त्याचीच ती :३

Submitted by रिना वाढई on 3 December, 2019 - 00:31

कुठल्याही मुलीला आपल्या स्वप्नातला राजकुमार मिळणे म्हणजे जगातील सगळ्या सुखांपेक्षा काही कमी नसेलच वाटत .
आयशाला आपल्या स्वप्नातला राजकुमार मिळाला होता . खुल्या डोळ्याने ती आता अर्जुनचे स्वप्न बघू लागली .
अर्जुनच हि काही असच हाल होत . त्याच्याही मनात सतत आयशाच येऊ लागली होती .
उन्हाळ्याचे दिवस असतात . सगळीकडे लग्नांना पूर आलेला असतो . गावात प्रत्येक दुसऱ्या दिवशी कुणा ना कुणाच्या लग्नाचं मुहूर्त असतेच .
आयशा ला सुट्ट्या लागले असतात तर अर्जुन ला हि पंधरा दिवसाच्या सुट्ट्या असतात .
आयशाच्या आतेबहिणीच लग्न असते , हळदीच्या दिवशी सगळे दिवसभराचे काम आटोपून सायंकाळच्या वेळेस हळदीचा कार्यक्रम असा बेत असतो .आयशा ने त्या दिवशी पिवळ्या कलरचा ड्रेस परिधान केला असते .
तो कलर तिच्यावर अजूनच उठून दिसत असतो . सगळ्यांना हळद फासून झाल्यावर ती गच्चीवर कुणी आहे का ते बघायला जाते , तोच अर्जुन तिथे मित्रांसोबत असतो .
अर्जुनच्या मित्रांना यांच्याबद्दल काहीच माहिती नसते , म्हणून आयशा आली तरी त्यांना काही वाटत नाही . सगळे खाली जातात आता गच्चीवर फक्त अर्जुन आणि आयशा दोघेच असतात .
आयशा आपले हळदीने माखलेले हात घेऊन अर्जुन जवळ जाते तोच अर्जुन तिचे हात घट्ट पकडून घेतो . तिच्या खूप म्हणण्याने तो तिचे हात सोडतो .
ती आपल्या अर्जुन ला हळद लावते आणि खाली जाणार असते तर अर्जुन तिला थांब थोड्या वेळ म्हणतो .
उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे सायंकाळच्या वेळेस वारा सुटलेली असते . आयशा चे दोन्ही हात हळदीने भरले असतात , केस मोकळे सोडल्याने त्या वाऱ्याच्या हवेने तिचे केस चेहऱ्यावर येत असतात .
ती अगदीच आपली मान झटकून ते केस मागे ढकलण्याचा प्रयत्न करते मात्र असफल .
अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस आपल्या हातानी मागे करतो . अर्जुनच असं जवळ येणं म्हणजे एखाद्या कळीचं आपसूकच फुलणं .
आयशाच हि तसंच होत . तो तिच्या जवळ आला कि तिचा श्वास आपोआपच वाढत होता . हृदयाचे ठोके जलद गतीने धडधड करत होते .
ती एक पाऊल मागे सरकते . "आयशा बस ना इथे थोडा वेळम्हणतो " , अर्जुन तिला बसवतो . ती गच्चीवर खालीच बसते आणि अर्जुन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो .
खाली सगळे असतात पण हे दोघे मात्र एखाद्या प्रेमीयुगुलांसारखे एकमेकांत हरवलेले असतात . कुणी आपल्याला इथे बघेल काय हि शंका सुद्धा त्यांच्या मनात येत नाही .
ती हवा , आकाशात पडलेले चांदणे आणि त्या झाडाआडून त्यांना बघणारा तो चंद्र . हे सगळेच त्यांच्या प्रेमाची साक्ष असतात .
अर्जुन - आयशा , प्रेम करून लग्न करावंच लागते काय गं ?म्हणजे आपल्या घरच्यांनी होकार दिला तर उत्तमच पण , जर का त्यांना आपला नातं नाही आवडला तर ?
आयशा - आपण घरच्यांशी बोलून बघू , ते नक्कीच होकार देतील आपल्या प्रेमाला . पण एक गोष्ट लक्षात ठेव , जर का त्यांनी आपल्याला नकार दिला तर मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय .
अर्जुन तिचे हे वाक्य ऐकून गोंधळतोच . त्यालाही तिच्याशी लग्न करायचं असते पण घरच्यांच्या विरोधात नाही . आयशा मनाने खूप हळवी आहे हे अर्जुनला चांगलंच माहित असते .
तिचे मन ठेवण्यासाठी फक्त हो "मी तुझाच आहे " असं तिला समजावत असतो .
त्याच्या मनात मात्र एक भीती असतेच कि समोर काय होणार .
पण आता यावेळेस हे असले विचार मनात आणून त्याला आयशा ला दुखवायचं नसते . तो क्षण त्यांच्यासाठी खूप खास असतो .
माझ्या डोक्यात हात घालून कुरवळ ना आयशा - अर्जुन
ती त्याच्या डोक्यात हात घालून कुरवाळत असते , दोघेही काही न बोलताच एकमेकांचा सहवास अनुभवत असतात आणि तेवढ्यात साहिल अर्जुन ला आवाज देत वर येतो .
साहिल हा अर्जुन च्या काकाचा मुलगा असतो . तो हि आयशा एवढाच आणि तिच्याच क्लासमध्ये . ते आवाज ऐकून उठतात पण तोपर्यंत साहिल गच्चीवर आलेला असतो . त्यांना दोघांना हि पाहून साहिल ला थोडं आश्यर्य वाटतो . त्याला जे समजायचं ते समजून तो , "दादा तुला खाली शोधत आहे सगळे आणि तू इथे काय करतोस म्हणून विचारतो ". त्याच्या त्या प्रश्नाचं कसतरी उत्तर देऊन अर्जुन साहिल ला घेऊन खाली जातो .
इकडे आयशा मात्र जाम घाबरलेली असते , "साहिलने आम्हा दोघांना इथे पाहिलं , आता तो घरी सांगेल तर काय होईल आमचं". आयशा सुद्धा खाली येते .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users