मुक्ती

Submitted by Swamini Chougule on 27 November, 2019 - 10:25

" नैना डबा दे लवकर मला उशीर होतोय "विनय

नैना पळतच आली " हो आले हा घे डबा आणि हो सांभाळून जा "

नैना आता विंद्या कडे वळली. विंद्या नैना आणि विनयची पाच वर्षाची गोंडस मुलगी. नैनाने तिला उठवले तिला तयार केले व नाष्टा भरवला. विंद्याला शाळेत पाठवले. आता नैना जरा मोकळी झाली . ती सोप्यावर बसली .चहा घेत ती अपचुकच भूतकाळात गेली .

ती आणि विनय एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यात मैत्री होती त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.त्यांनी लग्न करायचे ठरवले पण दोघांच्या ही घरच्यांचा विरोध होता . घरच्यांचा विरोध झुगारून दोघांनी लग्न केले.

आज सहा वर्षाचा सुखाचा संसार होता व एक छान वींद्या नावाचं गोंडस फुल त्यांच्या संसार वेलीवर उमलल होत. विनय एका खाजगी कंपनीत कामाला होता . त्याला पगार जेमतेम होता . पण ते त्यांच्या संसारात सुखी होते .

आज विंद्याचा वाढदिवस होता. म्हणून सकाळ पासूनच नैना गडबडीत होती . पण विनयच्या ऑफिस मध्ये आज मीटिंग होती .संध्याकाळी लवकर येतो असं ठरवून तो ऑफिस ला गेला .

नैना जरा नाखुशीनेच बर म्हणाली . जोशीकाकु तिच्या

शेजारी राहत होत्या . त्यांना मदतीला घेऊन तिने सगळी तयारी केली . नैना ने इडली डोस्याचा बेत केला होता .विंदया

शाळेतून आली . वाढदिवसाची सगळी तयारी झाली.

सात वाजल्या तरी विनय आला नव्हता . पाहुणे कधीचे तिस्टत बसले होते. नैना विनय ला फोन लावत होती पण तो फोन उचलत नव्हता .नैना ने केक कापून घ्यायच ठरवलं . तोच तिचा फोन वाजला. फोन विनय चा च होता

तिने गुष्यातच फोन उचलला .

नैना , " काय विनय किती वाजले " अस ती म्हणत होती तर समोरून वेगळाच आवाज आला. समोरून एका व्यक्तीने विनयला अपघात झालाय व त्याला आधार हॉस्पिटल मधे घेऊन गेलेत अस सांगितल . हे ऐकून नैना च्या पाया खालची जमीन सरकली . नैना विंद्याला जोशिकाकू कडे सोडून जोशिकाका व सुधीर ( विनयचा मित्र) ला घेऊन हॉस्पीटल मधे पोहचली .

विनय ICU मध्ये होता. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता . डॉक्टर ने सिटीस्कॅन केले व विनय च्या

ब्रेन मधे इंटर्नल ब्लडींग झाली असल्याने ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले . ऑपरेशन चा खर्च दोन लाख येणार

होता .

नैनाणे विनय व तिने सेव केलेले एक लाख बॅंकेतून काढले. सुधीर ने एक लाख दिले व ते पैसे हॉस्पीटल मधे भरले. विनायच ऑपरेशन झालं पण तो कोमात गेला विनयची बातमी ऐकून त्याचे आई बाबा ही आले . औषधे,

ICU चे भाडे , डॉक्टर ची फी हे सगळ विनियच्या बाबांनी त्यांच्या प्रोव्हीडण फंडातून केलं पण दोन महिन्याने विनय

ची मृत्यूशी झुंज संपली.

दोन महिन्यात विनयचे बाबा, आई व नैना कफल्लक झाले . पाच लाख बिल झाले होते. विनय चे तिसरे झाले . काक स्पर्श झाला नाही. विनयच्या आई - बाबांनी पंचांग पाहणारा बोलावलं कारण तेरव्याच्या विधी करायच्या होत्या .पंचांग पहणाऱ्याने सांगितले की विनयचा

मृत्यू खूपच वाईट वेळेवर झालाय . विनयला मुक्ती मिळण्यासाठी शांती करावी लागेल व एकावन्न ब्राम्हणांना जेवण घालावे लागेल असे सांगितले. या सर्व विधी साठी कमीत कमी वीस हजार खर्च येणार होता .विनय चे आई वडील आक्रोश करू लागले कारण त्यांच्या कडे इतके पैसे नव्हते . आता त्यांच्या मुलाला मुक्ती नाही मिळणार ह्या विचाराने ते खूपच अस्वस्थ झाले होते.

नैना ला त्यांचा आक्रोश पाहवत नव्हता. नैना एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाला किडनीची गरज असून तो त्यासाठी किती ही पैसे द्यायला तयार आहे .हे कुठून तरी कळलं.तिने तडक त्या व्यापाऱ्याला फोन केला . नैनाची किडनी त्याला म्याच झाली तिने व्यापाऱ्या समोर पाच लाख आणि नोकरीची मागणी ठेवली व्यापारी तयार झाला .विनय चे तेरावे व्यवस्थित पार पडले . विनीय चे आई बाबाचे समाधान झाले .पण खरच अश्या प्रकारे विनयला मुक्ती मिळाली असेल .?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सामो
कथा काल्पनिक आहे पण बऱ्याच ठिकाणी अंत्यविधी साठी ऐपत नसताना खूप खर्च केला जातो अंधश्रध्देपोटी अस माझं वैयक्तिक मत आहे

कथा काल्पनिक आहे पण बऱ्याच ठिकाणी अंत्यविधी साठी ऐपत नसताना खूप खर्च केला जातो अंधश्रध्देपोटी अस माझं वैयक्तिक मत आहे -> हे पटले!