शौकीन .. सुर वाहक

Submitted by Mukund Ingale on 26 November, 2019 - 06:00

मै कहि कवी ना बन जाऊ...तेरे प्यार मे ए कविता...गाताना त्याची मस्त तंद्री लागली होती.आणि रात्री 9.30 ला आम्हि चोघे जण त्याचं गाणं ऐकण्यात रंगुन गेलो होतो.

झालं असं कि त्यादिवशी मी आणि दिलिप गेलो होतो एका कार्यक्रमाला..मुकेशची गाणी आणि रागदारी. पं अमरेंद्र धनेश्वर यांनी इतका सुंदर कार्यक्रम सादर केला कि 6 ते 8.30 वेळ कसा गेला ते कळले नाही.आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने मुकेशने पुन्हा एकदा आम्हाला झपाटुन टाकलं होतं.सोबत आणखी दोन सुरदास मित्र होते आमच्या. तेहि असेच हिंदी गाण्यांचे वेडे. दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमे समाई...भैरवीचे सुर अजुन मनात रेंगाळलेले होते आणी आम्हि यशवंतराव सेंटरच्या बाहेर आलो.

साधारण 9 वाजले असावेत. सी एस टी ला जायचं म्हणुन समोरुन जाणार्‍या एका टँक्सीला हात केला.आम्हि आत बसलो आणि टँक्सी निघाली. आमच्या गप्पा सुरु झाल्या,उजळणी सुरु झाली ऐकलेल्या गाण्यांची.अजुन मन भानावर यायला तयार नव्हते. आमचे बोलणे ऐकुन ड्रायव्हरने विचारले कि काहि प्रोग्राम होता का गाण्यांचा इथे? आम्हि त्याला सांगितले कि आज खास मुकेशच्या गाण्यांवर कार्यक्रम होता. मी सहज विचारले कि तुम्हाला पण जुनी गाणी आवडतात वाटते. तो म्हणाला कि मी गायचो हिंदी गाणी.2-3 वर्षे झाली..गाणं थांबवलय. माझा स्वत:चा ऑर्कॆस्ट्रा होता.ग्रॅंट रोड ला भाटी म्युझिक सेंटर मध्ये मी शिकवायचो.क़िशोर,मुकेश,रफि सर्वांची गाणी कॅराओकेवर म्हणणारे माझे सोबती तिथे आजपण भेटतिल. खुपच मस्त वाटले ते ऐकुन.चौघांसोबत पाचवाहि वेडा निघाला.

गाडी सी एस टी च्या भुयारी मार्गाजवळ आली होती.साधारण 5 मिनिटांत आम्हि तिथे पोहोचणार होतो. ग़ाण्यांच्या गप्पांनी बहुधा त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतिल. आम्हि उतरलो,पैसे दिले. सिग्नल लाल असल्याने त्यालाहि थांबावं लागलं. आणि अचानक तो म्हणाला आप हिन्दि फिल्मि गीतोंके शौकिन हो..तो जाते जाते रफि साब का गाना सुनके जाइये.

त्याने गाणे सुरु केले. मै कहि कवी ना बन जाऊ...तेरे प्यार मे ए कविता. कल्पना करा.रात्री साडेनऊचा सुमार,सी एस टी स्टेशनसमोरचा लाल सिग्नल,मागे आणि बाजुला थांबलेल्या गाड्या.थोडिशी कमी झालेली गर्दि आणि ...आणि तो गातोय. तुझे दिलके आईनेमें मैने बार बार देखा,तेरी अंखडियोमे देखा तो झलकता प्यार देखा.. एरवी तिथे एकमेकांशी बोलले तरी ऐकु येणार नाही इतका कल्लोळ असतो. पण त्या लाल दिव्यामुळे त्या क्षणी सर्व शांत झाले होते. आणि तो अनाम कलाकार आमच्यासाठी गात होता. बाहेर उभे राहुन,खिडकितुन तोंड आत घालुन आम्ही ऐकत होतो.आनंद घेत होतो.

आजुबाजुच्या गाड्यांचे आवाज सुरु झाले. सिग्नल हिरवा झाला.त्यालाहि जावे लागले. पण त्या 5 मिनिटांची त्याने खास आमच्यासाठी पेश केलेलि मैफल कायमची मनावर कोरली गेली. रसिक म्हणुन 2 तासांची आणि हि 5 मिनिटांची उत्स्फुर्त्..दोन्ही मैफली अविट आनंद देऊन गेल्या.

कधि मुंबईत टॅक्सीने फिरायची वेळ आली तर तिचा नंबर पहा.तो जर MH01-B2701 असेल तर त्या कलाकाराशी तुमची भेट होईल.आणि न जाणो ..रफिचं एखादं सुंदर गाणं त्याच्या तोंडुन ऐकण्याचा बहारदार योग तुमच्याही नशिबी असेल.
लेखन: मुकुंद इंगळे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!

वाह!