तुझा सहवास

Submitted by Priya.Nikte on 26 November, 2019 - 01:34

पहाट सारी गारठली आहे
सारं जग साखरझोपेत आहे
मी मात्र जागीच आहे
कारण तुझी थाप नाहीये..

चहाचा घोट घेत आहे
पहिला घेतला दुसरा उतरत नाहीये
कारण दुसरा घोट तुझा आहे
आणि तु सोबतीला नहीये..

रस्त्यावरुन चालत आहे
रिमझिम पावसात भिजत आहे
या भिजण्याला अर्थ नाहीये
कारण तुझी ऊब नाहीये..

कॉलेज चा कट्टा दिसत आहे
मित्र-मैत्रिणी जमले आहेत
त्या गप्पांमध्ये आता रस नाहीये
कारण तुझा आवाज नाहीये..

ती बघ आपली टपरी आली
गरमागरम भजी खुणावत आहे
त्या भज्यांना आता चव नाहीये
कारण घास भरवायला तु नाहीये..

नदीकाठची सांज फुलत चालली आहे
हवेची झुळुक अंगावर शहारा आणत आहे
ही गोड थंडीही बोचरी वाटत आहे
कारण जवळ घायला तु नाहीये..

हळुहळु चांदण पसरत आहे
चंद्रानेही हजेरी लावली आहे
मला मात्र सार फिक फिक वाटत आहे
कारण आज चांदण्यात तु दिसत नाहीये..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users