महाभारतातील व्यक्तिरेखा

Submitted by मेधाविनी घरत on 9 December, 2019 - 16:04

नमस्कार.

महाभारत हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे.

या महाकव्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा अत्यंत fascinating आहे. असे म्हणतात की "जे महाभारतात आहे ते सगळीकडे आहे आणि जे महाभारतात नाही ते कोठेही नाही."

वेगवेगळे पैलू असलेल्या व्यक्तिरेखा , विचारांना चालना देणाऱ्या अनेक घटना, भारतीय सभ्यतेच्या अनन्यसाधारण परिपक्व तेची ग्वाही देणारे प्रसंग , मानवी स्वभावाचे शेकडो नमुने यांनी समृद्ध असलेलं असे हे महाकाव्य.

महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल अनेकांनी आजतागायत लेखन केले आहे. मी जमेल तसे थोडेफार वाचले आहे. युगंधर आणि मृत्युंजय ही माझी personal favourite आहेत.

मी लेखक नाही. परंतु या महाकाव्यातील अनेक व्यक्तिरेखांबद्दल भरभरून बोलायला मला फार आवडते.

एक लेखमाला लिहिण्याचा मानस आहे. येथे प्रत्येकी एका पत्राबद्दल मला वाटणारे विचार आणि त्या पात्राचे महाभारतातील महत्त्व किंवा तत्सम ओघाने येणारे मुद्दे जसं सुचेल तसं लिहावं असा विचार केला आहे.

मला माहित आहे की विषय अनेकांना थोडा पुरोगामी वाटू शकतो.परंतु मला खरोखर हाच विषय मनापासून आवडतो.आज मायबोलीचे सदस्य असण्याला मला almost ७ वर्षे होत आली असावीत. इतक्या सक्षम लेखकांच्या भाऊगर्दीत स्वतः च्या अल्पमतिने काही लिहिण्याचे धारिष्ट्य होत नव्हते. शेवटी ठरवले आवडीच्या विषयावर लिहिते , मग अगदीच सुमार असेल तरीही किमान मला आनंद तरी मिळेल.

हे लेखन शक्यतो आध्यात्मिक पद्धतीचे नसून भौतिक पद्धतीचे असेल.म्हणजे साधारणपणे आपण महाभारतातल्या व्यक्तिरेखा २ पद्धतीने catagorise करतो.कौरवांची negative किंवा नकारात्मक बाजू आणि पांडवांची positive किंवा सकारात्मक बाजू.

परंतु येथे मी प्रत्येक व्यक्तिरेखेचा माणूस म्हणून विचार करण्याचा यत्न करणार आहे.म्हणजे ती व्यक्तिरेखा सुष्ट किंवा दुष्ट आहे हे गृहीत ना धरता ती एक माणूस म्हणून तशी का वागली, त्याला कोणती परिस्थिती कारणीभूत झाली, त्याचे काय परिणाम झाले आणि ती तशी वागली नसती तर महाभारताला वेगळी कलाटणी मिळाली असती का?

Interestingly महाभारतात प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे अगदी लहान असली तरी तिच्या मध्ये महाभारताला वेगळी कलाटणी देण्याचे सामर्थ्य होते. अर्थातच महाभारताचा महानायक जो भगवान वासुदेव श्रीकृष्ण आहे, त्याला सुप्रीम power आणि control होता. परंतु नीट विचार केला तर लक्षात येईल की अनेक व्यक्तिरेखाच्या निर्णयामध्ये महाभारताचा इतिहास बदविण्याकरीता सामर्थ्य होते.

उदाहणादाखल,
शंतनुने गंगेला नवव्या पुत्राची सुद्धा जलसमाधी देऊ दिली असती तर
कुंतीने कर्णाचे अस्तित्व पांडू राजाला आधीच सांगितले असते तर
द्रौपदीने कर्णाला वरले असते तर
कर्ण श्रीकृष्णाच्या किंवा कुंतीच्या विनंतीला मान देऊन पांडवांना सामील झाला असता किंवा तठस्त राहिला असता तर
कुंतीने कर्णाचे अस्तित्व पांडवांना सांगितले असते तर,

अशी अनेक उदाहरणे आहेत.

तर मी या सर्व पात्रांचा माणूस म्हणून विचार करून लिहण्याची प्रयत्न करणार आहे.कारण आध्यात्मिक विचार करण्याची परिपक्वता अजून आली नाही.आपण सर्वांनी वेळोवेळी त्यात भर टाकावी ही मनापासून विनंती.त्याने माझ्या कक्षा अधिक विस्तरतील.

माझ्या अल्पमतीने परंतु आनंदाने हा प्रयत्न करणार आहे. आपले सर्वांचे विचार आणि सूचना यांचे मनापासून स्वागत आहे.

लवकरच पहिला लेख टाकण्याचा प्रयत्न करेन.

आपल्या सर्वांचा आशिर्वाद असावा.

धन्यवाद.

क्रमशः.

Group content visibility: 
Use group defaults

जमल्यास परमहंस योगानंद यांनी लिहिलेली भगवद्गीता वाचावी. पुस्तकाचे नाव - God Talks with Arjuna. त्यामध्ये प्रथम अध्यायात त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेचा मानवी सद्गुण आणि दुर्गुणांशी तसेच काही काहींचा अध्यात्मिक संदर्भ लावला आहे आणि ते तसे का याचे स्पष्टीकरण पण दिले आहे. उदाहरणार्थ धृतराष्ट्र मानवी मनाचे प्रतिनिधित्व करते. धृतराष्ट्र आंधळा होता पुत्रप्रेमाने मोहित होता. योग्य अयोग्य माहित असूनदेखील पुत्रमोहापायी त्याने असत्याची बाजू घेतली. आपले मन सुद्धा कधी कधी असेच वागते. बुद्धी योग्य आणि अयोग्य याचे निर्णय देत असते पण मन ऐकत नाही. ते धृतराष्ट्र सारखे आंधळे आणि मोहित असते. दुर्योधन म्हणजे आपल्यामधल्या मदाचे प्रतिनिधित्व करते. श्रीकृष्ण अर्थातच परमात्माचे प्रतिनिधित्व करणारे. योगानंदांनी अगदी गंगा (भीष्माची आई), सत्यवती (भीष्माची सावत्र आई), गंगेने पाण्यात सोडलेले ७ वसू (भीष्माचे मोठे भाऊ) हे कशाचे प्रतिनिधीत्व करतात हेही दिलेले आहे. असेच कुंती, माद्री, पांडू, पांडव, द्रोणाचार्य, कृपाचार्य, १०० कौरव अश्या सर्वांबाबत सांगितले आहे. १०० कौरव म्हणजे मानवात वसलेले १०० दुर्गुण (१०० दुर्गुणांची लिस्ट दिली आहे पुस्तकात Happy ) आणि पांडवांची बाजू म्हणजे आपल्यात वसलेले सद्गुण. महाभारतातील व्यक्तिरेखा केवळ व्यक्तिरेखा नसून त्यांचे व्यक्तिमत्व मानवाच्या भौतिक अध्यात्मिक जीवनाशी साधर्म्य साधणारे आहे हा विचार त्यामागे आहे. महाभारताचे युद्ध म्हणजे केवळ व्यक्तिरेखेतले युद्ध नसून हे युद्ध आपल्या आत रात्रंदिवस चालू असते आणि शेवटी आपल्याला सद्गुणांच्या साहाय्याने दुर्गुणांवर विजय मिळवायचा असतो आणि आयुष्याचे युद्ध जिंकायचे असते. हे आयुष्यरूपी युद्ध कसे जिंकावे याचे श्रीकृष्णाने म्हणजेच परमात्याने केलेले मार्गदर्शन म्हणजेच गीता. महाभारतातल्या व्यक्तिरेखेबद्दल उत्सुकता असल्यास पुस्तकातला पहिला अध्याय नक्की वाचा. एक नवीन दृष्टिकोन नक्की मिळेल.

सुचनेबद्दल आभार सर.

आपला प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण आहे.

मला अश्याच माहितीपूर्ण प्रतिसादांची अपेक्षा आहे ज्यामुळे माझ्या अल्पमतीने आरंभलेल्या प्रयत्नांतून मलाही अधिक नवे विचार कळतिल.

आपण वेळोवेळी मार्गदर्शन करावे.

धन्यवाद.

आवडीच्या विषयावर लिहिते , मग अगदीच सुमार असेल तरीही किमान मला आनंद तरी मिळेल.
>>> सुंदर विचार... नक्की लिहा.. वाचणार...

उत्तम संकल्प. महाभारतावर जेवढे लिहाल तितके कमी आहे. Happy

शंतनुने गंगेला नवव्या पुत्राची सुद्धा जलसमाधी देऊ दिली असती तर>>>>>>> आठवा पुत्र होता देवव्रत उर्फ भीष्माचार्य. अष्टवसू जन्मले होते गंगेच्या पोटी. Happy

ह. पा. प्लस वन्न.

महाभारतातील प्राण्यांबद्दल ही लिहा मला फार कुतुहल आहे. अर्जुन आणि पोपटाचा डोळा ही माझी आ वडती कथा आहे. ती वाचून मोटिव्हेट होउन मी दहावीत चांगले मार्क मिळवले होते. बोरडात यायला फक्त सहा मार्क्स कमी पडले.

माझा लाडका मनुष्य एकच , धृतराष्ट्र.

आंधळा असून संसार , राज्य , 105 मुले सांभाळली, आणि इतके असून पुत्रप्रेमअंध म्हणून चिडवले गेले

( मग पंडु वनात का गेला होता? संभोग व पुत्रसुख मिळणार नाही , हा शाप मिळाला म्हणूनच ना ? पण त्याला मात्र पुत्रमोह होता असे लोक म्हणत नाहीत, गम्मतच)

इरावती कर्वेंचे - 'युगांत' हे अतिशय उपयुक्त पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे. महाभारतातील अनेक गूढ रहस्य आणि व्यक्ती यांबद्दल सखोल समीक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेली आहे त्यात.
उदा. - युधिष्ठिर यमाचा पुत्र कसा काय? गांधारीला १०० अपत्ये कसे शक्य?
मेधाविनी हे पुस्तक जरूर वाच.

Very excited for this series. Best luck.

मस्त विषय निवडलात. शुभेच्छा.
मला अर्जुनाचे वाचायला आवडेल. तो मला जवळचा वाटतो. त्यात मला नाझे प्रतिबिंब दिसते. तुम्ही काय लिहाल ते वाचण्यास उत्सुक Happy

मला अर्जुनाचे वाचायला आवडेल. तो मला जवळचा वाटतो. त्यात मला नाझे प्रतिबिंब दिसते. तुम्ही काय लिहाल ते वाचण्यास उत्सुक 

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 11 December, 2019 - 00:49
>>>
अर्जुनाला पोपट दिसायचा. याला धागे दिसतात. Happy

मला वाटतं महाभारत जर तुम्हाला पूर्ण समजले नसेल तर त्या भानगडीत पडूच नका.
वर कोण्ही उल्लेख केल्या प्रमाणे महाभारत मध्ये उल्लेख केलेली पात्र ही व्यक्ती नसून मानवाचे गुण अवगुण ची प्रतीक आहेत.
खूप खोलवर अर्थ दडले आहेत प्रत्येक प्रसंगात.
पूर्ण खोलवर अभ्यास करा आणि नंतर लिहा .
त्या मध्ये उथळपणा नसावा ही अपेक्षा .