महाराष्ट्रातील राजकारणात नितीमत्ता लयास गेली का ॽ

Submitted by ashokkabade67@g... on 23 November, 2019 - 10:19

कालपर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा तीचा सुटला आणि आजच्या वर्तमानपत्रात ठाकरे मुख्यमंत्री होणार ही हेडलाईन्स जनता वाचत असताना मिडीयाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी दाखवायला सुरुवात केली आणि प्रत्येक दैनिकाची हेडलाईन्स अक्षरशः खोटी ठरली खरं तर या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हायला काही हरकत नाही कारण महाराष्ट्रातील साऱ्याच दैनिकांच्या बातम्या खोट्या ठरण्याची जगातिल कदाचित पहिलीच घटना असावी.आणि ही घटना घडवण्यासाठी कारणीभूत कोण असावा तर जनतेसमोर नितीमत्ता आणि आदर्शाच्या बढाया मारणारा भाजप नावाचा खोटारडा पक्ष आणि ज्या पक्षाच्या जीवावर निवडून आला त्याच पक्षाच्याच नव्हे तर त्याला पक्षासाठी म्हणुन मतदान करणाऱ्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसनारा अजित नावाचा सत्तेसाठी विकला जाणारा एक नीती मत्ता नसलेला राजकीय नेता . सत्तेसाठी नीती मत्ता गुंडाळून ठेवणारा हापक्ष आणि पाठीत खंजीर खुपसला या हा नेता महाराष्ट्रातील राजकारणात कोणते दगाबाजी चे राजकारण करुन महाराष्ट्राला कुठे नेवून ठेवतील हे सांगता येत नाही. आम्ही अशा पक्षाला व नेत्यांना मतदान करावे का हाही प्रश्न आहेच पण राजकारणात आता नीती मत्ता व्यास गेली असे वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गेली का ॽ अजूनही शंका आहे का गेली नाही अशी? याहून अजून काय राजकीय हलकटगिरी व्हायला पाहिजे म्हणजे तुमचा विश्वास बसेल कि खरेच नितीमत्ता लयास गेली? राहिली असेल अजून एखादी खालची पातळी तर सांगून टाका. दिल्लीचा तडीपार भामटा आणि त्याचा मोटा भाई सुद्धा लाजून तुमच्या पायाशी लोळण घेत येईल.

आताच एबीपी माझा'वर यावर चर्चा झाली.
चारही पक्षांनी लाज काढली. मतदारांना मतदान केलंच कशाला हा प्रश्न पडला. पुढच्या निवडणुकीला दहा टक्के मतदार मतदानाला जातील अशी शंका व्यक्त झाली.

चांगले कपडे घालून मतं मागितली आणि निवडून आल्यावर खुर्चीसाठी कमरेचं सोडून डोसक्याला बांधून बसलेत. अगदी संयमित पक्ष कांग्रेसनेही सेनेशी हातमिळवणी केली पवार सांगतात म्हणून.

अजिबात नाही, हिंदुराष्ट्र व्हायचे असेल तर अशा छोट्या मोठ्या गलिच्छ तडजोडी कराव्या लागणार. चाणक्याने यावरही काहीतरी लिहिले असेलच, अजितदादांच्या धक्क्यातून सावरले की भक्त ते वाक्य सांगतील. विष्ठा खाण्याचे समर्थन करणारी निष्ठावान जनता आहे तोपर्यंत काळजीच नाही.

१९७८ साली पुलोद चे मुख्यमंत्री शरद पवार झाले तेव्हाचा संदर्भ देऊन लिहिले असेल तर हो नीतिमत्ता लयाला गेली होती हे मान्य करावेच लागेल.

गेले पंधरा दिवस "किमान समान कार्यक्रमाच्या" नावाखाली ज्या काही वाटाघाटी आणि ब्लॅकमेलिंग चालले होते तेंव्हा धागालेखक बहुतेक झोपले असावेत.
अजित पवारांनी घड्याळाचा गजर वाजवला आणि हे जागे झाले मग त्यांच्या लक्षात आले की "अरेरे! नितीमत्ता लयास चाललीय" मग त्यांनी लगेच एका धाग्याची जिलेबी पाडली आणि ते परत निद्रेच्या आधीन झाले Proud

समोर राजकीय पेच प्रसंग उभा असताना केवळ जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सर्वच पक्ष आपला स्वार्थ पूर्णपणे बाजूला ठेवून एकत्र येऊन पदं वगैरे गेली बाजूला, शेतकऱ्यांसाठी, पीडितांसाठी काय काय करता येईल बघूया म्हणून खलबते करीत होते, तर कुणी त्यांच्या हालअपेष्टा अधिक सहन न होण्यामुळे तडकाफडकी शपथ घेतात हे पाहून त्यांचे कौतुक करून नीतिमत्ता उदयास येत आहे हे लिहिण्या ऐवजी लयास गेली का असे भलतेच काहीतरी कसं काय लिहू शकतं कोणी?

मानव Lol

अजित पवारांनी घड्याळाचा गजर वाजवला आणि हे जागे झाले मग त्यांच्या लक्षात आले की "अरेरे! नितीमत्ता लयास चाललीय" मग त्यांनी लगेच एका धाग्याची जिलेबी पाडली आणि ते परत निद्रेच्या आधीन झाले
>>
Lol

१९७८ साली पुलोद चे मुख्यमंत्री शरद पवार झाले तेव्हाचा संदर्भ देऊन लिहिले असेल तर हो नीतिमत्ता लयाला गेली होती हे मान्य करावेच लागेल.>>>>> तेव्हा लसावि कदाचीत जन्माला पण आले नसतील. नाहीतर वाचन एवढे कमी पडले नसते. बाय द वे, लसावि म्हणजेच आगाऊ ना?

फडणवीसांनी घाई केली हे खरेच आहे. फडणवीसच काय तर अख्ख्या भाजपाने घाई केली. काय हरकत नव्हती विरोधक म्हणून वावरायची. फडणवीस मु झाले हे कळल्यावर आनंन्द झाला होता खरा. पण साथीला अजीत पवार आहेत हे कळल्यावर आनंद मावळला. व्यक्तीला विरोध नाही पण त्याच्या राजकारणाला नक्कीच आहे. आणी तसेही आता या परीस्थितीत ज्यांना येडियुरप्पा आठवतोय त्यांनी हे लक्षात घ्यावे की पाठीम्बा देणारे आणी पाडणारे काँग्रेसच होते, यांचाच पक्ष बरं का. म्हणजे आतापर्यंत दुसर्‍याचा विश्वासघात कोण करत आलेय हे आठवायला हरकत नाही.

देव सार्‍या महामुर्ख नेत्यांना ( सगळ्या पक्षाचे महामुर्ख नेते, ज्यात काकाश्री पण आहेत ) देव सुजाण करो.

Inviting them to form the government is "unconstitutional" - SC

बरोबर आहे , रा रा उठली हे सर्वत्र जाहीर करायला हवे व ज्याला त्याला येण्याचा चॉईस हवा

सुप्रीम कोर्टाने थोबाड फोडले

blackcat, तथ्ये कशी तोडून फोडून दाखवायची यात कोंगी गुलामांचा हात कोणीच धरू शकत नाही हे तू पुन्हा सिद्ध केलं!!

१९७८ साली पुलोद चे मुख्यमंत्री शरद पवार झाले तेव्हाचा संदर्भ देऊन लिहिले असेल तर हो नीतिमत्ता लयाला गेली होती हे मान्य करावेच लागेल.>>>>>

का बरे? पुलोद हि सुद्धा धार्मिकतेच्या नावाखाली लोकांना उल्लू बनवणारी रेसिस्ट भामट्यांची टोळी होती कि कॉय?

>>>>>>>महाराष्ट्रातील राजकारणात नितीमत्ता लयास गेली का ॽ<<<<<<<<<

महाराष्ट्रातील राजकारणात नितीमत्ता लयास जाण्यापासुन वाचवलेली आहे

Biggrin

खालची पातळी?
काय म्हणे?
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला ती?
मग शिवसेना काय करत होती?
राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिलाय; आता तो त्यांच्या पक्षाला विश्वासात घेऊन दिलाय का नाही त्याच्याशी फडणवीसांचा काय संबंध.... राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत प्रश्न आहे तो
आता तुम्ही रात्री अपरात्री प्रायव्हेट हॉटेलात मिटींगा घेतल्या तर चालतात आणि त्यांनी सकाळी शपथविधी केला तर काय प्रॉब्लेम?
तुमचा तुमच्या आमदारांवर एव्हढा विश्वास नाही? हॉटेलात कोंडून ठेवायची वेळ येते मग मतदारांनी काय त्या आमदारांवर विश्वास ठेवायचा?

असो!

कोण बरोबर कोण चुकीचे हा प्रश्न गेला बो""''''
महाराष्ट्र मधील चार ही पक्षांना लाज ,लज्जा,शरम असेल तर ज्या राज्याचा गौरव शाली इतिहास आहे त्याला kalimba फासू नका...
तुमच्या वैयक्तिक मान अपमान शी राज्याला काही देणेघेणे नाही

बरोबर बोललात राजेशभाऊ.
सद्यस्थितीत कुणी स्वतः कुण्या पक्षाचे कार्यकर्ते (बाय प्रोफेशन) असल्याशिवाय कुठल्या पक्षाची तळी कशी काय उचलू शकतं याचं आश्चर्य वाटतं.

त्या व्हिडियोत फडणवीस म्हणताहेत, राष्ट्रवादीशी फक्त आम्हीच सामना केलाय. याचसाठी का?
फडणवीसांना कसा विश्वास ठेवता ठेवता ठेवता?

<< Inviting them to form the government is "unconstitutional" - SC
बरोबर आहे , रा रा उठली हे सर्वत्र जाहीर करायला हवे व ज्याला त्याला येण्याचा चॉईस हवा
सुप्रीम कोर्टाने थोबाड फोडले
>>
unconstitutional कसे काय? या विषयाबद्दल राज्यपालांचे आतापर्यंतचे कृत्य अत्यंत अशोभनिय, आणि भाजपाला सरसकट मदत करणारे आहे हे उघड झाले आहे... पण अजुन तरी त्यांनी घटनेच्या चौकटीत राहुन काम केले आहे असा माझा समज आहे.

<<देव सार्‍या महामुर्ख नेत्यांना ( सगळ्या पक्षाचे महामुर्ख नेते, ज्यात काकाश्री पण आहेत ) देव सुजाण करो. >>
------ नेत्यांना मूर्ख म्हणवत नाही.... ते तर महाचतुर आहेत. सर्व सुत्रे अजुनही काकांच्या हातामधे आहेत.

या नेत्यांना निवडणारी आपण जनताच आहे, यात सर्वच आले. आपल्याला आपल्या पात्रते नुसारच नेते मिळतात. In democracy, People gets the leaders they deserve.

निवडणूकीच्या आधी चर्चेत किती ठिकाणी क्लायमेट चेंज, उद्योग धंदे, नोकरी - बेरोजगारी, सर्वांगिण विकास, आरोग्य, शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्न, पाणी हे विषय होते यावर चर्चा झाली असेल तर खूप चांगलेच आहे. आमच्या " गृप "/फेसबुकावर / WA तर ३७० कलम, रामाचे मंदिर, पुलवामा हल्ला, त्याला प्रतिसाद म्हणून घर मे घुसके दिलेला करारा जबाब यावरच चर्चा झालेली आहे (अपवाद म्हणून काही विघ्नसंतोषी लोक लिंचिंग, राफेल, बेरोजगारी सामाजिक सलोखा असल्या निरर्थक विषयांवर लोकांचे लक्ष वेधत होती - मस्त जिरवली). भर म्हणून नोटबंदीचा देशाला किती फायदा झाला.... माननीय पंतप्रधान कसे १८ - १८ तास काम करत आहेत... अमेरिकेत ट्रम्पुल्यासाठी घसा फोडून.... "अबकी बार ट्रम्प सरकार... " ची डरकाळी देत आहेत.

सर्वत्र सुजलाम आणि सुफलाम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.... आणि प्रभू श्री राम हे अयोध्येमधे तयार होत असलेल्या नव्या वास्तू मधे लवकरच गृहप्रवेश करण्यासाठी आणि कायमचे रहाण्यासाठी निघाले आहेत.

उदय तुमच्या सस्कटूना मध्ये काय परिस्थिती? सेसेशन करायची मागणी जोर धरते आहे म्हणे?
तिथे लिबरल्ससाठी जोर लावताय की नाय?

कुठल्या पेपर मध्ये आलेय माहीत नाही, कारण फोटोच मिळालाय. माजी मुख्यमंत्री कै वसंतदादा पाटील यांच्या पत्नी श्रीमती शालीनी ताई पाटील यांनी मुलाखत दिलीय की जे शरद पवारांनी ४०- ५० वर्षापूर्वी वसंतदादांसोबत केले, तेच आज त्यांच्याबाबतीत घडले. त्यांनी ( शरद पवार ) कायम विश्वासघाताचे राजकारण केले, तेच आता त्यांच्यावर उलटलेय. आता वसंतदादांच्या आत्म्याला शांती लाभली असेल. तर मग ज्यांना लिंका हव्या त्यांनी खणावे.

दुपारी फोटो टाकते.

<< शरद पवारांनी ४०- ५० वर्षापूर्वी वसंतदादांसोबत केले, >>
------ १९७८... ४१ वर्षांपुर्वी... पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) सरकार म्हणायचे असे आठवते. त्यांचे राजकाराणातले गुरु यशवंतराव चव्हाण तसेच वसंतदादा पाटील यांना पण ते धक्कादायक होते. पाठित खंजिर खुपसला अशी टिप्पणी "भोळे " वसंतदादा यांनी केली होती.

देवराज अर्स अशी पण एक काँ होती... सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहेत... काही खूपच घट्ट मित्र आहेत... काकांश्री कुठला मोहरा कधी हलवतात हेच बघायचे.

उदय भौ , तेव्हढं पश्चिम बन्गालमधील लिन्चिन्गच्या घटनेवर तुमची आसावे गाळणे व उस्सासे सोडणे या दोन गोष्टी बाकी आहेत. तेव्हढं करुन टाका.. आणि तुमच्या असन्तुलीत दोस्ताला लिन्चिन्ग पिडीताचा फोटो डीपी म्हणुन लावायला आठवण तेव्हढी करुन द्या. निवड्णुकीच्या रणधुमाळीत विसरलेत ते....