तुझ्यात मी शोधते

Submitted by रिना वाढई on 23 November, 2019 - 00:38

आज तुझा जन्मदिवस .
अविस्मरणीय क्षण हा तुझ्या आयुष्यातला . आधी या दिवसाची एक विलक्षण सुगंधता माझ्याही जीवनात असायची ,
तुझ्या वाढदिवसाच्या योजनेची तयारी एक महिना आधीच सुरु झालेली असायची . आज हि तुझा जन्मदिवस माझ्यासाठी स्पेशल आहेच ... आणि राहणार ...फरक फक्त इतकाच कि, जो सुगंध परिमळात होता तो आज नाही....
कधी त्या दिवसांची आठवण तुलाही होत असेल नसेल , कुणास ठाऊक . पण ते क्षण मनात घर करून बसलेले . ठरविले होते कधी तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. फुललेल्या तुझ्या जीवनात विरजण घालणार नाही .
माझ्या शुभेच्छा तुझ्यापर्यंत नाही पोहोचल्या तरी चालेल, पण मन .... मनाचं काय ? खूप चंचल असते हे मन ....
स्वतःच्या मनावरील ताबा विसरून तुला शुभेच्छा द्यायचे ठरविले . पण का ?का म्हणून द्यायच्या तुला शुभेच्छा ! तुला तर नको आहे ते .

आयुष्यातला अनमोल दिवस हा तुझ्यासाठी . या दिवशी तू अनेकांकडून शुभेच्छा स्वीकारशील . हो ना ...
काही जणांच्या स्पेशल शुभेच्छासाठी आवर्जून तू वाट बघशील .
पण माझ्या शुभेच्छाची तू वाट बघशील ...... ?

न कळत आज मी बेभान लिहीत सुटले . इतक्या दिवसापासून मनात साठवलेलं आज रीत करावसं वाटलं .
तुला हवी असलेली स्पेस घेऊन तू माझ्या आयुष्यातून निघून गेलास . कधीही परतून न येण्यासाठी.
कधी विचार केलास ? तुझ्याविना माझ्या आयुष्यात पडलेले ते खळगे कसे भरतील ...
का म्हणून करायचा विचार ... परिस्थितीला पाठ दाखवून घ्यायचे निर्णय .
पण तुझं महत्व काय होत जीवनात ते परमेश्वराला माहित आहे . पण एक मात्र सलते जीवनात ... पाठ फिरविताना एक प्रश्न विचारायची मुभा नव्हती कि "काय दोष माझा "?
प्रेम तर तुही केलास , मग वेदना फक्त मला का ?आज हि तुझं नाव ऐकता डोळ्यात टचकन पाणी येते .बंधने माझ्याही जीवनात आहेतच रे . पण मनातल्या दडपणाचं काय ?
फक्त एवढं वाटते कि ज्याच्यवर एवढं प्रेम केलं , त्याच्यासोबत निदान बोलण्याची तरी मुभा असावी .
कधी कधी तर वाटत कि त्यावेळेस मनातलं नसतं बोललो तर आज हि वेळ आली नसती . कदाचित २ मिनिट्स काढून तू माझ्याशी बोलला तर असतास .
मरेपर्यंत तुझा साथ नाही सोडणार असा बोलला होतास तू . आज मात्र समोर आलास तरी ओळख नाही दाखवावीशी वाटत तुला, असं का ?
नको आहे तुझ्या आयुष्यात स्थान मला . पण कधीतरी दिलेल्या त्या स्थानाची respect नाही का आज ...
शेवटचं एक ... माझ्या आयुष्यातले काही सुंदर क्षण मी तुझ्यासोबत घालविले . त्यासाठी मनापासून आभार तुझे . माझ्या आयुष्यातून निघून जरी गेलास तरी आठवणीत नेहमी राहशील . फक्त एक वाटते कि मी प्रेम केले म्हणून मला हे वेदना मिळाले .
एक विचारायचं राहून गेलं ... खरचं तुझे कधी प्रेम होते माझ्यावर !
होते तर त्या वेदनांची औषध मलाही सांग . ज्या औषधामुळे तुला मी कधीच आठवत नाही . तुझ्या त्या डिक्शनरी मधून माझ्या वाढदिवसाची तारीख केव्हाच पुसली गेली . आणि वेडसर मी ... आताही तुझ्यात मी च शोधते .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thank you