महाराष्ट्र विधानसभा 2019

Submitted by धमाल धवल on 30 November, 2019 - 10:58

विधानसभा 2019

नमस्कार मित्रमंडळी विधानसभा 2019 मध्ये महाराष्ट्रात ज्या घडामोडी काही महिन्याभरात झाल्या आहेत त्या घडामोडींचा आढावा घेण्याचा मी मी प्रयत्न करणार आहे आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया समीक्षेच्या रुपात द्याल अशी विनंती.
वाचक मंडळी विधानसभा 2019 महाराष्ट्र विधानसभा म्हणाला गेलो याबाबतीत भाष्य करायचं म्हणलं तर निवडणूक आयोगाने जेव्हा विधानसभा 2019 तारखा घोषित केल्या तेव्हापासून विधानसभेच्या निवडणुकीबद्दल चे राजकारण प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये सुरू झाले होते. विधानसभा 2019 मध्ये उभे असणारे चार प्रमुख पक्ष सत्तेत असणारे भाजप आणि शिवसेना आणि आणि मी पक्षी बाकांवर बसणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विधानसभेसाठी आघाड्या झाल्या. निवडणूक आयोगाने सांगितले की 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निवडणुका होतील आणि दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना-भाजप युती करून लोकांसमोर आले आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महाराष्ट्राच्या समस्त जनतेसमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते 24 तारखेचा अवघ्या महाराष्ट्राने पुन्हा एकदा बीजेपी आणि शिवसेना युतीची सरकार यावी या बाजूने कौल दिला होता. परंतु भाजपाचे मित्रपक्ष युतीचे सहकारी शिवसेनेस भाजपचा मुख्यमंत्री नको होता आणि तेव्हा शिवसेनेने सांगितले की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल परंतु राजकारण मला तरी कळत नाही असे असे मला वाटते ज्या पक्षाचे जास्त उमेदवार असावेत त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असतो असे गणित असणार मी जर काही चुकीचं लिहीत असेल तर नक्कीच मला दुरुस्त करा. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सर्वप्रथम शिवसेना आणि बीजेपी यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली नाही. आता येथे कोण बरोबर कोण चुकीचे हे आपण सगळे जाणतातच भाजप आणि शिवसेना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेणे आवश्यक होते. महाराष्ट्राच्या जनतेने बीजेपी शिवसेना युती कौल दिला होता परंतु आजची परिस्थिती काही वेगळीच आहे. तिकडे राज्याचा शेतकरी वणवण भटकत आहे अवकाळी पावसामुळे असो किंवा दुष्काळामुळे असो माझ्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई कशी होईल हे न बघता हे चारही पक्ष आपल्या आपल्या पोळी कशा भाजून घेता येईल त्याबाबतीत बैठका करत असून शेवटी जनतेने दिलेल्या कलचा अवमान करून त्रिशंकू सरकार बनवली असून माझी शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट ज्यांना म्हणतो त्या बाळासाहेबांना याबाबतीत काय वाटले असते जर ते आता या या स्थितीत तिकडे असते. हेही तितकेच खरे आहे की बाळासाहेब असते तर ही परिस्थिती धावलीच नसती. आता तर आता थोडेसे मागे जाऊया आज पासून चार-पाच दिवसांपूर्वी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बैठका सुरू होत्या आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असे ठरले दुसऱ्याच दिवशी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यपालांकडे जाऊन आपले पत्र राज्यपालांना देणार होते इकडे मला म्हणायचे आहे की सत्य स्थापनेबाबत चे पत्र. तर यात असे घडले की जातो रात्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत कसे व कुठून प्राप्त झाले हा प्रश्न मला. बाय शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नेमके कोणाच्या बळावर ही ही सरकार स्थापित झाली? हा प्रश्न आपणा सर्वांना पडला असेल हेच प्रकरण दुसऱ्या दिवशी कोर्टात घेऊन गेल्यावर कोर्टाने याच्यावर दोन्ही पक्षांची मते ऐकण्याचे ठरवले. आपणास सांगण्यास आश्चर्य वाटत आहे की या प्रकरणावर रजेच्या दिवशी देखील रविवारी आदरणीय सर्वोच्च न्यायालय सुरू ठेवण्यात दिवस सलग आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या व मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. भाजप आपले बहुमत सिद्ध करू शकणार नाही हे कळल्यावर तत्कालीन सरकारमधील उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. इथे लिहिताना अजित पवारांनी विषयीचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे एक वाक्य मला आठवत आहे राज ठाकरे म्हणाले होते की अजित पवार यांच्या डोक्यावरून त्यांचे काका शरद पवार यांनी हात काढून घेतले तर अजित पवार याला कुत्रा देखील विचारणार नाही. वरील वाक्य माझे नसून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आहे त्यांचे भाषण तुम्ही पाहू शकता. आता राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली कोर्टाचा निकाल आल्यावर त्रिशंकू सरकार स्थापित झाले मुख्यमंत्री पदी आमदार म्हणून देखील निवडून न आलेले सध्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवाजी पार्क येथे सहा वाजता येतील. आल
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अगदी रेकॉर्ड ब्रेक तीन दिवस आठ तासांची ही सरकार पडली तर आता मित्रांनो आणि मैत्रिणींनो या सत्य स्थापनेचे दूरगामी परिणाम काही पक्षांना भोगावे लागतील असे मला वाटत आहे. काही पक्षांनी सत्तास्थापनेसाठी आपला स्वाभिमान देखील बाजारात विकून टाकल्याचे या राजकारणात दिसून आले तर काही पक्ष आपली गुर्मी न सोडता त्यांच्या मतांवर थांब असल्याचे देखील दिसून येते. अखेरीस नवनिर्वाचित सरकारला माझ्याकडून खूप खूप खूप शुभेच्छा देतो.

समर्थ

dhaval Trivedi

हॅलो फ्रेंड्स तर माझे विचार आपणास कसे वाटले ते नक्कीच आपल्या समीक्षेच्या माध्यमाने सांगा लिखाणात चुका असतील तर कृपया समजून घ्यावे.. हा लेख लिहिण्यासाठी मला आपल्या प्रतीलीपी ॲप वरील भगवान भैय्यासाहेब यांनी सुचवले आणि जे माझ्या मनाला वाटले ते मी मी लिहून काढले आहे तर आता माझ्या लेखाबद्दल आपणच प्रतिक्रिया द्याव्यात अशी विनंती करतो आणि थांबतो

, Edit box, यहाँ लिखें

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली सारख्या एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर माझ्या पहिल्याच लेखणीला लेखणी वर आरोप होतील हे वाटलं नव्हतं पण जावेद खान जी मी कॉपी पेस्ट नक्कीच केलेले नाहीये गूगल ट्रांसलेट ही केलेले नाहीये तुम्ही माझ्या प्रतिलिपी चा अकाउंट वर जाऊनही वाचू शकता सेवा हेच मी प्रतिलिपी वरही लिहुन टाकलेल आहे आणि लेखनात चुका आहेत माझ्या हे मान्य करतो दृष्टिहीन असल्याकारणाने एडिटिंग करताना खूप त्रास होतो परंतु जेवढे होऊ शकेल तेवढी लिहिण्याचा प्रयत्न असतो आणि वरती अजून एक कमेंट आहे त्यांनी चाणक्य समजलेला आहे नक्कीच मी चाणक्य नाहीये मला जे वाटत होतं ते मी लिहिले आहे आणि काल दुपारी ज्या घडामोडी झाल्या नाटके घडामोडी सभागृहात बीजेपी ने सभात्याग केला त्याच्यावर देखील लिहायची इच्छा होती पण आता अशा आरोप होत असतील तर कुणाला लिहावसं वाटेल? यापुढे ज्याच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रीया येतील त्यांना धन्यवाद नेगेटिव प्रतिक्रियांचे पण स्वागत आहे आणि या पोहे मायबोलीवर मी काहीच लिहिणार नाही

छान लिहिलंय तुम्हीं आणि निगेटिव्ह प्रतिसादला घाबरून लिहायचं सोडू नका .मायबोली हे खूप छान व्यासपीठ आहे लिहीत राहा .इथे असे अनुभव येतातच
पुलेशु

धन्यवाद आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया बद्दल आणि एवढी मेहनत करून लिहायचं आणि शेवटी म्हणणार कॉपी-पेस्ट गूगल ट्रांसलेटर तर हे कितपत योग्य वाटतं?

विचित्र विचारांचा भुगां भिरभिरतोय

उगाच कोणाच्याही कानात गुरगुरतोय

विचारांच्या विचारात स्वतः घुटमळतोय

आडात नसता पोह-यात हुशारी पाझरतोय

वरील शब्द कोणालाही उद्देशून लिहिले नाही हे लक्षात घ्यावे.......

धमाल धवल …….. छान लिहिलंय तुम्हीं

फक्त वरील चारोळी मनात ठेवा

दृष्टिहीन असल्याकारणाने एडिटिंग करताना खूप त्रास होतो परंतु जेवढे होऊ शकेल तेवढी लिहिण्याचा प्रयत्न असतो >> हॅट्स ऑफ तुमच्या प्रयत्नांना.
तुम्ही आंतरजालावर वाचणे आणि लिहिणे कसे जमवता? तुमच्या ह्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायला नक्कीच खूप आवडेल.

नमस्कार उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल मायबोलीकरांची क्षमा मागतो हो हे खरे आहे विचारांचा भुगा झाला आहे डोक्यात बरच काही लिहावसं वाटत आहे परंतु अडचणीमुळे लिहिता येत नाही खूप खूप धन्यवाद यतीन जी

दृष्टिहीन असल्याकारणाने एडिटिंग करताना खूप त्रास होतो परंतु जेवढे होऊ शकेल तेवढी लिहिण्याचा प्रयत्न असतो >> हॅट्स ऑफ तुमच्या प्रयत्नांना.
तुम्ही आंतरजालावर वाचणे आणि लिहिणे कसे जमवता? तुमच्या ह्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायला नक्कीच खूप आवडेल.

नमस्कार तुम्हाला प्रतिसाद देताना आनंद होत आहे की आपण पण माझ्या प्रयत्नांना आपल्या शब्दांनी खूप चांगलं म्हटले आहे लिखाणात चुका होतात आपण मला विचारले आहे की आपण या प्लॅटफॉर्मवर वाचणे व लिहिणे कसे जमवता तर याच्याबद्दल लिहिताना खूप खूप मोठा प्रतिसाद द्यावा लागेल मी याबद्दल एक सविस्तर लेख लिहिण्याच्या विचारात आहे स्क्रीन रीडर च्या माध्यमाने कम्प्युटर संगणक वापरायला अडचण येत नाही आता तर अँड्रॉइड फोनवर देखील स्क्रीन रीडर उपलब्ध असल्याकारणाने आम्हास अडचण येत नाही स्क्रीन रीडर च्या माध्यमाने एडिटिंग करताना खूप अडचणी येतात हा प्रतिसाद जर मायबोलीचे व्यवस्थापक वाचत असतील तर त्यांना माझी विनंती असेल आपण मायबोली अँड्रॉइड ॲप दृष्टिहीन आन करिता अजून सोयीचे करता येईल असे बदल अपेक्षित आहे वाचक मित्रमंडळी आपण मायबोलीशी कसे संपर्क साधावे याबद्दल जर कुणी माझे मार्गदर्शन केले तर अति योग्य होईल धन्यवाद

नमस्कार मायबोलीकरांन धवल धमाल जवलचा सादर नमस्कार आपण कोणी सांगू शकाल का किमी मी मायबोली एप्लीकेशन व्यवस्थापकांशी कसा संवाद साधू शकतो धन्यवाद?