घे मिठित अन्....

Submitted by किरण ..विहंग on 9 December, 2019 - 12:57

घे मिठित अन् रात्र हि दरवळून टाक ना
आसुसलेली आग तू शमवुन टाक ना....

पाहू कशाला सांग मी वाट श्रावणाची
आठवणींचे रान तू भिजवुन टाक ना.....

आता भास हि वाटतो तुझा खरा मला
बंद ओठांच्या कळ्या तू..उमलून टाक ना...

अंधारले चारही कोपरे खोलीत माझ्या
तुझ्यासवे आभाळ माझे उजळुन टाक ना...

कधी झाला होता का सागराशी एकरुप किनारा ..
परी लाटांचा ओझरता स्पर्श तू उधळून टाक ना

....किरण विकास कांबळे
(विहंग)

Group content visibility: 
Use group defaults

आवडली

जबरी
(मतला वाचल्यासारखा वाटतोय )