लांब केस कापायचे?

Submitted by Athavanitle kahi on 18 November, 2019 - 07:01

लांब केस कापायचे

मी पार्लरमध्ये जाऊन समोरच्या खुर्चीवर बसले. केस कापायचे एवढेच म्हटले होते गेल्या दोन-तीन वर्षात मी पार्लरमध्ये आलेलेच नव्हते. हो मला आठवते बारावीची परीक्षा झाली आणि त्यानंतर मी केस वाढवायला सुरुवात केली आता माझे चांगले लांब जाड केस कापायची मला इच्छा झाली होती. तिने थोडेसे हातात घेऊन एवढे कापायची का विचारलं त्यावर हसून मी निम्म्यापेक्षाही वर एवढे कापायचे असं सांगितलं. आजूबाजूच्या दोघीजणी तरी काय गो काय झालं किती सुंदर केस आहेस का करतेस असं अगदी समजावण्याच्या सुरात मला ते केस कापू नको असं सांगत होत्या. या सर्व प्रतिक्रियांची मी कल्पना केली होतीच परंतु या प्रतिक्रिया माझ्या ओळखीच्या लोकांकडून येतील मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून येतील एवढेच वाटले होते पण या अनोळखी लोकांकडून ही याच उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुळे मी थोडीशी सुखावले. तरीही इथे केस कापण्याचा निर्धार माझा पक्का होता. त्याला का असं काहीच कारण नव्हतं आता आपल्याला लुक चेंज करायचं एवढेच काहीसं मनात होत. पार्लर वाले नाही अतिशय हळहळत थोडेसे माझे केस कापले आणि मला स्वतःहून म्हणाली, मला पैसे नकोत तू तुझ्या या निर्णयाचा पुनर्विचार कर. आमचे एक तर खूप कष्ट घेऊनही केस वाढत नाहीत जड होत नाहीत आणि तुझे एवढे सुंदर लांबसडक जाड केस असेच कापणं माझ्या जिवावर येते. यावर मी काही बोलू शकले नाही मी थोडेसे केस का कापून घरी आले. माझ्या आई-वडिलांनी माझ्या राहणीमान बाबत कधीच कोणतीच आडकाठी आम्हाला केली नव्हती. मला केस वाढवायचे असतील तर मी वाट देईन कापायचे असतील तर का पेन किंवा मला जे कपडे घालायचे ते मी घालीन संपूर्ण स्वतंत्र होते . मग कोणी आता लग्नाची वेळ जवळ आली आता तुझे सुंदर लांब सडक केस का कापत येस असा पवित्रा घेतला. अरे पण पुढल्या दोन वर्षातच माझे केस होते तेवढे लांब होतील याची मला खात्री होती. आता नाईलाजाने मी थोडेसे कापलेले केस सुट्टे सोडत होते. मला स्वतःलाच वाटत होतं हे असे मधले केस नकोत एक लांब नाहीतर एकदम छोटे . मग पुढल्या आठवड्यात एवढ्यात मी पुन्हा पार्लरमध्ये गेलेच. आता तिने माझ्या केसांचा छान कट केला होता हे नवीन रूप पाहताना माझे मलाही खूप छान वाटत होते. मग लग्नासाठी म्हणून दोन वर्षात केस वाढवले गेले त्यानंतर बाळंतपणात गेले म्हणून मी ते कमी केले पुन्हा वाढवले पुन्हा काही वर्षे छोटे होते. परंतु खरं सांगायचं तर ते लांबसडक जाड केस त्यानंतर होऊ शकले नाहीत. मी उगाचच त्यांना सहज म्हणून कापले होते. आता होतात हे लांब होतात सुंदर दिसतात परंतु तेवढे जाड होत नाहीत, तरीही मला त्याची खंत नाही कारण वयाचाही संबंध असतोच . कदाचित मी कापले नसते तरीही ही केसांची जाडी आता राहिली नसतीही. मग मी तेव्हा केस कापले म्हणून ते आता जाड होऊ शकत नाही असं तर नाहीये ना? म्हणूनच मैत्रिणींनो तुम्हाला जसे दिसायचं य तसे दिसा तुम्हाला जे करायचे ते करा बिनधास्त.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults