सिद्ध भाग १

Submitted by SanjeevBhide on 20 November, 2019 - 07:32

सिद्ध
रात्र बरीच झाली होती, गंगेच्या काठावर किनारया पासून दूर एक शव आकाश कडे तोंड करून पडलेलं होत, प्रेत फुगलेले होते. डोळे माश्यांनी खाऊन टाकले असावेत, शरीर वर असंख्य चावल्याच्या खुणा होत्या, तीव्र दुर्गंध वातावरणात पसरला होता त्या शवाच्या छाती वर एक नागडा साधू पद्मासन घालून बसला होता. त्याच्या वजनाने शवाच्या नाक तोंड कान ह्यातून पाणी बाहेर पडल, त्याचा एक विचित्र आवाज झाला.
सगळी कडे शांतता होती,
टिटव्या मधूनच ओरडत आकाशात न उडत वातावरणाला   अजूनच भयानकपणा आणत होत्या, मधूनच पाण्यातून डुबक्या मारणाऱ्या माशांचे आवाज,  तर शवा च्या जवळ फिरणारे तरस ,कुठे तरी कुत्री भेसूर आवाजात ओरडत होती.
भोला ने एक लाल फुल असलेली माळ प्रेताचे गळ्यात घातली, बंडी च्या खिशातून अत्तराची बाटली काढून प्रेताचे डोक्यावर अत्तर लावल, अबीर बुक्का प्रेताचे कापाळी लावला, तोंडाने मंत्र  म्हणत दारूची बाटली उघडली, प्रेताचा जबडा उघडून आत ओतली.
थोडी दारू आत गेली तर बाकीची तोंडाच्या दोन्ही बाजूने गळत राहिली, उरलेली अर्धी बाटली तोंडाला लावून भोला ने पिऊन टाकली माळे तील ३,४ फुले स्वतःचे कानावर अडकवत, "ओम वेताळ, विद्युतजिव्हा, अग्निजिव्हा..... ",अस काही स म्हणत, असनातून उठला आणि  प्रेत नदी कडे ओढत निघाला जवळ न कोणी तरी वेगात निघून गेल. तर हात दोन हात लांब लाल सर प्रकाश पसरला व काहीतरी आकाशात नाहीस झाल. भोला ने आता प्रेत सोडून दिल होत व  त्वरेने तो नदी पत्रात उतरला पोहोत दुसऱ्या किनाऱ्या वर पोहचला जुनी पडकी घर, वाडे, दगडात बांधलेली घर त्यातून जाणाऱ्या पायवाटा, कुत्री ओरडत होती. 
एका अरुंद बोळीत भोला आत शिरला एका वाड्या समोर उभा राहिला कडी वाजवली
"कोण..?".
"भोला", वाड्याच छोट दार उघडल, भैरवी दिवा घेऊन उभी होती. भोला आत शिरला.
कुरळे  केस हातात दिवा होता, छाती उघडी होती कमरेला वस्त्र होत गळ्यात रुद्राक्ष माळ, होती  डोक्यावर गोल रुपया एवढा शेंदूर लावलेला होता प्रमाण बद्ध शरीर मादक ओठ
"सौदामिनी तु ?". भोला
सौदामिनी हसली तिने पाठ फिरवून चालण्यास सुरवात केली , भोला ची नजर तिच्या नितम्बांच्या मादक हालचालीत अडकून बसली, बोळ मध्येच खोली मग आत चतुष्कोणी अंगण ते पार केल की एक मंदिर वजा खोली, ३ हात उंच व २ हात रुंद काली मूर्ती एक पाय शिवाच्या छातीवर.
सौदामिनी भैरवी ने कालीमुर्ती च्या पायास स्पर्श केला व शिवाचे कपाळ दाबले मूर्ती बाजूला झाली, आत तळ घरात जाण्यास जिना होता भैरवीने दिपक भोलाच्या हातात दिला व म्हणाली
"प्रभू साधनेत आहेत, तु जा, आपण मग भेटूच".
तिच्या स्वरात तृष्णा होती, ती मंद हसली, भोलाच्या गालावरून ओठाचा चंबू करत एकदा स्वत ची तर्जनी फिरवली आणि परत गेली.
तळघरात प्रभू ध्यानस्थ बसले होते समोर देवी ची जवळ जवळ १० फुट उन्च मूर्ती होती  दश भुजा त्रिनेत्रा, केसांच्या जटा, डोक्यावे अर्ध चंद्र  त्रिशूल खड्ग  चक्र पाश अंकुश धनुष बाण खेटक मुद्गल पायापाशी दैत्य मुंडक काळ्या दगडात घडवलेली मूर्ती अतिशय उग्र व भीती दायक होती.
प्रभू चा जप चालू होता तो संपला भोला ने पायावर डोक ठेवल 
"झाल. . .?", प्रभू
"कोणी बघितल नाही ना..?".
"काही विशेष दिसलं...?".
एका मागे एक प्रभू चे प्रश्न
"मंत्र म्हणताना कोणी तरी वेगात चालत गेल, मग लाल प्रकश होता", भोला म्हणाला.
नदीत पोहत असताना समोर एक प्रेत पुढे पुढे जात होत किनाऱ्यापाशी अदृश्य झाल", हात जोडत परत प्रभुना नमस्कार करत भोला म्हणाला.
"उद्या दिवाळीची अमावस, पशु (मनुष्य) मिळाला आहे". "तो हि देवी उपासक त्याचा बली दिला कि भोला तु तंत्र विद्येश्या शेवटच्या पदावर आरूढ होशील. मग माझी जबाबदारी संपली", प्रभू म्हणाले
इतक्यात सौदामिनी खाली आली, तिच्या कडे बघत प्रभू म्हणाले
"भैरवी, भोला ची नीट व्यवस्था कर". भैरवीने चालायला सुरुवात केली भोला तिच्या मागे मागे निघाला. दोघे एक खोलीत बिछान्यावर बसले, ती नारळाच्या करवंटीत मद्य घेऊन आलीच होती, स्वतः घोट घेत होती भोलाला अजून एक करवंटीत दिली. दोघांनी भरपूर मद्यप्राशन केल
भैरवीने त्याला एका खोलीतून दुसर्या करत त्याला एका खोलीत आणले.
भोला वेगळ्या विचारात तर भैरवी भोलात दंग होती. त्याला अजून खेटून खेटून चालत होती.
आज पर्यंत असंख्य मनुष्य बळी किंवा पशु बली झाले शरीर चुन्याच्या भिंतीत पुरली होती असंख्य मृतात्मे तिथे वावरत होत. सिद्ध होण्याच्या आशेने आलेले शेवटी पशुबली म्हणून त्यांना जाव लागल होत.  त्याची जाणीव फक्त भैरवी लाच होती. 
सौदामिनी भैरवी भोला च्या प्रेमात पडली होती, भैरवीने भोला ला एका खाटेवर निजवून थोड्याच वेळात ती परत आली आता ती वस्त्रहीन होती भोला गाढ झोपला होता , त्याला जाग करत  ती त्याच्या बाहुपाशात शिरली, रतिक्रीडा करता करता दोघे बेभान होत कधीतरी निद्राधीन झाले.
सकाळी प्रभू भोला जवळ आले प्रेमाने त्याच्या मस्तक वरून हात फिरवला.
"आज महारात्री..".
"आज तु सिद्ध होशील".
"रात्री दीक्षेला सुरुवात करू..".
भोला ने त्यांना नमस्कार केला, भोला रात्री दहा च्या सुमारास परत आला होता ;
सौदामिनी ने त्याला अडवल होत वाड्यात जाण्या आधीच, मग एकदम त्याला मिठी मारून रडायला लागली होती. भोला गोंधळला होता
"काय झालं?..का रडतेस..?".भोला ने विचारलं.
"भोला इथे नको  थांबू ! ते तुला मारून टाकतील. . .".
"जा इथून, मला पण घेऊन चल", रडत सौदामिनी म्हणाली.
भोला ने तिला दूर केल आणि म्हणाला,
"काय बोलते आहेस..? अग आज महारात्री ; आज माझी ३ वर्षाची साधना सिध्द होईल  प्रभू कृपेने".
भैरवी हसली, "वेडा आहेस तु...!!!!". "वयाच्या १५ व्या वर्षी मी इथे आले आता मी ३५  वर्षाची आहे  २० वर्ष मी पशु बली बघते आहे, हे सगळे बली तुझ्या सारखेच साधक होते बलीवेदी  वर मृत्यूला समोर जाताना त्याचं भीषण रुदन आज हि माझ्या कानांत गुंजत आहे".
"आणि आजचा पशु कोण आहे, माहिती आहे का?", सौदामिनी म्हणाली.
"कोण...?".
"भोला तु आजचा पशु आहेस, आज तुझा बळी दिला जाईल...", तुझा बली देऊन प्रभू तंत्र क्षेत्रात अजून कुठली तरी एखादी सिद्धी प्राप्त करून घेतील त्या बदल्यात".
"अजून हि सांगते पळून जा..".
भोलाचा विश्वास बसत नवता
शेवटी सौदामिनी ने सांगितल्या प्रमाणे तो हळूच वाड्यात आत आला व ज्या  खोलीत प्रभू व गीरीजानंद बसले होते त्या खोलीच्या दरवाज्य जवळ गुपचूप उभा राहिला
"पशु आला का ?", प्रभू.
"नाही प्रभू", पण येईल इतक्यात". म्हणत  भैरवी ने त्यांच्या ग्लास मध्ये मद्य ओतले
गिरजानंद म्हणाला, "काल मी लाल प्रकाश केला त्याच्या जवळून धावत गेलो, पण घाबरला नाही निर्भय आहे, पण शेवट पशु तो पशुच म्हणत खीः खीः". करून हसला
"खड्ग तयार आहे ना?" , प्रभू
"हो चांगली धार केली आहे , क्षणात मुक्त", बीदानंद पण खीः खीः करत हसला , हसता हसता  भैरवी च्या नितंबांवरून  हात फिरवत तिला खचकन जवळ ओढली, तिच्या ओठां चे चुंबन घेत , "पशु आला कि वर्दी दे", म्हणाला
"हो महाराज. . .". सौदामिनी
सगळे नशेत होते गिरजानंद "प्रभू, भोलाला भैरवी विषयी काही आकर्षण वाटल नाही. . .?".
"जाऊ दे त्याच्या नशिबी ते  सुख नाही", प्रभू म्हणाले.
भोला बाहेरून एकत होता त्याच्या अंगा वर सरसरून काटा आला.
घरातून तो बाहेर आला भैरवी त्याच्या मागे होतीच.
"सौदामिनी...", त्याने तिला घट्ट मिठी मारत तिचे दीर्घ चुंबन घेतले, "तु थांब इथेच मी बघतो" इतक बोलत  अंधारात नाहीसा झाला. सौदामिनी वाड्यात जायला वळली प्रभू समोर उभे होते
"तु त्याला मदत केलीस..।".
"नाही ते नाटक  होत, मी त्याला अंघोळ करून ये सांगितल, येईल च तो"
प्रभू नी सरळ सौदामिनी लाच वेदीवर निजवल  होत गिरजानंद खड्ग घेऊन उभा होता. प्रभू डोळे मिटून आसन घालून काही तरी मंत्र म्हणत होते हा बली झाला की सर्व सिद्ध होणार होत. 30 वर्षाची साधना सफल होणार होती, मग भूतगणा वर अधिपत्य, मृत्यूवर विजय, बरच काही.
"खच...", आवाज झाला  प्रभू नी डोळे उघडले गिरजानंद याच डोक धडा पासून वेगळ होऊन जमिनी वर पडल होत. तर त्रिशूल घेऊन धाऊन आलेल्या बिदानंद याच डोक पण भोला ने उडवल होत , वेळ न घालवता प्रभू ने काही मंत्र तंत्र करण्याचे आधीच भोला बरोबर आलेल्या  एकाने  प्रभू च डोक उडवल होत.
"भोला, लवकर आता बघता बघता पहाट होईल". तो माणूस म्हणाला.
दोघांनी त्यांची शरीर चुन्याच्या भिंतीत पुरून टाकली, भैरवी दोघांना घेऊन प्रभू च्या खोलीत आली तिथे एका पेटीत बरेच पैसे व दागिने होते ते सगळं घेऊन, रक्त सांडलेली जमीन स्वच्छ करत सूर्योदयाच्या आधी तिघे वाड्याच्या बाहेर पडले होते, वाड्याला सौदामिनी ने मोठं कुलूप लावलं होत. भोला ने "हा अभेदानंद". म्हणून सौदामीनीशी ओळख करून दिली, "सध्या माझ्या कडे रहा, मग एखादं घर बघू".
"मी काही दिवस हरिद्वार ला चाललो आहे, कोणी विचारलं तर भाऊ आहे म्हणून सांग...!"
"आणि भोला तू कितीही नाही म्हणालास, दाखवलस तरी हिच्या वर तुझं प्रेम दिसत मला तुझ्या डोळ्यात",
आता पूर्वी सारखे उच्च कोटी चे तांत्रिक गुरू राहिले नाहीत, सगळी कडे गुरूंचा बाजार झालाय , त्यात राजकारण सगळं तू बघितलेच, एकदा तुला हरिद्वार येथे स्वरूपानंद यांची गाठ घालून देईन ते सांगतील तुला काय साधना करायची ती". "आणि आता सरळ लहान मुलांन करता पाठशाळा चालू कर".
दोघे ही अभेदानंद ह्याला नमस्कार करायला वाकले पण त्याने नमस्कार करू दिला नाही.
"वहिनी, हा नावा प्रमाणे च भोळा आहे ह्याची काळजी घे", म्हणत अभेदानंद निघून गेला
भोला चे डोळे भरून आले, सौदामिनी मुळे त्याचे प्राण वाचले होते. कुशीत शिरलेल्या सौदमीनीस त्यानं अजूनच जवळ घेतलं , प्रेमाने तिच्या मस्तका वरून हात फिरवत राहिला.
आजचा काल तंत्र विद्येस अनुकूल नाही कारण त्या ताकदी चे गुरू मिळत नाही. नेट वर , पेपर मध्ये येणाऱ्या जाहिरातींना, कुठल्या तरी यात्रेत मेळ्यात, कुंभात भेटलेल्या साधूंना माणस भुलतात, उत्तम गुरू लाभला तर छान च पण अशी शक्यता १% २% च असते,  बहुतेक लोकांची दिशाभूल करत आश्रम चालवतात, प्रवचने देतात, आश्रमात राजकारण गुरू शी जवळीक मग ओघाने च पैसा, स्त्री, क्षणिक मान सन्मान ह्यातच साधक ध्येय विसरून रमतात, हे चक्र अस चालू रहात, आणि असच चालू राहील
@स्वामी@

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults