तुम्ही स्पेशिअल आहात आणि तुम्हला जवळची जागा आहे ह्या हृदयात.किती खुश झालो होतो आपण तिच्या ह्या वाक्यासरशी.

तिची मान एका बाजूला कलंडली आणि त्याच्या खांद्यावर अलगद विसावली, आणि थोड्या वेळासाठी त्याची विचार शृंखला पुन्हा तुटली.
त्याने हळूच तिला सोफ्यावर झोपवलं, घरी जायचं होतं पण त्याचा आज पाय निघतच नव्हता तिथून.
कितीतरी वेळ समोर बसून तो तिला पाहत बसला.
मनातलं स्वतःशीच बोलत पण ते तिच्यापर्यंत पोहोचावं असही वाटतं होत त्याला सतत.

किती कमी वेळात तू ऋचाच्या आठवणी पुसून माझ्या मनात तुझ्या नवीन आठवणी निर्माण केल्या.
ऋचाची जागा कधीच कोणाला देणार नव्हतो पण तिच्या जागी कधी तुला पाहायला लागलो कळलंच नाही, तुझे पुसटसे चुकून होणारे स्पर्श हवेहवेसे वाटायला लागले माझ्याही नकळत, तुझं ते मंगळसूत्र पाहिलं कि त्रास होतो मला.
कधी कधी इतकी गोड़ वाटतेस ना कि तुला फक्त पाहत राहावसं वाटतं. खूप प्रेम करतो ग तुझ्यावर आणि आज तर तुला इतकी सुंदर पाहून तुझ्या जवळ यावंसं वाटतं, खूप जवळ.

पण माझ्या मर्यादा मी जाणून आहे पण एक दिवस तू माझी नक्की होशील "मिस्सेस थोरात" ...

मनाशी काही निर्धार करून घर लॉक करून तो स्वतःच्या घरी परतला,रात्रभर विचार करून करून त्याने तिला प्रोपोस करायचं ठरवलं.
ती नाही म्हणू शकते असं एकवेळहि त्याच्या मनात आलं नाही, तिचा नवरा.मंगळसूत्र, तीच लग्न सगळं विसरून गेला होता तो जणू, त्याला फक्त तिला पूर्णपणे स्वतःची करून घ्यायची होती कायमची.

"मी तुझ्या घरी येतोय, खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत उद्या ऑफिसला तुला सुट्टी आहे समज" तिला मेसेज करून तू जगाला विसरून स्वतःच्या विश्वात हरवून झोपला.

सकाळी छान तयार होऊन तो तिच्या घरी पोहोचला,ती आताच बाथ घेऊन आली असावी, ओली केसं टॉवेलमध्ये गुंडाळून नाश्ता बनवत होती.
टॉवेल बाजूला ठेऊन केसं सोडून दोघे नास्ता करायला बसले, तिची ओली केसं, शाम्पूचा मंद सुवास त्याला वेडं करत होतं.
तो तिच्याजवळ जाऊन बसला अजून जवळ,
ती थोडी मागे सरकून,
"बोला काय महत्वाचं बोलायचं होतं इतकं कि मला ऑफिसला सरळ सुट्टीच देऊ केली??"

त्याने हिम्मत करून तिचा हात हातात घेतला , चेहरा स्वतःकडे वळवुन, हलकेच तिची ओली केस बाजूला सारली आणि एक मोठा श्वास घेऊन
"आय लव्ह यु सोहनी, मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत, लग्न करशील माझ्यासोबत ??
आणि त्याने तिच्या ओठांवर अलगद आपले ओठ ठेवले, तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं वासना ना त्याच्या डोळ्यात दिसली ना त्याच्या स्पर्शात तिला जाणवली.
तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला स्वतःपासून दूर लोटलं.

अलंकार, तुमच्या मनात माझ्याविषयी जी भावना आहे ते न समजण्याइतपत लहान नाहीये मी, तुमच्या डोळ्यात वेळोवेळी पाहिलंय मी माझ्यासाठी काय आहे ते.
कधी कधी मला स्पर्श करण्याची इच्छासुद्धा अनुभवली आहे मी तुमच्यात, तरीही मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही माझ्या घरी रात्रीअपरात्री ये जा करता, ह्याच कारण इतकंच कि तुमच्यावर विश्वास आहे माझा इतका कि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही मला स्पर्श नाही करणार, अगदीच कोणत्याही परिस्थितीत ....

मलाहि तुमच्यासोबत राहायला आवडतं, तुमच्या प्रति एक वेगळीच ओढ असते मनात तुमच्यासोबत असले कि छान वाटतं.
पण ह्याला प्रेम नाही म्हणत, सहवासाचा परिणाम फक्त ..
आणि मी सुजयला नाही सोडू शकते,त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंहि.

" असं प्रेम जे तुला रोज एकटेपणाची जाणीव देतो ?? रडवतो ?? तडफडवतो ?? "

आयुष्यात एका माणसाने फक्त एका व्यक्तीवर प्रेम करावं हा नियम जरी नसला तरीही एकाच स्त्रीचे दोन पुरुषांसोबत शरीरसंबंध माझ्यामते पाप आहे ,माझं मन ते करायला मानत नाही.

" म्हणून कर ना माझ्यासोबत लग्न, मी सगळं सांभाळून, सुजयला पण "

काय सांगाल?, तुझ्या बायकोसोबत लग्नाला परवानगी दे, तिला मानसिक आणि शारीरिक सुखाची गरज आहे, हे बोलाल ???

कधी कधी वाटतं हि मीच माझ्या भोवती आखलेली मर्यादेची चौकात लांघवी, उधळून द्यावीत हि मनाची बंधन, कधी खूप वाटत कि जाऊदेत मर्यादा नियम आणि सगळं. पण ते वाटणं निव्वळ क्षणिक असतं, आणि तसं लागल्यावर होणार मनस्ताप सहन करण्याची ताकत ह्या मनात देखील नाही हे मी पूर्णपणे जाणून आहे.
माझ्या चौकटीतला मी व्यवस्थित जाणून आहे आणि मी त्यात खुश आहे, ती चौकात पाळूनच मी खुश आहे.
तुमच्याकडून पाहिजे असतं तर शरीरसुखाची मागणी कधीच केली असती आणि तुम्ही ते नाकारलंहि नसतं.
पण मला तसं नाही करायचं, लोक काय म्हणतील म्हणून मुळीच नाही पण माझ्या मनाला ते योग्य वाटत नाही म्हणून फक्त माझ्या मनाला ते मान्य नाही म्हणून . . .
माझं लग्न झालय, माझा नवरा माझ्यापासून खूप दूर राहतो , माझ्या मानसिक आणि शारीरिक गरज तूर्तास तरी तो पूर्ण नाही करू शकतोय, त्यामुळे मी माझ्या चौकटीबाहेर येणं माझ्या मनाला मान्य नाही, आणि मी त्याच्याशी प्रतारणा करावी हे तुम्ही ठरवणं देखील मला पटत नाही.
शारीरिक सुखापेक्षा अजून काही गोष्टीवर लग्न टिकून असतं ते म्हणजे प्रेम आणि विश्वास.
जे तो माझ्यावर करतो आणि मीहि अलंकार . . . .
तुमच्या मनात माझ्याप्रति असणाऱ्या भावनेचा मी आदर करते, पण मी माझ्या मनाच्या चौकटीबाहेर नाही येणार, जे मला मान्य नाही ते करून मी आजन्म मनाची कच खात नाही जगू शकते.

मैत्रीण म्हणून मी नेहमी तुम्हाला लग्न करा नवीन सुरुवात करा सांगत आलीये पण तुम्ही कधीच ऐकलं नाही माझं त्याविषयी. तरीही मी तुमच्या पासून पूर्णपणे दूर होत नाहीये हा माझ्या मनाचा अजून एक वेगळा पैलू, तरीहीअजून हि मला वाटत तुम्ही लग्न करावं, मला आवडेल सुखी संसार करताना पाहताना आणि ह्याने आपल्या मैत्रीमध्ये काही फरक नाही पडणार ..तुम्हाला माझं म्हणणं नक्कीच पटलं असेल ...

हो पण आहे प्रेम माझं तुझ्यावर, जे मी बदलू नाही शकत आणि मला ते बदलायचंहि नाही, माझं प्रेम माझ्या मनात राहूंदेत आणि आपली मैत्री आहे तशीच आयुष्यभर ठेवुयात
तुझ्या मैत्रीच्या आधारे आयुष्य काढेल इतकं प्रेम आहे तुझ्यावर माझं, आपल्याला दोघांना मर्यादा आहेत आपण त्या पाळून हे नातं असंच टिकवूयात?

मॅच्युअर लव्ह???? चालेल तुला ...
असं प्रेम ज्यात लव्ह यु, मिस यु, वोन्न फील यु वैगेरेंची कधीच गरज भासणार नाही , असं प्रेम ज्यात शरीर स्पर्शाची गरज नसेल. मनाची भाषा न बोलता मनापर्यंत पोहोचेल असं प्रेम.
माझ्या प्रेमाचा आदर करतेस तर ते प्रेम जपायचा हक्क तेवढा दे मला तू.

तिची अर्धवट होकारार्थी कळलेली मान न पाहताच घरी निघून गेला. . .. . .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

, सॉरी पण नाही आवडली. एवढेच प्रेम आहे नवर्यावर तर दुसरा पुरुष आपल्यात गुंतेल असे इंडीकेशन्स का द्यावे? स्वताहून वैयक्तिक चौकशी करणे, मग तू स्पेशल आहे सांगणं, मनात काही नसताना पण रात्री अपरात्री घरी बोलावणे हे तरी मला नाही पटलं. माझे विचार एकांगी वाटू शकतील कदाचित. पण कथा वाचून शेवटी ती त्याच्या इमोशन्स शी खेळतेय अशी फिलिंग आली. Obvious ,,हेमावैम.

मनाची हीच दुसरी बाजू दाखवणे कथा लिहण्याचा मोटिव्ह होता, कि तिला आपण आपल्या चौकटीत आहोत असं वाटत असताना आपण तळ्यात मळ्यात करतो आहोत हे कळत नाहीये.
जसं नाही हे चूक आहे मी असं नाही वागू शकते, माझा नवरा माझा संसार मला लिमिट्स आहेत पण तरीही पण मन त्या लिमिट्सच्या अगदीच पार करण्याच्या टोकापर्यंत येऊन थांबतच आणि तिला संभ्रमात ठेवत आहे कि तू अजूनही चौकटीत आहेस .

मुळात मी हि कथा काढून टाकणार होती, कारण मी वाचली तेव्हा वाटलं कि जे पोहोचवायचं आहे ते नाही सहज पोहोचणार, कथेत सुधारणा हवी आहे
पण मी उथळपणाने पोस्ट केली आणि मला हा धागा दिलीत करता येत नाहीये...

डिलिट करण्याची गरज नाही. मी फक्त माझं मत दिलंय ते ही कथे बद्दल. तुम्हाला लेखक म्हणून नाउमेद करण्यासाठी नाही.

मनाची हीच दुसरी बाजू दाखवणे कथा लिहण्याचा मोटिव्ह होता, कि तिला आपण आपल्या चौकटीत आहोत असं वाटत असताना आपण तळ्यात मळ्यात करतो आहोत हे कळत नाहीये.>>>>ओक्के Happy

> तिला आपण आपल्या चौकटीत आहोत असं वाटत असताना आपण तळ्यात मळ्यात करतो आहोत हे कळत नाहीये. > ही चांगली कल्पना आहे. पण ती सध्याच्या कथेतून अजिबात जाणवत नाहीय.
धागा डिलीट करण्यापेक्षा कथाकल्पना ऑफलाईन इंप्रुव्ह करत रहा. आणि तुमच्या मनासारखी झाली की हा धागा संपादन करून इथेच टाका.अजून ३० दिवस आहेत ,हा धागा संपादीत करता येईल.

मी दुसरीकडे टाकलेले इथे सूट होतंय म्हणून
“We thought we were being mature when we were only being safe. We imagined we were being responsible but were only being cowardly. What we called realism turned out to be a way of avoiding things rather than facing them.”

“We thought we were being mature when we were only being safe. We imagined we were being responsible but were only being cowardly. What we called realism turned out to be a way of avoiding things rather than facing them.” >> a bare truth.

खुप सुंदररित्या दोघांच्या भावना संयमित शब्दात मांडल्या आहेत.
त्यागात खरे प्रेम असते आणि जिकडे हपापलेपण / आसक्ति असते ते मूळी प्रेमच नसते हे खुप छान अधोरेखित करणारी कथा आहे ही. थोडेसे टाइपो आहेत ते कृपया दुरुस्त करावेत.

मी थोड्या दिवसांनी हीच कथा वेगळ्या दृष्टिकोनाने पुन्हा टाकेन इथेच . . . सध्या थरारक वर काम चालूये आणि अजून एका सांगीतिक कथेवर ...