डर - शाहरुख

Submitted by राधानिशा on 4 December, 2019 - 23:49

डर सिनेमातल्या शाहरुखशी जर जुहीने लग्न केलं असतं तर काय झालं असतं ? लहानपणी तो सिनेमा पाहताना वाटायचं की जर जुहीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला असता तर तो सुधारला असता , तिच्याशी प्रेमाने वागला असता , दोघे एकमेकांबरोबर सुखी झाले असते ... अर्थात त्याचं वागणं चूक आहे , तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटणं आहे आणि त्याला स्वीकारायला ती अजिबात बांधील नाही , वगैरे सगळं कळायचं ... पण शाहरुखमुळे त्या पात्राबद्दल सहानुभूती वाटायची ...

पण नंतर हळूहळू वाटू लागलं की " केलं जरी तिने लग्न तरी हा नीट वागेल का ? की सतत वर्चस्व गाजवू पाहील तिच्यावर ? सतत संशय घेत राहील ? इथे जा , तिथे जाऊ नको , ह्याच्याशी बोलू नको , मला न सांगता कुठे जायचं नाही , मी सांगतो तसेच कपडे घालायचे , कुणाशी बोलायचं नाही .... ऑबसेस्ड प्रकारचं त्याचं प्रेम वाटत होतं , निखळ - त्या व्यक्तीचा आदर राखणारं नाही , स्वार्थी .... तेव्हा बाय चान्स जुहीने त्याला संधी दिलीच असती तर तो खरा उतरू शकला असता का की निराशाच केली असती तिची ?"

काही वर्षांपूर्वी "दिल से दी दुवा सौभाग्यवती भव" नावाच्या मालिकेत करणवीर बोहराने अशा ऑबसेस्ड नवऱ्याची भूमिका साकारली होती ... पण त्याला बायकोला दहशतीखाली ठेवण्यात विकृत आनंद मिळताना दाखवला होता . शाहरुख बहुतेक खरोखर दुःखी झाला असता पण " मैं तुम्हारे भले के लिये ही कर रहा हूं " किंवा "मी हे प्रेमापोटीच करत आहे" ह्या निमित्ताखाली त्याने लग्नानंतरही जुहीचं या ना त्या मार्गाने भरपूर मानसिक शोषण केलं असतं ... स्वतःही भरपूर मनस्ताप करून घेतला असता आणि तिलाही भरपूर दिला असता . कारण डोक्यात असा बिघाड असलेली माणसं इच्छित गोष्ट प्राप्त झाल्यावरही फार काळ आनंदी - समाधानी राहू शकतील असं वाटत नाही ...

पण तरीही शंका वाटतेच की जुहीने त्याचं प्रेम स्वीकारलं असतं तर त्याचं मानसिक संतुलन ठिकाणावर आलं असतं का ? तो एक चांगला माणूस , चांगला जोडीदार बनला असता का ? ठोस काही सांगता येत नाही .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू हा कर
या ना कर
तू है मेरी किरन

पण तरीही शंका वाटतेच की जुहीने त्याचं प्रेम स्वीकारलं असतं तर त्याचं मानसिक संतुलन ठिकाणावर आलं असतं का ? >>> जुहीचा बळी कामून द्यायचा हो?

radhanisha, तुम्ही आतापर्यंत लिहिलेल्या लेख आणि प्रतिक्रियांमध्ये कदाचित हा सर्वात छोटा लेख असावा. त्यामुळे मी संपूर्ण वाचू शकलो (तो माझा दोष समजा). हुश्श!

ह्या प्रश्नाचं उत्तर लेखापेक्षा मोठया प्रतिसादात ऋ देईल ना . तुम्ही त्याला विपु केली असती तरी चाललं असतं.

{{{ डर सिनेमातल्या शाहरुखशी जर जुहीने लग्न केलं असतं तर काय झालं असतं ? }}}

जुहीच्या जागी माधुरी इतकाच फरक करा आणि हम तुम्हारे है सनम हा सिनेमा पाहा.

> तरी हा नीट वागेल का ? की सतत वर्चस्व गाजवू पाहील तिच्यावर ? सतत संशय घेत राहील ? इथे जा , तिथे जाऊ नको , ह्याच्याशी बोलू नको , मला न सांगता कुठे जायचं नाही , मी सांगतो तसेच कपडे घालायचे , कुणाशी बोलायचं नाही .... ऑबसेस्ड प्रकारचं त्याचं प्रेम वाटत होतं , निखळ - त्या व्यक्तीचा आदर राखणारं नाही , स्वार्थी > फिफ्टी शेड्समधला नायक?

डरमध्ये जूहीने शाहरुखशी लग्न केलं असतं तर माझ्यासारखे प्रेक्षक भविष्यातील शाखाच्या सायको/ मेंटल अँक्टींगपासून वाचले असते आणि त्याच्यावर पूर्ण बहिष्कार टाकण्याइतका इतका डोक्यात जायला लागला नसता.

शाखाच्या सायको/ मेंटल अँक्टींगपासून वाचले असते आणि त्याच्यावर पूर्ण बहिष्कार टाकण्याइतका इतका डोक्यात जायला लागला नसता.
>>>>>>

त्या भुमिकेची गरज होती सायको मेंटल ॲक्टींग.

त्याच्यासोबत सनीदेओलही होता चित्रपटात आणि तो देखील त्याच्या सूटेबल ॲक्शन रोलमध्ये. तरीही डर म्हटले की शाहरूख खानच आठवावा ईतके शाहरुखने सनीला खाऊन टाकले. सनी तेव्हा मोठा ॲक्शनस्टार होता आणि शाहरूख नवखा हे विशेष.

आज ईतक्या वर्षांनी जर असे झाले असते तर कसे झाले असते हा प्रश्न लोकांना पडावे ईतकी ती भुमिका शाहरूखचने अजरामर केली.

पुढे डर अंजाममध्ये नकारात्मक प्रेमाच्या भुमिका निभावणारा हाच शाहरूख कभी हा कभी ना, दिल तो पागल है, डिडीएलजे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, मोहोब्बते, वीरझारा आणि अश्या कैक चित्रपटांतून रोमान्सचा बादशाह अशी ईमेज करतो तेव्हा मागे वळून पाहताना त्याच्याबद्दलचा आदर आणखीनच दुणावतो.

..
..

क्रमश:

शाहरूखवर बहिष्कार हा एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. कारण तसे झालेच तर तो एक अमॅनवीय प्रकार ठरेल.
यूह कॅन हेट हिम, यूह कॅन लव्ह हिम, बट यूज जस कॅनॉट इग्नॉर हिम...
त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार जरी कोणी केला तरी चित्रपटप्रेमी जनता त्या माणसावर बहिष्कार टाकेल.

..

क्रमश:

Kaka Aale.

शाहरूख जुहीचे लग्न झाले असते तर...
तो सुधारलाच असता वा सुधारलाच नसता यापैकी ठामपणे काहीही बोलू शकत नाही.
अमुकतमुक व्यक्ती अशी आहे तर ती आयुष्यभर अशीच राहणार वा पुढे जाऊन अशी होणार असे कोणीही म्हणत असेल तर ते त्याचे पर्सनल ओपिनियन झाले. त्याला फॅक्ट म्हणत नाहीत.

पर्सनली मला जुहीचे लग्न सनीबरोबर झाले याचे वाईट वाटले. सनीला त्या चित्रपटात शाहरूखने पुरते खाऊन टाक्ल्याने तो हिरोईन डिझर्व करतोय असे वाटले नाही. सनी त्या चित्रपटात हिरो नाही तर सहाय्यक कलाकारच वाटला. त्यामुळे सपोर्टींग ॲक्टरने मेन हिरोईन गटवली असे एक फिलींग आले.

शाहरूख मेला याचे मात्र वाईट वाटले. याने त्या चित्रपटाचा सिक्वेल बनायची आशा लोप पावली..

..

पुढचे उद्या लिहितो....
शुभरात्री....

Kaka Aale.
जय जय शिव शंकर काटा लगे ना कंकर की काकाकाका किरण Happy

ऋन्मेषचा काय संबंध इथे? शाहरुखला बोललं की ऋन्मेषला राग यायला तो त्याच्या फॅमिलीतला आहे का?
मला येते खरंच शाहरुखची चीड. त्याचे पिक्चर बघणं कोणे एके काळी थांबवलं आहे.

मला आधी शाहरुख खूप आवडायचा. कारण त्याचेच चित्रपट दूरचित्रवाणीवर पाहायला मिळायचे. करण जोहर चे चित्रपट म्हणजे निव्वळ करमणूक. त्यात शाखा म्हणजे ऊर्जा स्रोतच चित्रपटाचा.

आताशा नाही आवडत. करण जोहरचा चित्रपटही नाही आणि शाखाही नाही. पण शाखाचे आधीचे चित्रपट अजूनही छान वाटतात बघायला. मग कारण लिखाण असो, टोकाचा अति अभिनय असो, संगीत, मसाला असो किंवा कथेची रोचकता असो...... तेव्हाचे चित्रपट आणि आत्ताचे चित्रपट यात जमिन-आकाशाचं अंतर आहे. (हे सगळ्याच चित्रपटांना लागू होतं.)

Ddlj ???

शाहरुखला बोललं की ऋन्मेषला राग यायला तो त्याच्या फॅमिलीतला आहे का?
>>>>

क्रमांक १ - मला याचा राग नाही येत. शाहरूख काय ज्यांना मी नाही आवडत वा जे मला काही बोलतात त्यांचाही मला राग येत नाही. तर शाहरूखला कोणी काही बोलले तर मी का त्रागा करून स्वत:च्या जीवाला मनस्ताप करून घेऊ? मी चर्चेत उतरतो ते मला मजा येते म्हणून. मी शाहरूखवर प्रेम करतो. आणि प्रेम हे कधीच त्रासदायक नसते. ते आनंदच देते. त्रासदायक तर द्वेष असतो.

क्रमांक २ - आपल्या फॅमिली मेंबरला कोणी काही बोलले तरच लोकांना राग येतो असे तुम्हाला वाटत असेल तर ते सपशेल चूक आहे माय लॉर्ड !
आजूबाजूला बघा लोकं कसे आपल्या आवडीच्या कलाकारांवरून, आदरणीय नेत्यांवरून, श्रद्धास्थानांवरून. ऐतिहासिक व्यक्तींवरून एकमेकांशी भांडत असतात. अरे ज्याला कधी कोणी पाहिले नाही त्या देवालाही कोणी काय बोलले तर दंगली होतात तर तुम्ही फॅमिली मेंबरचा रुल कुठून आणलात हे मला कळत नाही.

धाग्याच्या नावात शाहरुख असलं तरी त्याच्या अभिनयाबाबत चर्चेचा हेतू नव्हता .. ती झाली तर ठीकच आहे .. पण चित्रपट हा चित्रपट नसून खरी कथा आहे असं क्षणभर समजलं तर हा माणूस पुढे कसा वागेल ; जर नायिकेने त्याचं प्रेम स्वीकारलं तर - याबाबत इतरांची मतं जाणून घ्यायची इच्छा होती .

पर्सनल ओपिनियनला फॅक्ट म्हणत नाहीत पण दहा जणांचं एखाद्या बाबतीत एकमत झालं तर आपली शंका दूर व्हायला मदत होऊ शकते .. ऑडीयन्स पोल .

शाहरुखच्या कॅरॅक्टरचं जुहीच्या कॅरॅक्टरशी लग्न झाल्यावर जे होऊ शकतं त्याची एक शक्यता अग्निसाक्षी मध्ये पाहायला मिळाली.

DDLJ, राजू बन गया, येस बॉस हे सगळेच सिनेमे आवडले होते पण त्यातला शारुख नव्हता आवडला.
तो जेव्हा जेव्हा (म्हणजे बऱ्याचदा) ओव्हरऍक्टिंग करतो तेव्हा आवडत नाही.
तेच मी उल्लेख केलेले तीन सिनेमे बघितले तर 'याला इतका चांगला अभिनय येत असताना हा त्या चोप्रा-जोहरच्या नादी लागून उगाकायतर का करत बसतो?' वाटतं.
डिअर जिंदगी पाहिला नाही. आलिया अजिबात आवडत नाही.

याला इतका चांगला अभिनय येत असताना हा त्या चोप्रा-जोहरच्या नादी लागून उगाकायतर का करत बसतो?' वाटतं.> अगदी बरोबर आहे. पण व्यावसायिक गणितं असतील ना.
आलिया आवडत नसली तरी राझी आणि हायवे बघाल तर कदाचित किंचित आवडेल ती. :स्मित :

> अगदी बरोबर आहे. पण व्यावसायिक गणितं असतील ना. > व्यावसायिक गणितपेक्षा मैत्रीपूर्ण नात्यामुळे, जेव्हा तो नवखा होता तेव्हा या 'ब्रँड' नावांनी त्याला पोस्टर बॉय केल्याने तो त्यांच्यासोबत काम करतो असे वाटते. एका मुलाखतीत तो म्हणालादेखील होता मी सिनेमा पैशांसाठी नाही करत, नात्यांसाठी करतो, पैसा मला जाहीरातीतून मिळतो.

> आलिया आवडत नसली तरी राझी आणि हायवे बघाल तर कदाचित किंचित आवडेल ती. :स्मित : > हायवे, 2 स्टेट्स बघितले आहेत. आणि यापुढे आलिया असलेला सिनेमा बघणार नाही ठरवलं.

>>पण तरीही शंका वाटतेच की जुहीने त्याचं प्रेम स्वीकारलं असतं तर त्याचं मानसिक संतुलन ठिकाणावर आलं असतं का ? तो एक चांगला माणूस , चांगला जोडीदार बनला असता का ? >>
'नाही' . स्त्रीचा/पुरुषाच 'नकार' पचवता न येणारी व्यक्ती चांगला जोडीदर होवू शकत नाही. एकतर्फी प्रेम आहे ठीकच. पण नकार आल्यावर तो स्विकारता आला पाहीजे.
'अबक' चे मानसिक संतुलन ठीक नसेल तर ते सुधारण्यासाठी 'क्ष' व्यक्तीने त्याच्याशी लग्न करायच? कैच्याकै! वैद्यकीय उपचारांनी फरक पडला असता का? माहीत नाही पण होकाराने वर्तन सुधारले नसते एवढे नक्की!