अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज )

Submitted by हस्तर on 26 November, 2019 - 06:04

अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज )

नुकत्याच मिळाल्या बातमीनुसार
अजित पवार ह्यांनी उमु आणि देवेंद्र ह्यांनी मामू पदाचा राजीनामा दिला
अजित पवार छातीत दुखते म्हणून रुग्णालय भरती
सोनिया गांधी ह्यांनी काँग्रेस गट नेत्या पदाचा त्याग केला
अभिजीत बिचकुले ह्यांनी राजकारण सन्यास घेतला
राहुल गांधी ह्यांच्याकडे कुठेलेच पद नसल्याने ते आधी काँग्रेस अध्यक्ष पद घेणार मग सोडणार
शरद पवार ह्यांनी दुसरा पर्याय जमणार नसल्याने तंबाखू गुत्य्ख्याचा त्याग केला

निम्मे पत्रकार बांधव आता पर्यन्त स्वतः वेड्यांच्या रुग्णालयालयात भरती झाले आहेत व उरलेल्यानी आपल्या विश्वसनीय (?) सूत्रांनी पट्टयाने झोडले आहे
सध्या पत्रकारांच्या १००० वर जागा रिक्त असून मोठ्या परिमाणात मेगाखोगीरभरती होणार आहे

सगळ्यात मोठा राज्यपालांनी राजीनामा दिला असून याआधी आपली झोप पूर्ण करणार ६ महिने व त्यानंतर जम्मू काश्मीर वर रात्री गषत लावणार पण राजकारण नको
IIT IIM च्या विद्यार्थ्यांची नागरिक शास्त्र अभ्यास क्रमात समावेश करायची मागणी

राज्यपालाच्या राजीनाम्याची कारणे
१) अजितदादांच्या सहीचा कागद लीक झाला ,जो उठून त्याची xerox घेऊन येऊ लागला व त्यांना शपथ दिली मला पण मुख्यमंत्री करा म्हणून वाद घालू लागला
२) घरातला सगळं किराणा संपला ,तरी पण पाहुणे चाल्लूच
३) विजय मल्ल्या निरव मोदी इत्यादी ह्यांची भाजपात भरती ,प्रत्यक्ष जण ऊमऊ बनून माझी केस बंद करा म्हणून आग्रही
४) कहर म्हणजे राखी सावंत बिचकुलच्या सहीचा कागद घेऊन आली व मुख्य मंत्र्यांची मिसेस बनायचं आग्रह धरू लागली ,मेरे रुह का परिंडा वर गायन पण करून दाखवले ,सध्या देवेंद्र साहेब सकाळी सुप्रीम कोर्टात बहुमताच्या सुनावणी साठी आहेत तर दुपारी फॅमिली कोर्ट मध्ये आपल्या गृह मंत्र्यांची मनधरणी करत आहेत

राज्यपाल आमचाच :- संजय राऊत

नवीन राज्यपाल शिवसेनेचा असे संजय राऊत ह्याणी निक्षुन सांगितले व परत लीलावती मध्ये दाखल झाले
डॉक्टर लोकांनी मागचे बिल थकल्याने मुद्दाम त्यांना अजित पवार ह्यांच्या वार्ड मध्ये भरती केले
संजय राऊत ह्यांना दररोज शिव वडापाव घरून येऊ लागला पण त्यांनी चुकून त्यात वडापावच्या वेष्टनातीला वर्तमानपत्रात "मुतऱ्या’ तोंडाचे अजित पवार"अग्रलेख https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shi...
बघितला व तेव्हापासून वडापाव खाणे बंद केले ,रात्री झोपताना स्व संरक्षण साठी एका बंदुकीची मागणी

किंकाळ्या

सध्या काही घरांमध्ये मध्ये निम्म्या रात्री अश्या प्रकारे आवाज घुमत आहेत

फडणवीस निवास " मी पुन्हा येईन ""मेरे रुह का दारिंदा "
लीलावती " मुख्यमंत्री आमचाच " राज्यपाल आमचाच " "मुतू का ?"
माजी राज्यपाल निवास " इथे नुसते भेटायला येऊ नये अपमान होईल ,दुपारी २ते ४ व रात्री १२ ते सकाळी ९ दुकान बंद "
मातोश्री "शाहिस्ते खान " अफझलखान ,खिलजी ,शाहरुख खान आदी इत्यादी
काँग्रेस "मीच गटनेता होणार "
राष्ट्रवादी " हे पवार कि ते पवार "
शिवसेना आमदार "मी शपथ घेतो कि राष्टवादी बरोबर " "मी शपथ घेतो कि भाजप बरोबर " "मी शापथ घेतो कि काँग्रेस बरोबर""मी शपथ घेतो कि काँग्रेस + भाजप बरोबर " ...................................

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults