सत्ता तो चाहिए तारो पर मजबुरी है यारो, जनता क्या कहेंगी.

Submitted by ashokkabade67@g... on 19 November, 2019 - 11:50

महाराष्ट्रात जनतेने युतीला सत्तेसाठी कौल दिला, आणि आघाडीला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून स्विकारले.पण मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी दोन्ही पक्षांनी युती तुटेपावेतो ताणली व महाराष्ट्राच्या माथी राष्ट्रपती राजवट लादली . सत्तेचा खेळ सुरू आहे पण महाराष्ट्र विनासरकार आहे, सेना म्हणते बंद खोलीत आश्वासन मिळाले तर पंधराव्या दिवशी अमित शहा म्हणतात आश्वासन दिलेच नाही बंद खोलीतील चर्चा सांगण्याची आमची संस्कृती नाही , म्हणजेच जनतेला खरे खोटे कळायला मार्ग नाही फिफ्टी फिपटीचा फारमुला ठरला होता हे मात्र खरे असावे कारण फडणवीस आणि ठाकरे दोघेही सांगत होते आमचं ठरलं,आमचं ठरलं.त्याशिवाय युती झालीच नसती. हिंदुत्व वादाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेचा एक स्वतंत्र मतदार वर्ग आहे आणि त्यामुळेच राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने दूरदृष्टी ठेवत बाळासाहेबांशी मिळतेजुळते घेऊन युती करत आपला पाया मजबूत करत भाजपचा प्रभाव वाढवला आणि सत्ताही मिळवली, आणि आधी छोटा भाऊ असलेल्या भाजपने शिवसेनेचे मोठ्या भावाचे असलेले स्थान केंव्हा हिसकावून घेतले हे सेनेला कळलेच नाही त्यातुन भाजपने दिलेली अपमानास्पद वागणूक आणि केलेली फरपट सेना विसरु शकली नाही त्यातच जनतेनं दिलेला कौलच असा आहे की सेनेशिवाय सरकार स्थापन करणे भाजपला अशक्य आहे, अशा स्थितीत सेनेने भाजपला कोंडीत पकडलं नसतं तरच. नवल ..पण या स्थितीत सेना ज्यांच्यावर विश्वास ठेवुन मुख्यमंत्री पदाची संधी मिळवू पहात होती त्या आघाडीला जरी सत्ता हवी असली तरी त्यांचिही अडचण सेनेपेक्षाही मोठी आहे कारण जसा हिंदुत्ववादी विचार सरणीचा मतदार वर्ग आहे त्यापेक्षाही धर्मनिरपेक्ष विचारसरणी मानणारा खुप मोठा मतदार वर्ग आघाडीच्या बाजुला ही आहे , आणि कडव्या हिंदुत्ववादी सेनेशी युती करुन सत्तेत सहभागी होणे या वर्गाला आवडणार नाही अशी भीतीही शरद पवारांना वाटतं असावी म्हणून आम्हाला विरोधी बाकावर बसायचा जनादेश आहे असे ते सांगतात त्यामुळे ते पाठींबा देणे लांबवता आहेत आणि शेवटी सरकार तेच बनवतील कारण सत्तेच्या आकडेवारीचा हुकमी एक्का त्यांच्याच हातात आहे . सध्या वेळ काढतील आणि नंतर महाराष्ट्रात पुन्हा निवडणूका नको आणि केवळ शेतकर्यांच्या हितासाठी आम्हाला सेनेला पाठींबा देवुन सरकार स्थापन करणे भाग पडले असं दर्शवतील.आणि सरकार पवारसाहेबांच्या अटी शर्ती वर स्थापन होईल.पण यात त्यांना नुकसान होणार नाही झालेच तर नुकसान सेनेचे होईल त्यांचा मतदार कदाचित भाजपकडे जाईल..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults