बाह्य परिसरातील अतिपरिचित / अपरिचित / अस्पर्शित चित्रीकरण स्थळं

Submitted by नोझिपा मरारे on 24 November, 2019 - 11:20

या धाग्यावर आपण नेहमी दिसणारी चित्रीकरण स्थळं (आउटडोअर शूटींग लोकेशन्स) किंवा खूप कमी आणि ओळखू न येणारी किंवा प्रेक्षणीय स्थळं जिथे अद्याप चित्रीकरण झालेलं नाही पण व्हायला हवे असे वाटते अशा स्थळांबाबत बोलूयात.

अतिपरिचित म्हणजे पाचगणीचा पारसी पॉईण्ट. किंवा शिमला येथील फिल्मी चक्कर (जय जय शिवशंकर या गाण्याचे शूटींग असलेले), मनाली येथील नदीच्या परिसरातील ( सौदागर सिनेमा ) आणि लोणावळ्यातील असंख्य स्थळं.

खूप कमी किंवा ओळखू न येणारी म्हणजे सैराटमधली शूटींग लोकेशन्स. पण या सिनेमाने आता ही स्थळं अगदी अतिपरिचित करून ठेवली आहेत.

याशिवाय कुणाला अशी काही लोकेशन्स ठाऊक असतील जी नितांत सुंदर आहेत पण शूटींग झालेलं नाही. अशाची ही माहिती लिहूयात.
शक्य झाल्यास नेमके कुठे आहे, कसे जायचे, आजूबाजूला काय सोयी आहेत, वैशिष्ट्ये काय आणि शक्य असल्यास प्रकाशचित्र टाकावे ही विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा.
दृश्यावरून गाणे ओळखा धाग्यासाठी या धाग्याचा उपयोग होईल.

जुन्या हिंदी सिनेमातून मुंबईच्या हार्बर रेल्वे वरची स्टेशन्स हमखास दिसत असत. तुळशी तलाव हीसुद्धा चित्रीकरणाची आवडती जागा होती. चलतीका नाम गाडी मध्ये मुंबईचा फोर्ट भाग, मलबार हिल आणि जुहू विमानतळ आहे तर आमीर खानच्या तलाश मध्ये रात्रीच्या मुंबईचे अफलातून चित्रण आहे. स्वदेश चित्रपटाचा काही भाग मला वाटते वाई परिसरात चित्रित झाला होता. आरे कॉलनी, स गां राष्ट्रीय उद्यान, माटुंग्याच्या फाईव गार्डन्स मधले सीन्स अनेक वेळा चित्रपटांतून दिसत असत. राष्ट्रीय उद्यानात अनेक सुंदर स्पॉट्स आहेत. कासचे पठार ही सिनेमात पाहिल्यासारखे वाटते. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे सुद्धा दिसायचा पूर्वी. वसई खाडी, पनवेल खाडी, नेरळचा उल्हास नदीकाठ.. सुंदर ठिकाणे आहेत सगळी. चेणे खाडी (,वसई खाडीचाच आतला भाग) ह्याची अतिपरिचयात अवज्ञा झाली आहे.

हॉरर मालिकांमधे नेहमी एक सुनसान रस्ता दिसतो. दोन्ही बाजूला दाट झाडी आहेत. पण दूर स्ट्रीट लाईट्स पण दिसतात. हा रस्ता कोणता आहे ?

स्वदेस मध्ये तो मंदिर परिसर दाखवला आहे ते मेणवली गाव आहे वाई जवळचे.
बाजीराव मस्तानी,गंगाजल आणि अनेक चित्रपट आणि मालिकेत दिसते मेणवली गाव.
तिथे नाना फडणवीस यांचा वाडा पण आहे ज्यात माधुरी दिक्षित च्या मृत्युदंड सिनेमा चे चित्रीकरण झाले.

मागिल महिन्यात आम्ही भेट दिली तेव्हा एका मालिकेचे चित्रीकरण चालू होते(भोजपुरी मालिका होती)

महाबळेश्वरला जाणार असाल तर अगदी 2तासात बघता येते मेणवली गाव.

महाबळेश्वर हून परतताना वाईला थांबणे होतेच. गणपतीमंदिर, धोम धरण, त्याचा फुगवटा, काठावरची विश्रांती गृहे, पाण्यावरून धूसर दिसणारे दूरवरचे काही किल्ले.. फक्त रोडावलेली आणि डबकी साचलेली कृष्णा नदी सोडली तर सुंदर दिसते सगळे. दक्षिण कोंकणात सह्याद्रीच्या तळाशी आणि किनाऱ्यावर अद्भुत ठिकाणांचा खजिना आहे. तसे तर कोंकणातला तळाचा किनारपट्टीजवळचा सर्वच भाग म्हणजे बोईसर, केळवे माहीम, वसई आरणाळ्यापासून
ते थेट दक्षिण कोंकणात करली खाडी, देवबाग, तेरेखोल खाडी, रेड्डीपर्यंत तळाची किनारपट्टी अगदी दृष्ट लागावी अशी देखणी आहे. त्यातही दक्षिण कोंकणाचा नंबर पहिला. पुढेही कारवार कूर्ग असेच देखणे आहेत.

मी हे आधी कुठे तरी माबोवरच लिहिल्यासारखं आठवतं आहे, पण परत या धाग्याच्या संदर्भात लिहिते.

अपरिचित आणि अस्पर्शीत ठिकाणं पाहिली, आनंद उपभोगला की फक्त आठवणीत साठवुन ठेवावीत. त्याची चर्चा झाली आणि ती सोशल मीडियावर गेली की त्या स्थळाची वाट लागायला वर्षं पुरतं. आपली लोकसंख्या एवढी आहे की त्या ठिकाणी जत्रा व्हायला वेळ लागत नाही आणि मॅच्युरीटी लेव्हल इतकी लो आहे की भरपुर कचरा आणि वस्तु/वास्तु/स्थळाचं नुकसान नक्की.

हे माझं ज्ञान नाही, पूर्वी सेनापती आयडीने एका निसर्गसुंदर रिमोट जागेचे फोटो टाकले होते, तेव्हा मी त्यांना प्रतिसादात स्थळ विचारलं, तेव्हा त्यांनी नकार देऊन हे कारण सांगितलं. पुढे मी प्रत्येक वेळेस जत्रा आणि कचरा पाहिला तेव्हा सेनापतींची आठवण आली आणि त्यांनी दिलेली शिकवण मनात पक्की होत गेली. आता मी एवढं टाइप करते आहे कारण माझ्यासारखंच कोणी यातुन शिकलं तर अजून 1-2 सुंदर जागा, वास्तु सुरक्षित रहातील.

आम्ही लहानपणी डहाणू किंवा बोर्डी किनार्‍यावर जायचो तेव्हा तिथे फक्त खूप सुरुची झाडं, वारा आणि समुद्र आणि किनार्‍यावर के एल पोंदा हायस्कूल असायचं.
काही वर्षापूर्वी डहाणू बीच वर गेलो तिथे घोडागाडी, भेळवाला, बर्फ गोळा वाला आणि इतर विक्रेते होते.
कदाचित इकॉनॉमी साठी चांगलं असेलही.
वरकला किनार्‍यावर तसं स्वच्छ आहे. पण एका बाजूला लोक मृतांसाठी किंवा देवाचे काही विधी करत असतात. या विधीसाठी लागणार्‍या वाती, फुलं, साहित्य, प्लॅस्टिक पिशवी हे तिथेच राहिलेलं असतं. थेट समुद्रात जातं.
परवा असंच एका नदीकिनार्‍यावर नातेवाईक प्रेशर ने नदीची ओटी भरली. ब्लाऊजपीस आणि नाणं थेट नदीत. नंतर कोणी बाहेर काढून वापरत असेल तर ठीक.
'खाणं, 'देवदेव', आणि प्रेक्षणीय स्थळं हे एकमेकांपासून जितकं वेगळं ठेवता येईल तितकं स्वच्छ राहण्याचे चान्स वाढतात. लोकांना एका बंद जागी खाणं खायला परवानगी देऊन अश्या जागांना वेगळी एंट्री ठेवून गेटवर पिशव्या तपासून खाणं काढून ठेवायला लावलं पाहिजे. (लोक हे मल्टिप्लेक्सेस मध्ये गपगुमान करत होतेच.)
भीमाशंकर जवळ निसर्गरम्य धबध्ब्यात जाऊन पायाला बीअर बाटलीची काच लागल्याचा आणि नंतर काचा आणि डायपर गोळा करुन एका पिशवीत ठेवल्याचा अनुभव मागेच आला आहे.

निसर्गरम्य ठिकाण काय आणि टेकडी काय घाण करणारे करत असतात.

आम्ही दर महिन्यात एक रविवार घोराडेश्वर( जुना मुंबई-पुणे महामार्गा लगत) टेकडी वर जाऊन कचरा प्लास्टीक बाटल्या गोळा करुन पायथ्याशी आणून ठेवतो. आमच्या सारखे बरेच हौशी लोक साफ सफाई करतात.

कधी गड किल्ले बघायला गेलो तरी घरुन मोठ्या काळ्या पिशव्या बरोबर घेतो आणि कचरा गोळा करुन जवळच्या कचरा कुंडीत टाकतो.

विशेष म्हणजे लोक फक्त कौतुकाने बघतात पण कचरा उचलत नाहित. काही छद्मीपणे हसुन उलट कचरा टाकून निघुन जातात. लोकांना आपण कचरा टाकतो याचे वाईट न वाटता उलट काहितरी भारी केले असे वाटते. सर्वदूर लोकशिक्षणाची खूप गरज आहे.

मीरा, मलाही प्रतिसाद पटला. चार वर्षांपूर्वी अरुणाचलला गेले होते तेव्हा लेजची पाकीट, बाटल्या वै दिसल्या नाहीत तेव्हा असंच वाटलं... वीणा,केसरी वै इथे पोचूच नाही.... वर्जिन रिव्हर सारखं रहावं

मीरा प्रतिसाद पटला. थ्री इडियट मधल्या तळ्याचं असंच झालं म्हणे !! आता लोक गर्दी करून फोटो शुट करतात स्कूटरवर करिनाच्या गेटप मध्ये :कपाळाला हात:
"How "3 Idiots" Destroyed Ladakh" हे
Search करा.

थ्री इडीयट्स मधे दाखवलेले पँगाँग लेक पहिल्यापासून पर्यटकांचे आकर्षण आहे. ते लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे.
सध्या त्याचा काही भाग चीनने घेतल्याच्या बातम्या आहेत.

अनु, सियोना, जाई, मंजुताई आणि अस्मिता, माझा मुद्दा समजुन घेतलात यासाठी आभारी आहे. पण परत एकदा या सल्ल्यासाठी 'सेनापती' चे आभार. त्यांच्यामुळे मी ही गोष्ट नोटीस केली की न्युजपेपर, TV वर एखादी डॉक्युमेंटरी यामुळे एखाद्या सुंदर स्थळाची किती दुर्दशा होते. अनेक उदाहरण देऊ शकते.

How "3 Idiots" Destroyed Ladakh" हे
Search करा >>>> हो अस्मिता, हे आर्टिकल पूर्वी वाचलं आहे. लडाख हे एक उदाहरण झालं, अशी कित्येक सुंदर नैसर्गिक स्थळं आपण भारतीयांनी खराब केली आहेत.

Pages