त्याचीच ती :२

Submitted by रिना वाढई on 30 November, 2019 - 02:19

अर्जुन एका खासगी शाळेत शिक्षक असतो .
सीमा , दादा मला एक assignment पूर्ण करायचं आहे तू मदत करशील का आज रात्री .
सीमा तुला कितीदा सांगितलं, तुझे काम तू स्वतः करत जा . जर गरज पडलीच तर मी नक्की करेल तुझी मदत .
बरं बरं राहू दे . तू काय मदत करशील माझी , त्या आयशा ला मदत करायला बरच जमते रे तुला .
सीमा अर्जुन पेक्षा लहान होती पण इतकीही नाही, कि ती त्याच्या मनातलं ओळखू शकणार नाही . म्हणून ती काही ना काही कारणाने सतत त्याला चिडवत असायची .
अर्जुनलाहि आयशा आवडू लागली होती, पण तो मान्य करेल तर अर्जुन कसला .
सीमा च्या चिडवण्याने त्याला कुठेतरी आपली चुकी होत आहे हे जाणवत होत .
आपणच समजा ह्या प्रेमाच्या चक्कर मध्ये पडलो तर आपल्यापासून आपली लहान बहीण काय शिकेल ?
नाही नाही , मला हे जमणार नाहीच. मी माझ्या घरच्यांच्या नजरेत एक आदर्श मुलगा आहे आणि तो आदर्श मला तसाच जपून ठेवायचा आहे .
तशी ती खूप चांगली मुलगी आहे पण आपल्याकडे समाजात ह्या प्रेम नावालाच लोक काहीतरी नाव देऊन उगाच त्याचे काड्या करतात . यामध्ये नाही पडलेलंच बरं . अर्जुन स्वतःशीच बोलत होता .
पण कितीही झालं तरी शेवटी तो हि एक मुलगाच होता आणि मन त्यालाही होत . त्याच्या दिमाखाने जरी प्रेमाची कबुली नव्हती दिली तरी मनाचं काय ? मन तर तिच्याच आठवणीत व्याकुळ होत .
मग काय तडक उठला आणि बाहेर गेला . आज जरा फिरून यावं असं त्याला वाटलं . तो बाहेर निघाला तोच त्याला आयशा भेटली .
हाय आयशा , आता कुठे निघालीस . अर्जुन
अ रे आताच जेवण झालं, तर थोडी बाहेरची हवा खावी म्हटलं , म्हणून बाहेर पडले .
पण बरच झालं तू भेटलास ते , मला उद्या assignment submit करायचं आहे . त्यामध्ये थोडी मदत करशील काय ?आयशा
अर्जुन तिला नाही म्हणूच शकत नव्हता , तिला बघण्यासाठीच तर तो बाहेर निघाला होता . ते दोघेही आयशा च्या घरी आले .
अर्जुनने तिला assignment पूर्ण करण्यात मदत केली . खरतर आयशाला एक बहाणा पाहिजे होता त्याच्या सोबत असण्याचा म्हणून तिने मदतीसाठी विचारलं होत .

रात्र बरीच झाली होती तरी अर्जुन ला आज घरी जायची घाई नव्हती . बाहेर आकाशात चांदणे पडले होते आणि छानशी गार हवा खिडकीतून डोकावत होती .
आयशा परत तिच्या अर्जुन मध्ये गुंतून गेली , आणि ते दोघेच त्या रूममध्ये असल्याने अर्जुन च्या हे सहजच लक्षात येत होते . सगळं जग विसरून ती त्याच्या नजरेत कैद झाली होती आणि तो हि तिला नजरेनेच प्रतिसाद देत होता .
मनात ठरवून ठेवलं होत त्याने कि तिच्या प्रेमात नाही पडायचं पण ती समोर असली कि तो स्वतःला हि विसरून जात होता .
हळूच येणारी ती गार हवा आणि तिची त्याच्यावर खिळलेली नजर . अर्जुन पूर्णतः घायाळ होत होता . ते क्षण दोघांनाही हवेहवेसे वाटत होते .
एकमेकांच्या कुशीत शिरून आपले प्रेम व्यक्त करण्याची दोघांनाही तीव्र इच्छा होत होती पण बोलण्याचा पुढाकार दोघेही घेऊ शकत नव्हते . फक्त डोळ्यांनीच त्यांच्यामध्ये संवाद चालू होता .
तो तिला नजरेनेच "मी निघू का" म्हणून विचारात होता तर , ती त्याला नाही ना बस अजून थोडा वेळ म्हणून इशारा करत होती . बराच वेळ झाला पण त्यालाही जायची इच्छा नव्हती आणि ती हि त्याला जाऊ देत नव्हती .
नाईलाजाने अर्जुन जायला निघाला .
तेवढ्यात ,"अशी भेट केव्हा होईल" .आयशा ने अर्जुन ला हळूच विचारलं .
होईल एकदातरी म्हणून अर्जुन निघून गेला .
आयशा आपल्या प्रेमात आहे हे अर्जुनला जाणवत होत . तर अर्जुनही आपल्याला पसंत करतो हे आयशा ला कळत होत . जिथे मन जुळली असतात तिथे शब्दावाटे प्रेम व्यक्त करण्याची गरज नसतेच .
असेच आयशा आणि अर्जुनचे मन एकमेकांत गुंतले होते . आयशा हि एक स्पष्ट व्यक्तिमत्व असलेली मुलगी होती
तर अर्जुन सगळ्यांयाचे मन जपणारा , आपल्यामुळे कुणालाही त्रास नाही होणार याची काळजी घेणारा एक स्वछंदी मनाचा मुलगा . जो कुठल्याही आई-वडिलांना श्रावण बाळापेक्षा कमी नाही वाटणार .

नजरेला नजरेचा प्रतिसाद देत एक वर्षाचा काळ लोटतो , तरीही दोघे कधी शब्दांतून आपला प्रेम व्यक्त करत नाही . दुपारची वेळ असते , आयशा नुकतीच कॉलेजमधून आलेली असते .
आई-बाबा कामानिमित्याने बाहेर गेलेले असतात . तेवढ्यात दरवाज्यावर कुणीतरी येतो .आयशा दार उघडते तर समोर अर्जुन असतो . आज त्याला शाळेतून लवकर सुट्टी मिळालेली असते कारण त्याचा जन्मदिवस असतो . आयशा त्याला आपल्या मनातलं बोलण्यासाठी ह्याच दिवसाची वाट बघत असते, पण तरीही तो असा अनपेक्षितपणे आल्याने ती थोडी गोंधळतेच .
"अ ग आत तरी ये म्हणशील कि नाही" , जाऊ का परत मी , अर्जुन तिचा उडालेला चेहरा पाहून बोलतो .
ये ना आत , परत कशाला जातोस . आयशा .
दोघेही थोडे गप्पा मारतात आणि आयशा आता त्याला आपल्या मनातलं बोलून दाखवण्यासाठी सज्ज झालेली असते .
अर्जुन , मला एक स्वप्न पडलं होत , तो स्वप्न का पडलं माहित नाही पण त्यामध्ये मी पाहिलं कि तू ......
काय आयशा? समोरच बोलणं , अर्जुन ती थांबलेली असते तेव्हा तिला परत बोलत करण्यासाठी विचारू लागतो .
जाऊ दे , मला खूप दिवसापासून तुला काहीतरी सांगायचं आहे , आयशा विषय बदलून सरळ मुद्द्याला हात लावते .
सांग ना . अर्जुन
अर्जुन मी तुला खूप like करते . तुझे विचार माझ्या मनात घर करून बसले आहे . तुझ्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही रे मला , केव्हा तुझ्या प्रेमात पडले ते मलाही नाही कळलं . पण तुला एक नजर बघण्यासाठी आम्ही सीमा ला कधी कधी बोलवायला तुझ्या घरी येत असतो , तेव्हा तू दिसतोस , तेव्हा असं वाटते कि ....
आयशा हे सगळं एका श्वासात बोलून गेली पण समोरच बोलताना तिचे ओठ थरथरू लागले . अर्जुन ला तिच्या अपूर्ण बोलण्यात हि तिच्या मनातल्या भावना कळल्या होत्या .
तो तिच्याकडे बघत असतो पण आयशा मात्र बिथरली असते . तिला हे काय केलं आपण असं वाटू लागत . जर त्याला आपलं proposal नसेल आवडलं तर तो आपल्याला कधीच समोर भेटणार नाही हि भीती असते .
अर्जुन मात्र मनातून अगदी सुखावला असतो . त्याचा स्वभाव जरी नसला आपल्या भावना व्यक्त करण्याचा तरी तो त्यादिवशी स्वतःला आवरू शकत नाही . अलगत तिचा हात आपल्या हाती घेतो , आपले दोन्ही हात तिच्या पाठीवर ठेवून तिला आपल्या मिठीत घेतो , आयशा ला तर कळतच नाही हे काय होत आहे .
ति आपले दोन्ही डोळे मिटून घेते तोच तिच्या ओठांवर एक हलकासा स्पर्श जाणवतो , तो स्पर्श असतो तिच्या अर्जुनच्या ओठांचा . वास्तव्यात होणारा त्याचा स्पर्श तिच्या अंगावर शहारे फुलवितो .
तो स्पर्श कितीही सुखद असला तरी ती डोळे उघडताच त्याच्या मिठीतुन बाहेर पडते . तिला त्याच्या कुशीतला सहवास हवासा असतो पण तेव्हाच, जेव्हा तो पूर्णपणे तिचाच असेल .
दोघेही लाजून चक्क चुर्रर्रर्र होतात , एकमेकांच्या नजरेला नजर द्यायची सुद्धा हिम्मत नसते . काही वेळ असाच जातो आणि ती त्याला विचारते तुझ्या बर्थडेचा गिफ्ट काय पाहिजे , तो तिच्याकडे बघून एक गोड स्माईल करतो आणि मला माझं गिफ्ट तर मिळालं म्हणून हसतो . तिला हि कळते तो कशाबद्दल बोलतो आहे ते आणि ती खोट्या रागातच त्याच्या खांद्यावर मारत असते .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमला हा भाग असेच लिहीत रहा रीना जी छान लिहिता तुम्ही मला आपल्या सगळ्यांची एक मदत हवी होती मायबोलीवर लेखनासाठी कुठे जायचे असते वरून तर कोणी मदत केली तर बरं होईल

धमाल धवल , नवीन लेखन करण्यासाठी तुम्ही नवीन लेखन करायचं आहे? यावर टिचकी मारा . दुसरी लिंक ओपन होईल तिथे सुरुवातीलाच तुम्हाला
"तुम्हाला मायबोलीवर लेखन कसे करायचे हे माहिती नसेल तर मदतपुस्तिकेतले हे पान पहा" हि ओळ दिसेल. "मदतपुस्तिकेतले हे पान पहा." यावर टिचकी मारून दिलेले instructions follow करा .