त्याचीच ती :१

Submitted by रिना वाढई on 28 November, 2019 - 07:23

सकाळचे ७ वाजले असतील , आज अर्जुन ला उठायला जरा उशीरच झाला .
तो उठून फ्रेश व्हायला जाणारच , तेवढ्यात सीमा ला आवाज देत तिच्या मैत्रिणी दारात येतात.
सीमा, ये ना लवकर , नाहीतर आज तुझ्यामुळेच आपल्याला उशीर होईल बघ .
पिंकी तिला कॉलेज ला येण्यासाठी आवाज देत असते तर आयशा नुकताच झोपेतून उठलेल्या अर्जुन ला पाहण्यात दंग असते .
झालं का मॅडम तुम्हच पाहून त्याला ,
आता निघायचं का आपण . पिंकी सीमा ला आवाज देऊन झाल्यावर आयशा ला सुद्धा धक्का देत बोलते .
हो ग बाई , चल आता . झालं पाहून त्याला .
तेवढ्यात सीमा आवरून बाहेर येते आणि या तिघी कॉलेज ला जातात .
मधेच पिंकी आयशा ला बजावत असते , आज तुझ्या म्हणण्यावर आली मी सीमा च्या घरी , अर्जुन ला बघायचं होत तुला म्हणून . पण उद्यापासून नाही येणार .
ठीक आहे . उद्या पासून मी तरी कुठे जाणार आहे तिच्या घरी . मनातच आयशा कुजबुजली .
---------------------------------------------------------------------------------------------------------
त्या रात्री आयशा चा डोळा मात्र लागत नव्हताच . राहून राहून तिला अर्जुन च आठवत होता .
किती handsome दिसत होता ना अर्जुन आज सकाळी , त्याला पाहताक्षणी मिठी मारावीशी वाटली , छे आयशा काहीतरीच विचार करते तू . आयशा स्वतःशीच बोलत झोपी गेली .
अर्जुन , दिसायला देखणा आणि त्याचबरोबर त्याचा सोज्वळ स्वभाव . त्याला बघून तर कोणतीही मुलगी फिदा होईल हे नक्कीच .
पण तो मात्र कोणत्याही मुलीला भाव देणाऱ्यातला नव्हताच . आणि म्हणूनच आयशा त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती .
आयशासाठी तर अर्जुनच सर्वस्व झाला होता . दिवसेंदिवस ती अर्जुन मध्ये जास्तच गुंतू लागली .
एके दिवशी अर्जुन एकटाच समोरच्या गल्लीत बाकावर बसलेला असतो . सांज झालेली असते , छोटसं गाव असल्यामूळे लोकांची रहेद्दारी सुद्धा जास्त नसते .
आयशा अर्जुन च्या शेजारीच बसते . त्याला आपल्या इतक्या जवळ बघून आयशा च हृदय जोरजोरात धडधडतं असत . अर्जुन ला कळते तिच्या मनात काहीतरी चाललंय .
काय झालं आयशा ,काही विचार करत आहेस का तू ?
हम्म... म्हणजे काही नाही , ती त्याच्यासमोर धड बोलूही शकत नाही . फक्त हम्म , नाही , हो इतकंच काय ते उत्तर देत असते त्याला .
आणि समोर एक वाक्य बोलायचा प्रयत्न चालू असतो तिचा .
अर्जुन , i mean to say , कि i really ...आणि अर्ध्यातच अर्जुन तिचा हात आपल्या हातात घेऊन ओढतो .
आणि हळूच आपले ओठ तिच्या ओठावर ठेवतो .
ती लाजून चक्क चुर्रर्रर्र होते . तेवढ्यात खूप कर्कश आवाज तिच्या कानी पडतो . आयशा उठ , आज कॉलेज ला नाही जायचं आहे का ? किती वेळ झोपशील तू .
बापरे ६ वाजून ३० मिनिट्स झाले पण . ती आळस देतच उठते . पण तरीही , का ग आई आज एवढ्या लवकर उठ्वलीस तू . अजून थोडा वेळ झोपू द्यायची होतीस ना .
तिला उठायला आधीच उशीर झाला म्हणून तिची आई चिडलेलीच असते तर आणखी या मुलीचे झोपू द्यायची असती म्हणून नाटके बघून अजून चिडते .
आईच्या चिडण्याकडे आयशाच लक्षच नसते . ती तर त्या स्वप्नातच हरवून गेलेली असते . तिला वाटत आई ने जर थोडं उशिरा आवाज दिला असता तर आज ती त्याला आपल्या मनातलं बोलून दाखवली असती .
पण त्याने तर आपल्याला चक्क किस केलं होत . काय होत हे , म्हणजे तो असा कधी करेल काय ?
आयशा कित्येक दिवस त्या स्वप्नाच्या सुखद अनुभवातच जगत होती .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटलं माबोकरांना लव स्टोरी जास्त आवडत नसेल म्हणून काही प्रतिसाद नाही आला . पण तुम्हचा प्रतिसाद वाचून मला प्रेरणा मिळाली .
धन्यवाद अजय चव्हाण आणि च्रप्स.