महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मतदान टक्केवारीच्या दृष्टिकोनातून

Submitted by शाम भागवत on 19 November, 2019 - 10:17

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल.

विधानसभा निवडणूकी बरोबरच टक्केवारीच्या आधारे आपली लोकशाही कुढे चालली आहे त्याबाबत माझे मत मांडायचाही विचार आहे. पण ते कधी जमेल माहीत नाही. किंवा प्रतिसादामध्येच मी त्याबाबत लिहीन.

मी एका धाग्यावर माझी मते मांडली होती. तीच परत देत आहे. त्यानंतर काही मतदारसंघांची उदाहरणे देत आहे. यासाठी अल्फाबेटीकली पहिल्या १० मतदारसंघांचा नमुना म्हणून मी अभ्यास केला व त्यातून वेगळे काहीतरी घडत असल्याचे जाणवणारे चार मतदार संघ निवडून त्याचे तक्ते जोडत आहे. याच पध्दतीने इतर जणं पण यात भर घालू शकतील. पण मतदान टक्केवारी व त्यातून निघणारा अन्वयार्थ असे त्याचे स्वरूप असेल तर बर होईल. सगळ्यांनाच एका वेगळया पध्दतीने विचार करायला किंवा शिकायला मिळू शकेल. इतकेच नव्हे तर बातम्यांवर विसंबून न राहता आपणही थोडेफार विश्लेषण करू शकू.

राजकारणावरील धागा म्हणजे निव्वळ लाथाळ्या, हे मत बदलले तर अशा प्रकारच्या धाग्यावर अनेक हुशार लोकं भाग घ्यायला लागावीत हा या धाग्या मागचा मुख्य उद्देश आहे.
---------------------------------------------

मी 13 Nov 2019 - 11:55 am ला मांडलेली मते पुढे देत आहे.
१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्का झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे.

अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो.

२. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे.

३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नीती यशस्वी होते म्हणाल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.
त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात पाराविना आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणाल्यावर त्यात फूट पाडणे हेच आघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.
थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो आघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.

जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पाहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही.

४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रित लढवू नयेत एवढीच आघाडीची इच्छा किंवा ध्येय असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज्य यांना बाजूला केले. या राज्यच त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कब्जा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय.

५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.

भाजपकडे या वेळेस इच्छुक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खूश झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनीती आहे.

६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत आघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. धृवीकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.

काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूश होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते.

७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले.

राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे.

८. पण
जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते.
दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. या वेळेसही हे होऊ शकते.
या वेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत.

९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो.

भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही.

अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा. Happy

---------------------------------------------------
२०१९ विधानसभेच्या टक्केवारीच्या गमतीजमती
१. अक्कलकुवा (1)
आघाडी

पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २७.७८
काँग्रेस ३६.७९ ४१.२६
एकूण ६४.५७ ४१.२६
युती

पक्ष २०१४ २०१९
शिवसेना ५.९१ ४०.२१
भाजप १८.६८
एकूण २४.५९
इतर दखलपात्र पक्ष

पक्ष २०१४ २०१९
अपक्ष ४.५१ १२.६९
आप २.०२
एकूण ४.५१ १४.७१
२०१४ ला नागेश पडवी यांनी भाजपातर्फे उभे राहून १८.६८% मते मिळवली होती. तर आमश्या पडवी यांना ५.९१% मते मिळाली होती. खरं तर या जागेवर भाजपाने जास्त मते मिळवली असूनही ही जागा शिवसेनेला सोडायला लागली. मागच्या वेळेचा भाजपा उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यावर त्याने चिडून जाऊन बंडखोरी केली. तरीही या वेळेस शिवसेनेला ४०.२१ टक्के मते मिळाली. मतांची ही वाढ आश्चर्यकारकच आहे.

खरे तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस२७.७८ टक्के व काँग्रेसला ३६.७९ टक्के मते मिळाली होती. म्हणजे आघाडीला एकूण ६४.५७ टक्के मते मिळाली होती. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती व काँग्रेस जिंकणार हे नक्की होते. त्यात परत युतीमध्ये बंडखोरी झालेली. म्हणजे अगदीच एकतर्फी अशी ही लढत होती. पण या वेळेस काँग्रेसला ६४.५७ टक्क्यांच्या ऐवजी फक्त ४१.२६ टक्केच मते मिळाली. म्हणजे युतीकरूनही मागच्या वेळेपेक्षा फक्त ४.४७ टक्के एवढीच वाढ?

मग राष्ट्रवादीची २७.७८ टक्कें पैकी ४.४७ काँग्रेसला मिळाली असतील तर राष्ट्रवादीची उरलेली २३.३१ कुढे गेली ?????

२०१४ साली शिवसेना व भाजप यांना एकत्रित २४.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात परत भाजपाचा बंडखोर उभा होता. म्हणजे मते मागल्यावेळेपेक्षा कमी व्ह्यायला पाहिजे होती. पण शिवसेनेला मिळाली चक्क ४०.२१ टक्के. काँग्रेसपेक्षा फक्त १.०५ टक्के कमी. अगदी नशीब बलवत्तर म्हणून ही जागा कॉग्रेसला मिळालेली आहे.

निवडणूक निकालानंतरच शिवसेना राष्ट्रवादीजवळ आली असं का समजायचे?
-----------------------------------------------------------------------

२. अहमदनगर शहर (225)
आघाडी

पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २९.७९ ४७.३३
काँग्रेस १६.३३
एकूण ४६.१२ ४७.३३
युती

पक्ष २०१४ २०१९
शिवसेना २७.७९ ४१.१९
भाजप २४.०८
एकूण ५१.८७ ४१.१९
इतर पक्ष

पक्ष २०१४ २०१९
aimim ४.०४
वंचित १.६९
बसप ०.३५ १.७२
एकूण ०.३५ ७.४६
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता. २०१४ ला आघाडीला एकत्रित ४६.१२ टक्के मते होती या वेळेस ती ४७.३३ टक्के झाली. म्हणजे आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळला असे म्हणावे लागेल.

मात्र २०१४ ला युतीला एकत्रित मते ५१.८७ टक्के असताना शिवसेनेला ४१.१९ टक्के मतेच मिळाली आहेत. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा१०.६८ टक्के मते कमी मिळालेली आहेत. याचा अर्थ भाजपाची २४.०८ टक्के पैकी १०.६८ टक्के मते फुटली आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा की, भाजपाच्या अंदाजे १४ टक्के लोकांनी युती धर्म पाळलेला असावा.

२०१४ साली चारही प्रमुख पक्ष एकत्र लढल्यामुळे या चौघांनीच ९७.९९ टक्के मते मिळवली होती. बाकीचे सगळे मिळून २ टक्के होते. त्यात बसपा ५व्या क्रमांकावर होती व तिला ०.३५ टक्के मते होती. मात्र २०१९ साली या सर्व पक्षांना पालवी फुटलेली दिसून येते. याला कारण भाजपाची फुटलेली मते आहेत हे निश्चित होते.

याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपाची मते राष्ट्रवादीकडे गेलेली नाहीत.
------------------------------------------------

३. अकोला पश्चिम (३०)
इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की काँग्रेसने वंचितशी आघाडी केली असती तर काँग्रेस जिंकली असती. त्यामुळे वंचितचा फायदा भाजपाला झाला अशीच सर्वसाधारण समजूत असते. पण २०१४ ची टक्केवारी पाहिली तर चित्र वेगळेच दिसते.
युती

पक्ष २०१४ २०१९ वध/घट
भाजपा ४६.७७ ४३.२३
शिवसेना ७.३९
एकूण ५४.१६ ४३.२३ -१०.९३
आघाडी

पक्ष २०१४ २०१९ वध/घट
काँग्रेस ६.४० ४१.७०
राष्ट्रवादी १८.८५
एकूण ५४.१६ ४३.२३ +१६.४१
बीबीएम व वंचित

पक्ष २०१४ २०१९ वध/घट
बीबीएम १६.७२
वंचीत १२.२१
एकूण १६.७२ १२.२१ -४.४९
शिवसेनेची मते भाजपाला मिळालेली नाहीत तर ती चक्क काँग्रेसला गेलेली दिसत आहेत. (काँग्रेसचा पण पाठिंबा मिळेल असे तोंडी आश्वासन राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मिळाले होते की काय?) तसेच भाजपाची मतेही ३ टक्के कमी झालेली दिसत आहेत. ही का कमी झाली याचा विचार भाजपाला करावाच लागेल.

तर वंचितच्या समावेशामुळे पूर्वीच्या बीबीएमची काही मते (मुख्यत्वेकरून मुस्लिम मते असावीत) काँग्रेसकडे वळलेली दिसत आहेत. याचा अर्थ वंचितमुळे काँग्रेसच फायदाच झालेला दिसून येतो. अन्यथा काँग्रेसची मते ४.४९ टक्क्याने कमी झाली असती.

त्यामुळे वंचीत व ओवेसी एकत्र आले तर भाजपाचा फायदा होतो तर वंचीतने ओवेसींची साथ सोडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होतो. असाही अर्थ काढता येऊ शकतो. २०१९ ला तरी वंचितमुळे लोकसभेला भाजपाचा व विधानसभेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसून येतो. काँग्रेसच्या वाढलेल्या १६.४१ टक्के मतांचा असा हिशोब लावता येतो.

-------------------------------------
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीसची उभारणी

येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच टक्केवारीच्या आधारे बातम्यांचा अर्थ लावता येऊ शकतो. उदाहरणासाठी एका बातमीचा अर्थ लावायचा प्रयत्न करू.

लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यावर वंचितची आघाडीशी बोलणी चालू असल्याची बातमी आली होती. तसेच वंचितनी ओवेसींचा संबंध सोडल्याचे पण जाहीर केले होते. वंचितने ओवेसींशी संबंध तोडले तरच जागावाटपाबद्दल बोलणी करता येतील अशी एखादी अट आघाडीने वंचितला घातली होती की काय अशी दाट शंका येतीय. त्यानुसार वंचितने ओवेसींशी संबंध तोडल्यावर आघाडीचे काम झाले होते. आता वंचितशी आघाडी करायची जरूरी नव्हती यास्तव त्यानंतर वंचितला फक्त आशेवर ठेवण्यात आले, जेणेकरून वंचितने परत ओवेसींशी संगनमत करू नये.

ही फक्त शंका आहे. पण तशीच एखादी गोष्ट परत घडली की दाट शंका येणारच ना?

एनडीएशी संबंध तोडले तरच पुढची बोलणी करता येतील अशी अट शिवसेनेला घातली गेली होती. शिवसेनेने पण ती अट पाळण्यासाठी सावंतांना परत बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेचा घोळ चालू ठेवून शिवसेनेला आशेवर ठेवले. आता भाजपानेच युती तुटली असल्याच जाहीर केल्यावर मात्र सगळंच बदललं आहे. शरद पवारांनी तर स्पष्टच सांगून टाकलंय की, शिवसेनेला सरकार बनवायला पाठिंबा देण्याबाबत त्यांची व सोनियांची अजून चर्चाच झालेली नाही.

एक अंदाज असाही आहे की, राष्ट्रवादीला सरकार व्हावं असं वाटतंय. तसे झाले तर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीपर्यंत आपली ताकद आणखी वाढवू शकेल.

तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा संशय येतोय. निवडणुकी अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीतरी संगनमत झालेले आहे. संगनमत असायला हरकत नाही पण ते संगनमत काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर काँग्रेसला कसे चालेल. तसे पुरावे मतदान टक्केवारीतून काँग्रेसला मिळाले असावेत. सरकार स्थापन झाले तर आणखी काय काय होईल काय माहीत? मला वाटते यामुळेच युती तुटेपर्यंत सोनियाजी शरदरावांच्या नाटकात काम करत राहिल्या. नंतर मात्र त्यांनी त्यांच्याबाजूने नाटकावर पडदा टाकला.
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीस समाप्त. Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महाराष्ट्रात आदि भाजपचे काय अस्तित्व होत सेनेशी युती करुन भाजप सत्तेत आली हे लेखक विसरत आहेत.
नवीन Submitted by ashokkabade67@g... on 20 November, 2019 - 19:51
<<

काबाडे साहेब,
१९८९ मधे सेना-भाजपा युती झाल्यानंतर भाजपाची कामगिरी पाहा व त्याचवेळी शिवसेनेची अवस्था काय होती ह्याची एकदा आकडेवारी पाहा मग कळेल कोण सरस होते ते.

१९६६ मधे पक्ष स्थापन करुन, विधानसभेत पहिला आमदार पाठवायला शिवसेनेला १९८५ साल उजाडावे लागले. तेच १९८० मधे स्थापना केल्यानंतरच्या पहिल्याच (१९८०) निवडणुकीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून भाजपाचे १४ आमदार निवडणुन आले होते.

महाराष्ट्रात शिवसेनेमुळे भाजपा मोठी झाली, अश्या थापा सेनेचे निगरगट्ट सैनिक व समर्थक नेहमीच मारत आलेत. उलट भाजपाचे परंपरागत मदारसंघ युती झाल्यानंतर सेनेनी दादागीरी करुन बळकावले.

विखे पाटलांनी आपल्या संस्थानात भाजपच्या उमेदवारांचं पानीपत केलं. आपल्या संस्थानात दुस-याला ते कधीच मोठे होऊ देणार नव्हते. गेम मात्र मोहिते पाटलांचा झाला. गणेश नाईकची लॉटरी लागली नसती तर अवस्था वाईट झाली असती. उगीच इथे उमेदवार देऊन काय फायदा झाला असता ? लढण्यासाठी जागा वाढल्या एव्हढेच समाधान मिळवायचे तर अवघडच आहे.

जानकरांनी सुद्धा टांग मारली निवडणुकीत. भाजपला मत देऊ नका असे मेसेजेस गेले होते धनगर तरूणात.

१९८० ला भाजपचा पुनर्जन्म झाला. किंवा जनसंघाचं जनता पक्षात विलीनीकरण झालं होतं ते मोडून ते बाहेर पडले. त्यामुळे भाज्पचा जन्म १९८० चा असं म्हणणं योग्य नाही. मधली गॅप दोन तीन वर्षांचीच होती.

शिवसेनेने निवडणुकाच लढवल्या नव्हत्या. पण त्यांच्या शाखा सर्वत्र होत्या. १९८५ ला अगदी मर्यादीत जागी निवडणुका लढवल्या, ते ही मुंबईत. ८० ला तर सेनेने निवडणूक लढवलेलीच नाही. त्यांनी सुरूवातीला औरंगाबाद आणि मुंबई मनपा ताब्यात घेतल्या मग ठाणे. नंतर मोठ्या निवडणुका लढवायला सुरूवात केली. तोपर्यंत सेनेची ताकद कळून चुकली म्हणूनच प्रमोद महाजन सेनेच्या आडोशाने आपले रोपटे वाढवू पाहत होते.

शिवसेनेने निवडणुकाच लढवल्या नव्हत्या. पण त्यांच्या शाखा सर्वत्र होत्या. १९८५ ला अगदी मर्यादीत जागी निवडणुका लढवल्या, ते ही मुंबईत. ८० ला तर सेनेने निवडणूक लढवलेलीच नाही.
<<

काय सांगताय ?
मुंबई व ठाणे या तथाकथित बालेकिल्ल्यात ८ उमेदवार उभे करुनही सेनेला १९८० च्या निवडणुकीत भोपळा देखील फोडता आला नव्हता.

तोपर्यंत सेनेची ताकद कळून चुकली म्हणूनच प्रमोद महाजन सेनेच्या आडोशाने आपले रोपटे वाढवू पाहत होते.
Submitted by पुरोगामी गाढव on 20 November, 2019 - 20:16
<<

युती झाल्यानंतर ज्या पक्षाला एकुण लढवलेल्या जागांपैकी ५०% जागाही आजवर निवडुन आणता आल्या नाहीत, त्यांची कसली ताकद व कसले काय. मुळात स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी, महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार शिवसेने पेक्षा जास्त आहे हे माहित असूनही सेनेपुढे नेहमीच नमते घेण्याचे काय कारण असावे, हेच कळत नाही.

१९८० मधे सेनेने अंतुलेंच्या सांगण्यावरून लोकसभेला २ आणि विधानसभेला ८ जागा लढवल्या होत्या. त्याला निवडणूक लढवणे असे म्हणता येईल का ? मी आधीच सांगितले मर्यादीत जागा. भक्तांकडे जे मेसेजेस फिरत आहेत ते चुकीचे आहेत.

शिवसेनेने भाजपचे उमेदवार पाडले की ते या अभ्यासातून कळेलच. पण सावंतवाडी बघा.
http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS13270.htm?ac=270
https://www.lokmat.com/sindhudurga/maharashtra-election-result-deepak-ke...
बातमीत राजन तेली यांचा उल्लेख भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हटलंय.

२. कुडाळ http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS13269.htm?ac=269
https://www.lokmat.com/sindhudurga/maharashtra-election-results-shivsena...
रणजीत देसाई - भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार असा उल्लेख आहे.

<<२०१४ मध्ये जी मतं भाजपला पडली ती सगळी भाजपची हक्काची, कायमची मानणं चूक आहे. >>

धागाकर्त्याची थिअरीच मुळात ही आहे की २०१४ मध्ये जशी मतं पडली (अ, ब ,क, ड पार्टीला) तशीच विभागणी फिक्स २०१९ ला आहे. त्यावेळी युत्या नव्हत्या, आता होत्या तरी प्रत्येक पक्षाच्या मतदारांनी 'ठरवून' मित्र पक्षाला मतं ट्रान्सफर केली किंवा केली नाहीत.
यात ५ वर्षात प्रत्येक पक्षाचे मतदार वाढले किंवा कमी झाले असतील / मतदारांनी पार्टी लॉयल्टी स्विच केली असेल हे धरलेलंच नाहीये.

>>>> शिवसेनेने निवडणुकाच लढवल्या नव्हत्या. पण त्यांच्या शाखा सर्वत्र होत्या. >>>

१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्ष, समाजवादी कॉंग्रेस (यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटिल, शरद पवार इ.) व इंदिरा कॉंग्रेस (तिरपुडे, अंतुले इ.) हे तीनही पक्ष वेगळे लढले होते. अशा तिहेरी लढतीत शिवसेनेला किमान मुंबईत तरी म्हणजे आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात भरपूर आमदार निवडून आणता आले असते. परंतु सेनेने ३५ उमेदवार उभे करूनही शून्य आमदार निवडून आले होते कारण मुंबईतील काही प्रभागांच्या बाहेर सेनेचे अस्तित्व नव्हते.

आणि म्हणे सेनेच्या खांद्यावर बसून भाजप महाराष्ट्रात वाढला. भाजपने १९८० मध्ये कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाडा, विदर्भ अशा सर्व भागात मिळून १२ आमदार निवडून आणले होते, तर १९८५ मध्ये १६ आमदार निवडून आणले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश अशा राज्यात १९८५ ते १९८९ या काळात भाजपने खूप विस्तार केला होता. तसाच विस्तार महाराष्ट्रात सुद्धा केला होता. दुर्दैवाने भाजपने कॉंग्रेस-अद्रमुकचे तामिळनाडूतील मॉडेल डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात सेनेबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीी चुकीचे जागावाटप केले. शिवसेनेचा मताधार अद्रमुकच्या तुलनेत अत्यंत शुल्लक आहे हे महाजन-अडवाणींनी समजून घेतलेच नाही.

१९७२ च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने २६ जागा लढविल्या होत्या.

>>> युती झाल्यानंतर ज्या पक्षाला एकुण लढवलेल्या जागांपैकी ५०% जागाही आजवर निवडुन आणता आल्या नाहीत, त्यांची कसली ताकद व कसले काय. मुळात स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी, महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार शिवसेने पेक्षा जास्त आहे हे माहित असूनही सेनेपुढे नेहमीच नमते घेण्याचे काय कारण असावे, हेच कळत नाही. >>>

+ १

सर्व प्रतिसादांशी सहमत.

मुळात स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी, महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार शिवसेने पेक्षा जास्त आहे हे माहित असूनही सेनेपुढे नेहमीच नमते घेण्याचे काय कारण असावे, हेच कळत नाही.. जर महाजन मुंडे शहा -दे.फ. सारखे वागले असते तर शिवसेना तेव्हाच शरदरावांचा हात पकडुन पलिकडे गेली असती. मग कदाचित पवारांनी काँग्रेसला एकटे पाडले असते.

>>> मुळात स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी, महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार शिवसेने पेक्षा जास्त आहे हे माहित असूनही सेनेपुढे नेहमीच नमते घेण्याचे काय कारण असावे, हेच कळत नाही.. >>>

हाच प्रश्न मलाही कायम पडला आहे. मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर अस्तित्व नसलेल्या सेनेसमोर, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात १६ आमदार निवडून आणलेल्या व महाराष्ट्रात चांगला विस्तार केलेल्या भाजपने दुय्यम भूमिका का घेतली हे अजूनही समजत नाही.

<< मेगाभरती करून अनेक भ्रष्ट भाजपत आणल्याने भाजपचे कट्टर समर्थक सुद्धा नाराज होते. त्यामुळे फडणवीसांविरूद्ध काहीशी सुप्त नाराजी होती. >>

------- भाजपाचे कट्टर समर्थक पक्षाने घेतलेल्या निर्णयावर कधीच नाराज नसतात. नाराज होत असततील तर ते कट्टर समर्थक कसले Happy

तो घाईघाईतला शपथविधी सोहळा भघितल्यावर... अजित पवारांसाठी बॅटिंग करत होते.

>>मुळात स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी, महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार शिवसेने पेक्षा जास्त आहे हे माहित असूनही सेनेपुढे नेहमीच नमते घेण्याचे काय कारण असावे, हेच कळत नाही.. <<
गुड क्वेश्चन. त्याकरता थोडं मागे जावं लागेल. बिजेपी (पुर्वाश्रमीचा जनसंघ) वाज नेव्हर ए स्ट्राँग कंटेंडर फॉर स्टेकिंग क्लेम इन महाराष्ट् व्हाइल इट एक्झिस्टेड. बहुमत जिंकुन सरकार स्थापण्याच्या बाबतीत त्या काळात प्रजा समाजवादि, जनसंघ आणि इतर फुटकळ पक्षांचा निभाव काँग्रेससमोर अजिबात लागायचा नाहि. हे सगळे नेहेमी विरोधी बाकांवर. '७७ मध्ये जनता दलाची मोळी बांधल्यावर या सगळ्या पक्षांना सत्तेची चव प्रथमंच चाखायला मिळाली (ती पुढे टिकली नाहि हा मुद्दा वेगळा) पण "युती" शिवाय भविष्यात पुढे "गती" नाहि हे जनसंघियांना कळुन चुकलं. ६०च्या दशकात स्थापन झालेल्या शिवसेनेने ८०-९०च्या दशकांत मुंबई/ठाणे/कोकण इ. भागांत बर्‍यापैकि जम बसवला होता. प्रजा समाजवादि, शेकाप इ. पक्ष तोवर असुन नसल्यात जमा होते, म्हणुन सेनेबरोबर युती हा भाजपाकरता नॅचरल चॉइस (बुडत्याची काठी म्हणा हवंतर) होता. आज भाजपा समर्थक कितिहि उड्या मारत असले तरी त्याकाळात सेनेबरोबर झालेल्या युतीमुळेच महाराष्ट्रात भाजपाला गेल्या १५-२० वर्षांत हे यश दिसतंय हे सत्य कोणिहि नाकारु शकत नाहि...

>>> ६०च्या दशकात स्थापन झालेल्या शिवसेनेने ८०-९०च्या दशकांत मुंबई/ठाणे/कोकण इ. भागांत बर्‍यापैकि जम बसवला होता. >>>

१९७२, १९७८, १९८० व १९८५ या चार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकूण १ आमदार मुंबईत निवडून आला होता. याला जम बसवणे म्हणतात? भाजपचे १९८० मध्ये १२ व १९८५ मध्ये १६ आमदार निवडून आले होते.

>>> म्हणुन सेनेबरोबर युती हा भाजपाकरता नॅचरल चॉइस (बुडत्याची काठी म्हणा हवंतर) होता. आज भाजपा समर्थक कितिहि उड्या मारत असले तरी त्याकाळात सेनेबरोबर झालेल्या युतीमुळेच महाराष्ट्रात भाजपाला गेल्या १५-२० वर्षांत हे यश दिसतंय हे सत्य कोणिहि नाकारु शकत नाहि... >>>

मुळात भाजप बुडत नव्हता आणि सेना फार तर गवताचे पान म्हणता येईल इतपत ताकदवान होती.

भाजपचे महाराष्ट्राच्या सर्व भागात थोडेफार अस्तित्व होते. सेनेला मुंबईतील काही प्रभागांच्या बाहेर अस्तित्व नव्हते.

अरे मग भाजप सेनेच्या कच्छपि कशाला लागली होती? अशी काय मजबुरी होती? २०१४ मध्ये विधानसभा वेगळी लढले. परत एकत्र येऊनही पाच वर्षं फक्त धुसफूस. उद्धव ठाकरेंनी यापुढे सेना स्वतंत्र लढणार म्हटलं, लोकसभेत ३०० पार केले . इतकं होऊनही युती कशाला केली?

जनसंघाची महाराष्ट्रातली कामगि री कशी होती ते सांगायचं नाही.

जयप्रकाश नारायण यांनी जनसंघाची अस्पृश्यता दूर करून जे पाप केलं त्याची फळं आज देश भोगतोय. हे त्यांनीही मान्य केलं असतं.

अरे मग भाजप सेनेच्या कच्छपि कशाला लागली होती? >>
हे तुमचं वैयक्तिक मत आहे, अर्थात त्याच्या पुष्टिदाखल काही पुरावे नसतीलच...

सेना आणि भाजप एकमेकांना काय म्हणतात हा त्यांचा प्रश्न आहे. नवरा बायको मध्ये काय काय झाले हे त्यातल्या एकाने त्रयस्थास विचारणे हास्यास्पद आहे.

Happy Happy
तो केव्हांच थांबवला.
मुंबई मनपाच्या निवडणुकांची वाट बघतोय. Happy

मिपावर चालू आहे अजून. पण गाडी भलतीकडेच गेलीय.
आता परत निवडणुका आल्यावर भेटू.
_/\_

>> विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकूण १ आमदार मुंबईत निवडून आला होता. याला जम बसवणे म्हणतात? <<
संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातुन. आता संघटना बांधली मग उमेदवार का नाहि निवडुन आले हा प्रश्न विचारु नका. त्याचं उत्तर कदाचित आरएसएस (प्री बीजेपी एरा) जास्त सविस्तररित्या देऊ शकेल... Wink

नवीन Submitted by शाम भागवत on 29 November, 2019 - 22:01 >>

चिलटांनी दिलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करण्याच्या तुमच्या संयत वृत्तीला सलाम.

>>> संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातुन. आता संघटना बांधली मग उमेदवार का नाहि निवडुन आले हा प्रश्न विचारु नका. >>>

संघटना म्हणून सुद्धा शिवसेनेचे मुंबई बाहेर अस्तित्व नव्हते.

>>संघटना म्हणून सुद्धा शिवसेनेचे मुंबई बाहेर अस्तित्व नव्हते<<
तुर्तास इतकंच म्हणेन - तुमचा अनुभव्/अभ्यास तोकडा पडतोय. ८०च्या दशकाचा शेवट होइस्तोवर सेना रायगड्/कोकण पट्ट्यात तरी भक्कम पाय रोवुन उभी होती, हे खात्रीने सांगु शकतो...

>>> ८०च्या दशकाचा शेवट होइस्तोवर सेना रायगड्/कोकण पट्ट्यात तरी भक्कम पाय रोवुन उभी होती, हे खात्रीने सांगु शकतो... >>>

रायगड भागात २००४ पर्यंत शेकापचे चांगले अस्तित्व होते. कोकणात सेनेचे अस्तित्व होते असे मानले तरी तेथून सेनेचा एकही आमदार निवडून येत नव्हता. तेथील स्थानिक निवडणुकीतही सेनेला फारसे यश मिळाले नव्हते.

Pages