सिक्कीम-दार्जिलिंग -१

Submitted by TI on 21 November, 2019 - 21:36

दिवस १
नवरा वर्षातले जवळ जवळ ७-८ महिने बाहेर असतो, त्यामुळे तो घरी आला कि आमच्या सगळ्या ट्रिप्स आणि प्लॅन्स ना उधाण येतं. या वर्षी आम्ही भारताच्या north-east दिशेकडे कूच करण्याची मोहीम आखली. मोहीम आखली कि तुझ्या अंगात संचारत असं तत्सम नवऱ्याच्या बडबडीकडे मी पद्धतशीर पणे कानाडोळा केला आणि माझ्या planning ला सुरुवात केली. खरंतर गंगटोक (आजकाल त्याला गँगटोक/ गॅंगटॉक असंही काही म्हणतात) दार्जिलिंग १५ वर्षांपूर्वी बघितलं आहे त्यामुळे तशी बेसिक ठिकाणं काय बघावी याचा अंदाज होता.
आमच्या आराखड्या नुसार सर्वात पहिले गंगटोक - युमथांग पार पाडून मग खाली दार्जिलिंग ला यायचं असं ठरलं होतं. पण बुकिंग्स इतकी फुल झाली होती की अख्खा भारत या आठवड्यात north -east ला लोटलाय की काय असं वाटायला लागला. परिणामी आम्हाला आमची ट्रिप उलटी प्लॅन करावी लागली.
पुण्याहून रात्री च्या flight ने आम्ही निघालो, सिलिगुडी साठी पुण्याहून डायरेक्ट flights नाहीत, आम्हाला बेंगळुरू (!) ला एक स्टॉप होता. अख्खा भारत दर्शन करून आम्ही दक्षिणेकडून उत्तरायण करणार होतो. पहाटे ५. ३० च्या flight ने निघून आम्ही सकाळी ८.३० ला सिलिगुडीला पोचलो. हवा स्वच्छ होती. मला फ्लयिंग ची प्रचंड भीती आहे (दाखवत नाही हि गोष्ट अलाहिदा) त्यात June चे पावसाळी दिवस.मी ट्रिप ला निघण्यापूर्वी नवऱ्या च्या डोक्याला इतकी कटकट केली होती, accute weather मध्ये दाखवतच होते, इकडे किती पाऊस, वारे, वादळ म्हणून नाही नाही त्या गोष्टी मी घेतल्या होत्या. कुणी सांगावं वादळं आलीच आणि कधी नव्हे ते आपलं हवामान खातं अचूक निघावं आणि लँड स्लाईड होऊन अडकलोच तर गरजेला लागेल अशा भयंकर गोष्टी घेऊन मी निघाले होते. असो विषय भरकटला. तर बागडोगरा विमानतळावर उतरलो तेव्हा हवा खूप छान होती, प्रसन्न सकाळ, सूर्याची कोवळी किरणं वगरे असल्याने आम्ही (म्हणजे मी) निश्चिन्त झालो. आमचं स्वागत एका छान शा ड्राइवर ने केलं. छान ह्या साठी की ही पहाडी लोकं दिसतातच अगदी वेगळी. राजीव आमच्या सोबत पुढे ३ दिवस असणार होता.
आम्ही दार्जिलिंग साठी मार्गस्थ झालो. इतका सुंदर रस्ता, आजूबाजूला निसर्गाची उधळण, हलक्या सरी, घाटाघाटातुन आम्ही कधी इतक्या उंचीवर पोचलो कळलंच नाही.अरुंद रास्ता आणि भयंकर उंची. इकडे driving करेल तो जगात कुठीही driving करू शकेल, सगळं स्किल पणाला लावणारी वळणं. मध्ये थांबून आम्ही ऑम्लेट पाव आणि चहा वर अक्षरशः तुटून पडलो. रस्त्याला लागताना समोर दिसणाऱ्या डोंगरांवरचे ढग आता आम्ही बसलो होतो तिथून खाली दिसत होते. विमानात परत बसलोय असा भास झाला. अशा ठिकाणी ऑम्लेट पाव आणि चहा! स्वर्ग सुख या हुन काय निराळं.
थोड्याच वेळात आम्ही घूम ला पोचलो. घूम हे जगातील सगळ्यात उंचीवर असलेलं रेल्वे स्टेशन. स्टेशन अतिशय देखणं आहे. पण लोकांची इतकी झुंबड होती कि आम्हाला घूम कमी आणि tourist जास्तं दिसायला लागले आणि आम्ही जरा वेळ थांबून तिथून निघालो. राजीव ने आम्हाला हॉटेल वर सोडण्याआधी बटासिया लूप आणि घूमची मोनेस्टरी बघून यायला सांगितलं. पण तिथेही इतकी गर्दी होती की आम्ही घाईघाईत काय ते आटपलं. रात्रभराच्या प्रवासाने तसही नाही म्हणलं तरी थोडा शीण आला होता. त्यामूळे कधी एकदा हॉटेल वर जाऊन फ्रेश होतोय असं झालं होतं.
राजघाटाजवळ आमचं हॉटेल होतं. लोकेशन अतिशय सुंदर! डोंगर उतारावर टुमदार हॉटेल, बांधणी थोडी ब्रिटिश थोडी इकडच्या पद्धतीची. आमच्या खोलीतून पुढची अख्खी दरी, समोरचं गाव, समोरचे डोंगर आणि छोटी छोटी टुमदार घरं दिसत होती. ढग अगदी आमच्या खोलीत येत होते, मधूनच चादर पांघरल्या सारखं, पदर सारखा केल्यासारखं सारवासारव करत होते आणि सगळं आच्छादून टाकत होते. आणि मधूनच डोंगर थोडेसे डोकावत होते.
आमच्या ओळखीतल्या एका यंग आजोबानी आम्हाला दार्जिलिंग ला Glenry's confectionery मध्ये आवर्जून भेट द्यायला सांगितलं होतं. आम्ही दोघेही खादाड असल्याने पहिले तिथेच जायचं ठरलं. आणि अशा वातावरणात भूकही कडकडून लागते त्यामुळे पावलं तिथेच वळली. Glenry's वर एक स्वतंत्र लेखनमालिका करता येईल इतकी ती जागा बघणीय, खाणीय आणि आकर्षक आहे. 'य' प्रकारच्या गोष्टी चोपल्यावर आम्ही मार्केट मध्ये फेरफटका मारायला बाहेर पडलो.
चौरस्ता हा इथला मुख्य चौक, त्याच्या अवती भोवती अख्ख मार्केट वसलंय. नवीन शहरात गेल्यावर मार्केट पायी मनसोक्त भटकल्याशिवाय शहर बघून पूर्ण होत नाही. गोंडस चेहऱ्याची बायका-माणसं गोष्टी विकायला बसली होती. वस्तूंइतकाच गोडवा विकणाऱ्याच्या चेहऱ्यावर! संध्याकाळी सूर्यास्ताचा आनंद दार्जिलिंगच्या चहाचे मळे बघत चहा पिण्यात आम्ही लुटला आणि तो दिवस तिथेच संपला.

दिवस २
आज आम्हाला दार्जिलिंग दर्शन करायचं होतं पावसाने साथ दिली आणि दिवसाची सुरुवात तरी उन्हाच्या कोवळ्या किरणांनी झाली होती! आमचं आटपून आम्ही राजीव ची वाट बघत थांबलो होतो. दार्जिलिंग मध्ये मरणाचं ट्रॅफिक आहे पण कडक शिस्तही आहे त्यामुळे ट्रॅफिक असूनपण काही वाटत नाही. आम्ही पहिले पद्मजा झू ला भेट दिली. दिवसाची सुरुवात छान प्राण्यांसोबत झाली आम्ही दोघेही प्राणी वेडे असल्याने इकडे रमलो. तिथेच पुढे तेनसिंग रॉक आणि म्युझियम आहे. शेर्पा तेनसिंग मेमोरियल मध्ये आपल्याला त्यावेळच्या सगळ्या मोहिमांबद्दल सखोल माहिती मिळते.
तिथून पुढे विशेष काही नव्हतं, चहाचे मळे आणि बागा! आम्हाला उभयतांना असं कार मध्ये बसून फिरायला अजिबात आवडत नाही म्हणून आम्ही चालत पुढे जायचं ठरवलं, तिबेटियन आर्ट अँड क्राफ्ट सेंटर डोंगरात लपलंय तिथे तिबेटियन लोकांनी बनवलेल्या वस्तू विकत घेता येतात. तिथे जाणारी वाट पायीच फिरावी अशी आहे. तिथून पुढे आम्हाला परत माणसात जायची इच्छा उरली नव्हती. मागे बघितलं तर एक पायवाट दिसली आणि आमचे पाय शिवशिवायला लागले. समोर चहाचे मळे दूरवर पसरलेले, मागे डोंगर आणि अशात हि पायवाट, अगदी नयनरम्य नजरा, एखाद्या सुरेख सुडौल तरुणीसारखी ती पायवाट त्या डोंगरात दिसत होती. दुतर्फा फुलांची झाडं. इकडे बघावं तिकडे सगळीकडे खूप सुंदर फुलं उमलली दिसतात.निसर्गाने इतकं भरभरून दिलंय इथे! आम्ही राजीवला सांगून तसेच पुढे चालायला लागलो. एका बाजूला गाव लहान होत होतं आणि वळ्णावळणांवर डुलणारी नेचे (Fern) आमचं स्वागत करीत होती. अतिशय मोहक होता तो पूर्ण रास्ता. वाटेत फक्त एक दोन माणसं दिसली. आम्हाला बघून आश्चर्य व्यक्त करत होती. काहींनी सांगितलं कि हा त्यांचा रोजचा रास्ता आहे पण पण टुरिस्ट फिरकत नाहीत.एक तर खडा चढ आणि पायवाट! डोंगर चढून गेलो कि थेट चौरस्त्या जवळ बाहेर पडतो. तिथेच बाजूला आमचं हॉटेल लागतं! म्हणजे खिडकीतून दिसणारी दरी आम्ही अगदी अर्ध्या तासात चालत चढून आलो! खूपच छान वाटलं! डावीकडे चौरस्ता आणि उजवीकडे आमचं हॉटेल, पाऊस हलकासा होता त्यामुळे आम्ही फ्रेश होऊन पुन्हा चौरस्त्याची वाट धरली. आणि पावलं पुन्हा Glenry's कडे वळली.
आम्ही जितका वेळ दार्जिलिंगमध्ये होतो शक्य तितक्या Glenry's च्या वाऱ्या केल्यात.
वाटेत लेमन टी घेतला आणि जी तरतरी आली पुन्हा एकदा गावाची चक्कर मारण्याकरता पायी निघालो. आतापर्यंत बरंच चालणं झालं होतं पण त्यामुळेच आम्ही दार्जिलिंग चा खरा आनंद घेऊ शकलो. इथल्या लोकांनी इथलं सौंदर्य खरंच खूप जपलय. सुंदर माणसं, टुमदार घरं, सुंदर शाळा बघून आपण भारावून जातो. दिवस मावळला आणि आम्ही नाईलाजाने परतलो. पहाटे उठून खिडकीपाशी आले आणि स्वप्न बघतेय की खरं असं झालं. आनंदाने मी अक्षरशः किंचाळले. त्या आवाजाने नवरा उठला आणि मग आम्ही दोघंही वेड्यासारखे समोर बघतच राहिलो. पहाटे ४.३०-५ ची वेळ समोर कांचनजंगा शिखर, त्यावर नुकतीच किरणं पडायला सुरुवात झाली होती. तांबूस सोनेरी शिखरं, काही सुचेना. दोन दिवस इथे राहून आतापर्यंत माहीतच नव्हता कि समोर हे दृश्य दिसतं. नुसती दरी आणि समोर चे हिरवे डोंगर पाहूनच आम्ही खुश होतो. हे काही तरी अद्भुतच दिसलं आज. अत्यंत तेजस्वी जे काही असेल ते सात्विक अगदी समोर असा भास झाला.
मग पुढे आमची बरीच चर्चा झाली त्यावर. निव्वळ आम्हाला दर्शन मिळावं ह्या हेतूने ढंगानी आपला पडदा सारला होता. ते देखणं रुपडं जगातलं ३र उंच शिखर आम्ही असं पहाटेच सूर्यस्नान घेताना पाहिलं, अजून काय हवं ? ट्रिप चे निम्मे पैसे वसूल झाले. निम्मे या साठी कि ते पुढे वसूल होणार होते कांचनजंगा पार्ट २ मध्ये!
आम्हाला वेळेचं भान राहिलं नाही. पण ३री घंटा झाली आणि ढगांनी लगेच पडदा टाकला! breaskfast आटपून आम्ही Pelling च्या दिशेने निघालो.

दिवस ३
आज पश्चिम बंगालची सीमा ओलांडून आम्ही सिक्कीम मध्ये प्रवेश केला. आपलं स्वागत सीमेवरच्या सुबक रंगीत कमानीने होतं. आलो आता सिक्कीम मध्ये!असं म्हणतात की सिक्कीम म्हणजे ,where god smiles, हे इतकं पटतं की तुम्ही अक्षरशः हरखून जाता इथल्या निसर्गात! इथे आल्यावर पहिली गोष्ट काय ध्यानात येते तर इथल्या बांधकामावरची तिबेटियन छाप आणि बुद्धांवरचं नितांत प्रेम. या भागाला आणि इथल्या लोकांना देवाने अगदी वेळ काढून बनवलं आहे हे नक्की!
आमचं हॉटेल पेलिंग पासून ८-१० किमी वर असलेल्या गेझिंग ह्या भागात होतं. मूळ पेलिंग पेक्षा हा भाग जास्त वस्तीचा आणि मोठ्या बाजारपेठेचा आहे!
दिवस धो धो पावसात सुरु झाला होता, आम्ही हॉटेलवर पोचलो ते हॉटेल नट डॅनी चे होते असं कळलं.
प्रवासानंतर दुपारी पोटात कावळे मोमो-मोमो ओरडत होते (हो इकडचे कावळे पोटात असेच ओरडतात). मेनू कार्ड वरचे सगळेच लोकल पदार्थ आम्ही मागवले होते. chowmin , चिकन शा-फलेय, मोमोज! शा-फलेय आपल्या कडच्या करंजी सारखा पदार्थ, आतलं सारण कसलंही असतं फक्त आकार आपल्याकडे रुखवतात ठेवतात तेवढ्या मोठाल्या असतात. अत्यंत चवदार प्रकार. एका मोठ्या शा-फलेय मध्ये आम्ही दोन गडी गारद झालो. नंतर chowmin (chinese?) हा प्रकार आला. थोडाफार थुक्पा सारखाच होता! पण आम्हाला थुक्पाच जास्त जवळचा वाटला! थुक्पा हि one-pot meal आहे. सगळ्या भाज्या, चिकन/अंडी आणि नूडल्स एकत्र असं थोडं सूप थोडं नूडल्स चा प्रकार. गेयझिंगला थुक्पा मिळाला नाही तर आम्ही chowmin वर भागवलं! सिक्कीमच्या मोमोज ची चव हि फक्त तिथे जाऊन झाल्यानंतरच व्यक्त करता येऊ शकते!शद्बत्तीत! तो दिवस असाच पावसात गेला. बाजारात एक फेरफटका झाला आणि दिवस मावळला!

सिक्कीम-दार्जिलिंग -२ -https://www.maayboli.com/node/72411


IMG_20190609_094437.jpg
IMG_20190607_103812.jpg

IMG_20190606_131425.jpg
IMG_20190606_151501.jpg

IMG_20190606_160828.jpg

IMG_20190607_123633.jpg

IMG_20190607_123802.jpg

IMG_20190609_065413.jpg

IMG_20190609_093124.jpg
१०
IMG_20190606_152623.jpg

११
IMG_20190606_131425.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच सुंदर वर्णन! लगेच उठून तिकडे जावंसं वाटायला लागलं Lol
फोटो पाहिजेत हां पण. फोटोंंशिवाय प्रवासवर्णन केलं तर तो ' फाऊल' धरतात Proud

खूपच सुंदर लिहिलंय. मिरीक ला गेलात का? दरीतली केबल कार राईड घेतली का? मॉनस्त्री खरंच सुंदर आणि शांत आहे. आम्ही तिथे त्या लोकांबरोबर वाद्य पण वाजवून बघितली. आम्ही पेलिंग ला नाही गेलो. फक्त दार्जिलिंग आणि मिरीक केलं. पुढच्या वेळेस गांतोक आणि पेलिंग Happy परत यावंस वाटतं नाही अजिबात. प्रत्येक घराबाहेर किती सुंदर फुलझाडं लावलेली असतात. भजी पण मोमो इतकीच फेमस आहेत आणि जागोजागी मिळतात. Kunga तिकडचे लोकल चितळे बंधू किंवा वैशाली आहेत दोन वेळेस तिथे जाऊन जेवायचा प्रयत्न केला ,दोन्ही वेळेस पॅक होतं. शेवटी नाद सोडला, dekeva नावाचं दुसऱ्या पॉप्युलर joint खूपच स्वादिष्ट स्थानिक फूड मिळालं. Glenrys मधले क्रिमरोल, paris breast awesome. आम्ही tiger hills ला गेलो नाही, तिथे ऑफ season होता ढगांमुळे शिखरं दिसत नाहीत असं आमचा guide म्हणाला. हॉटेलच्या रूम मधूनच सुंदर कांचनजंगा दिसलं.

@राजसी , thank you Happy amhi mirik la gelo nahi, Ya traffic hota! ani tiger hill la hi nahi karan dho dho paus hota. Hotel madhun ch kanchanjanga cha darshan khup chan zala!cable car la hi kamit kami 4 tas raang hoti nustya ticketala! te hi rahilay!
परत यावंस वाटतं नाही अजिबात+11111
baryach jaga rahilyat! tumhi pudhchya weli gelat ki Pelling ani Yumthang nakkich bagha! Yumthang he swarga ahe undoubtedly!

varchyapaiki junglatla photo sakali 8.30-9 darmyan ghetla ahe! suryacha prakash khalparynt pochatch nahi!

सुंदर फोटो TI Happy तुम्ही खूपच छान लिहिले आहे. मला इतकं छान लिहिता आलं नसतं.
नक्की जाणार Pelling ani Yumthang Happy

मिरीकला जाताना रस्त्याची एक बाजू भारत असते आणि एक बाजू नेपाळ Happy नेपाळ मध्ये पण जाऊन आलो तिथली बाजारपेठ आणि देऊळ! आपण विसा शिवाय पूर्ण फिरून येऊ शकतो नेपाळ. सीमाबाजारात भारतीय रुपये देऊनच शॉपिंग केली Happy
मी टाकू का माझे फोटो इथे?

@राजसी HOoooo taka ki photo. Me lahan astana amhi sudha pashupatinagar la jaun shopping karun alyacha athavtay. rastyacha ek bhag bharat dusra nepal hi khp vishesh goshta watte purna pravasat!

फोटो छान.
बाकी शाकाहारी जेवणाऱ्यांसाठी काय सोयी?
आमचे कावळे भापो भापो ओरडतात.

@ Srd हाहाहा शाकाहारी पण उत्तम पर्याय आहेत, मी बऱ्यापैकी शाकाहारी खाल्लं! तिथे भात मुख्य अन्न आणि एक वेगळ्या प्रकारची पोळी मिळते. रस्त्यात लहान लहान दुकानं किंवा टपऱ्यांवर आम्ही खाल्लं! शाकाहारी शा-फलेय, थुक्पा आणि मोमोज पण उत्तमच लागतात! Happy
बाकी नेहमीच दाल- चावल आणि भाज्या मिळतात!

या भितीनेच तिकडची माहिती सुद्धा शोधली नव्हती. आता बघतो. मला सिक्किमकडची फुलपाखरे आणि आर्किड पाहायचे आहेत.

@srd, tyasathi tumchya plan madhe yumthang nakki add Kara, itar thikananpeksha thoda lamb ahe pan baghun alat ki nakkich chan watel.

सुंदर वर्णन आणि फोटो.
वीस वर्षांपूर्वी दार्जिलिंग सिक्कीम पाहिलेय. लक्षात राहिलेल्या गोष्टींमध्ये तिथल्या घरांच्या खिडक्यांमध्ये लावलेली फुलझाडं, भारतीय न वाटणारे, चिनी ठेवणीचे सफर्चंदी गालांचे लोक आणि पहाटे साडेतीन-चारला उठून बघितलेली कांचनगंगेवरची सूर्यकिरणे याच गोष्टी आहेत!
त्या दुसर्‍या फोटोत कसला खाद्यपदार्थ आहे?

@varsha, thank you! Te Sha phaley Cha Cha prakar ahe..stuffed bread/ pie sarkha..aat veg kiva non veg saaran asta!

मस्त आहे प्रवासवर्णन. सगळी व्यवस्था तुमची तुम्ही केली होती का कुणा कंपनीकडून करून घेतली? विशेषतः गाडीची?

फोटोखाली ३-४ शब्दात त्याबद्दल माहिती असती तर अजून मजा आली असती.

तत्सम नवऱ्याच्या >> Wink

@ Madhav, amhi internal pravas gadi vagre private tour comp kadun karun ghetla hota, baki amcha amhich kela plan, actually apla apan plan karun janyat jasti maja ahe! Online aplyala gadi sudha book karta yete, andaze divsache 2-3 hajar rs hotat ani eka thikanahun dusrya thikani without sightseeing asel tar 3 hajara parynt kharcha hoto, darjeeling to Pelling kiva Pelling to Gangtok vagare sadharan titkach kharcha yeto! divsala 2-3hajar pakdun chalaycha, season ani gardi pramane kharcha kami jasta hoto!

छान वर्णन TI.
फोटो मात्र आता डिलीट झाले असावेत...
अजून लिखाण करत जा. पुलेशु.