वाक्य अंताक्षरी

Submitted by asp. on 20 November, 2019 - 02:17

इथे अनेक प्रकारच्या अंताक्षरी आपण खेळतो. एक नवा खेळ सुचवतो. आवडलेली वाक्ये, सुविचार, वचने, मार्मिक बोल इ. ची अंताक्षरी इथे खेळू. शक्यतो एकच वाक्य लिहू. ते कोणाचे आहे हे लिहिणे ऐच्छिक राहील. सहज माहिती म्हणून व्यक्तीचे नाव कंसात लिहायला हरकत नाही.

एक विनंती : मराठीच वाक्ये लिहा. अन्य भाषेतले असल्यास अनुवाद करावा.
स्वतः तयार केलेले अर्थपूर्ण वाक्य ही चालेल.

मी सुरवात करतो:

प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे झालेला एक हात फार मोठी प्रार्थना करतो. ( विवेकानंद).

......... आता ‘त’ चे वाक्य लिहा..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या ध्येयाला लोक हसत नसतील तर लक्षात घ्या. 'तुमचे ध्येय फार लहान आहे.' - unknown

धाग्याचा विषय आवडला.. Happy

छान सुरवात.

एक विनंती : मराठीच वाक्ये लिहा. अन्य भाषेतले असल्यास अनुवाद करावा.
स्वतः तयार केलेले अर्थपूर्ण वाक्य ही चालेल.

निळाशार, अथांग डोह आणी एक पानोपानी डवरून आलेलं पिंपळाचं झाड त्या डोहाच्या पाण्यात पाय सोडून बसलेलं निवांत!
स्वलिखित

गप्प आणि गप्पा हे दोन शब्द किती जवळकीचा शेजार घेऊन असतात; पण त्यांच्यामधील अंतर केवढे मोठे आहे !