जाहिरात आणि सत्य

Submitted by Athavanitle kahi on 6 December, 2019 - 09:23

जाहिरात आणि सत्य

आजकालच्या काळात जाहिरात त्याची प्रसिद्धी लोकेशन ते प्रेझेंट करणाराही मॉडेल प्रेझेन्टेशन या सगळ्या वरती त्या प्रॉडक्टच्या 80 टक्के खर्च होतो आणि या सगळ्यामुळे तेच प्रॉडक्ट आपल्याला 80% महाग मिळते हे आपल्या लक्षातच येत नाही आणि अशा जाहिरातबाजीला आपण भुलून जातो

मी मॉलमध्ये होते दोन शाळकरी मुली काही क्रिम पहात होत्या, ती मॉडेल मला खूप आवडते आणि म्हणून मी हे क्रीम घेते असं त्यातील एक जण म्हणाली. आत्तापर्यंत त्यांनी अशी अनेक क्रीम्स बदलले असतील, प्रत्यक्षात दाखवतात त्याप्रमाणे किती जण खरोखरच सुंदर गोरी झाल आहेत? आणि हे खरं असतं तर अति श्रीमंतांच्या मुली काळ राहिल्यास नसत्या , काही ठराविक तेल वापरल्यामुळे टकला वरती केस उगव तात का ? फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही अनेक हिरोनचे केस आता कमी झाले आहेत, मग पाच-सहा हजार रुपये त्यांना नक्कीच न परवडणारे नसेल ना, एवढा छोटासा विचारही कोणाच्या मनात येत नाही आणि ही प्रॉडक्ट असंख्य संख्येने विकली जातात असंख्य नवीन ब्रँड बाजारात येतात. लोकांच्या मनाचा ठाव या जाहिरात कंपन्यांनी घेतलेला असतो. कधी ऑंटी अंकल असे आता कोणी म्हणणार नाही हे मनावरती ठसवून हेअर कलर्स विकले जातात, कधी हेल्दी हेल्दी म्हणून अनेक गोष्टी बाजारात येतात.

आमच्यासमोर एक टपरीवाला होता, त्याच्याकडे उत्कृष्ट चहा मिळत असे, त्याच्या चहाचा वास बाल्कनीतून माझ्या घरात येत असे, घरात चहा पावडर साखर दूध सगळेच असतानाही मला त्याचा चहा पिण्याची इच्छा होत असे, जणू तो मंद सुगंध हीच त्याची जाहिरात होती. त्यानंतर काही स्पेशल ब्रांड विशेष करून चहासाठी बाजारात आले, जागोजागी त्यांची नवीन दुकाने उघडली, कधी तंदुरी चहा कधी मसाला चहा अशी अनेक नावे घेऊन सजून हे चहा बाजारात आले, चहा वाल्यांच्या किमतीपेक्षा हे ब्रँडेड चहा महाग होते. तरीही पाच सहा महिन्यातच त्यांची विक्री वाखाणण्याजोगी होती. केवळ जाहिरात आणि सुंदर असे सजवून हे चहा प्रेझेंट केले जात होते.

जशी मागणी तसा पुरवठा हे वीपणन क्षेत्रातील ब्रीदवाक्य आता मागे पडते आहे असं वाटतंय, मागणीची निर्मिती केली जाते, नवीन नवीन गोष्टींचे आकर्षण निर्माण केले जाते, आणि त्यावर व्यवसाय केला जातो. या सगळ्याचं कॉस्टिंग काढलं तर आपल्याच खिशाला मोठा फटका बसलेला असतो. तुम्हीच विचार करा महिन्याला तुमचा आवश्यक गरजांवर किती खर्च होतो आणि अनावश्यक गरजांवर किती खर्च होतो. सहज जाता येता चांगलं दिसलं म्हणून कितीही गोष्टी घेतल्या जातात. सुंदर सजलेल्या शोकेस पुढे कितीवेळ रेंगाळले जातो. मग या सुंदर आभासी दुनियेत किती रमायचे, वेळ आणि पैसा किती खर्च करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीले आहे.
>>>>>>>तुम्हीच विचार करा महिन्याला तुमचा आवश्यक गरजांवर किती खर्च होतो आणि अनावश्यक गरजांवर किती खर्च होतो. >>>>> Sad खरे आहे.

विचार करायला लावणारा लेख; मी स्वतः अशा जाहिरातींना बळी पडले आहे
उदा द्यायचे झाले तर इंदूलेखा जाहिरात पाहून वापरले पण केस आणखीनच गेले

Sad
Happy
Lol

असे Light 1

बाकी सगळं ठीक आहे , फक्त जाहिरातीमुळे प्रॉडक्ट 80 % महाग होते ही आकडेवारी चुकली आहे ...निदान 100 ते 500 रु किमतीखालच्या वस्तूंसाठी ( साबण - शाम्पू - क्रिम - फिनाईल टाईप वस्तू )

जाहिरातीमुळे वस्तू जास्त संख्येने विकली जाते त्यामुळे ग्राहकाला कमी दरात देणं शक्य होतं . मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या वस्तू उदा . काही साबण , फेअरनेस क्रीम , चॉकलेट , थंड पेय इत्यादीच्या नफ्याच्या तुलनेत कितीही मोठा हिरो किंवा हिरोईन घेऊन केलेला जाहिरातीचा आणि चॅनेलला दिलेला खर्च हा नगण्य असतो .

महाग वस्तू म्हणजे हजारच्या पुढच्या , ती ब्रँडची किंमत असते .. ब्रँडबद्दल विश्वास निर्माण केला जातो मग ग्राहक आपापल्या ऐपतीप्रमाणे परवडणाऱ्या ब्रँडेड वस्तू घेतात ... ब्रँडेड वस्तू चांगल्या निघतात यात अगदीच तथ्य नाही असंही म्हणता येत नाही ... क्वालिटी चांगली हवी असेल तर थोडी जास्त किंमत मोजावीच लागते .. जरी प्रॉडक्शन कॉस्ट विक्री किमतीपेक्षा कमीच असणार हे माहीत असूनही .... नाहीतर वेगवेगळी प्रॉडक्ट वापरून कमी किंमतीत चांगली क्वालिटी देणारा ब्रँड शोधायचा , बरेचसे मध्यमवर्गीय ग्राहक तेच करतात ... काहीजणांचा काही ठराविक गोष्टींच्या बाबतीत ब्रँडचा आग्रह असतो , कोणासाठी शाम्पू असेल , कोणासाठी रिफाईंड ऑइल ...

बाकी करीना , कतरिना 50 - 100 रुपये किमतीचा साबण किंवा 700 रुपये किमतीचं क्रीम वापरत असतील हे मानणाऱ्यांंना काय कर्म सांगणार ...