औट घटकेचे सरकार कारण

Submitted by हस्तर on 28 November, 2019 - 04:28

औट घटकेचे सरकार कारण
मिपा कार आनन्दा ह्यांचे काही मुद्दे

१ .आंतरराष्ट्रीय राजकारणात, जिथे याहीपेक्षा अनेक मुरब्बी प्लेयर्स २४ तास काम करत असतात, तिथे हल्लीच्या काळात दादागिरी करणारे इतका कच्चा डाव टाकतील हे मनाला पटत नाही. कारण हा डाव अगदीच कच्चा होता. शरद पवारांचा आतून पाठिंबपाठिंबातर एक्टे अजित पवार काहीही करू शकत नाहीत असे स्पष्ट आहे. मी हे त्या दिवशीच एका राष्ट्रवादीच्या माणसाला बोललो होतो. आणि त्याने मला स्पष्ट सांगितले की शरद पवारांचा पाठींबा नाहीये. वेट अँड वॉच.
२. राजीनामा दिल्याच्या पत्रकारपरिष्देत फडणवीस अगदी आनंदात होते, म्हणजे भासवात तरी होते, किंवा खरेच होते. जे करायचे होते ते साध्य झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होता. मला ते खटकलं होतं.. की आपला डाव फसला असताना देखील माणुस इतका आनंदी कसा राहू शकतो?
३. खरे तर अजित पवारांनी विश्वासघात केलाय, मग पत्रकारपरिषदेत त्यांनी पवारांवर घसरायला हवे होते, पण ते घसरले शिवसेनेवर.

ह्यात माझे असे विश्लेषण
१) संजय राऊत ह्यांनी शनिवारीच ट्विट केले होते कि संभाजी महाराज खानाच्या गोटात घुसून परत आले होते असेच काहीसे
२) बहुमत सिद्ध नसताना पण मंत्रालायत जाऊन काही फायली उरकल्या

हा मुद्दा महत्वाचा कारण निवडणुकी आधी आपलेच सरकार येणार ह्याची पूर्ण खात्री होती
शिवसेने काही झाली तरी आपल्यालाच पाठिंबा देणार म्हणून वानखेडे बुक केले होते

** जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली अगदी नाही पण तडकाफडकी होती **

साडेपाच वाजता संध्याकाळी ,दुसऱ्या दिवसाहीच्या पेंडिंग फाइल्स तश्याच राहू शकतात
आता सोमवारी त्या क्लिअर झाल्याची संभावना रोखता येत नाही

३) शरद पवार ह्यांचा हात

असेल किंवा नसेल पण एवढे आमदार ह्यांना अजित पवार अचानक बोलावतात कोणीच पवार ह्यांना पूर्व कल्पना दिली नाही असे होऊ शकत नाही ,काका पुतण्याचे उघड भांडण सगळ्यांना माहित असणारच

४) अजित पवार ह्यांनी राजीनामा दिल्यावर फडणवीस २ तासात राजीनामा दिली
घाई नव्हती कारण नंतर विधान सभेत बहु मत सिद्ध करायचे होते ,वाटाघाटी ला अजून वेळ होता मग असे का

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults