हळणा तो क्षण

Submitted by Athavanitle kahi on 18 November, 2019 - 00:21

हळहळ नारा तो क्षण

भाकरी का करपली , घोडा का थांबला तर उत्तर एकच " न फिरवल्यामुळे "अशा अर्थाचे एक कोडे आपण लहानपणी वाचले असेल. मला तसं म्हणायचं नव्हतं किंवा मी त्या जागी असते तर असे नक्कीच केले नसते ही वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येतात. असे अनेक प्रसंग आहेत . आपली हतबलता ही आपण अनेक वेळा अनुभवलेली असते. काहीवेळा गप्प राहिल्याने नाहीतर काही वेळा उगाच मध्ये बोलल्या मुळे होणारे नुकसान आपल्या वाट्याला आलेले असते. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य फसते किंवा एका चुकीच्या बोलण्यामुळे आपण अनेक जवळची माणसेही दुखावलेली असतात. तो क्षण ती वेळ नक्कीच पुन्हा येणं आपल्या हातात नाही. परंतु ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा येणार आपल्याच हातात असतं. पण आपण समाज आपला हुद्दा, आपली इमेज, आपली अगतिकता अशा अनेक गोष्टींचे भांडवल करत बसतो.
ट्रेन मधून प्रवास करत असताना दोन-तीन लहान गरीब मुलं ट्रेनमध्ये चढली. स्टेशन जवळ आले की चालत्या गाडीतून उतरायचं आणि पुन्हा गाडी सुटली चढायचे असा काहीतरी त्यांचा खेळ चालू होता. मिताली समोरच उभी होती. तिला प्रचंड राग येत होता, त्या मुलांना थांबवावे ओरडावे असे वाटत होते परंतु इतर बायका काहीच बोलत नाहीत मग आपणच बोलणे इष्ट ठरणार नाही असे वाटून ती गप्प बसली. आणि पुढच्या स्टेशनात नको तो प्रकार घडला, अगदी ओठापर्यंत आलेले शब्द आपण का नाही बोललो याची सल आजही तिच्या मनात खोलवर रुतली आहे
परिक्षेच्या वेळी आपली जवळची मैत्रीण कॉप्या ठेवते हे प्रीती ला माहित होते. तिने तसे न करण्याबद्दल तिला अनेकदा समजावले होते, आणि आणि त्यादिवशी सकाळी तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आजच ही पकडली गेली तर.... परंतु प्रीती तिला हे सार बोलू शकली नाही. आणि तो प्रसंग तिने डोळ्यादेखत पाहिला, तेव्हा सकाळीच आपल्या मनात हा विचार का आला होता आणि आपण तुका नाही बोलून दाखवला याची खंत तिला वाटली. हे झाले आजूबाजूच्या परिस्थितीबाबत पण तू आपल्या स्वतःच्या आयुष्यात काही असे अनेक प्रसंग आहेत जिथे आपल्याला आयुष्याने पुन्हा एक संधी द्यावी असं वाटतं
अगदी आपण अमुक अमुक गोष्ट शिकलो असतो तर खूप मोठे झालो असतो किंवा अरे मला हा नोकरीचा कॉल आला होता आणि मी शुल्लक करण्यासाठी गेलो नाही, ती संधी ती वेळ निघून गेलेली असते. आयुष्याचा जोडीदार निवडताना नाही काही संधी हुकल्याची हूरहूर काहींना असते .

काळाच पुन्हा येणं अगदी स्वाभाविक आहे वेळ मात्र पुन्हा येणार खूपच अगतिक आहे . मग थांबला तो संपला नाही का? ती हुरहुर, ती खंत किमती अगतिकता सोबत घेऊन चालायला कोणती हरकत आहे? ते आपल्या पूर्त तरी आपण मान्य केलेच पाहिजे ना? त्यातून ते काही सुधारता येणे शक्य असेल तर आपला इगो बाजूला ठेवून ते सुधारणं जास्त महत्त्वाच आहे. आणि ते नसेल हि सुधारता येण्यासारखे तरीही ती बोच मनात घेऊन जगण्यापेक्षा ते मान्य करायला हरकत नाही . मनावरचं ओझं नक्कीच कमी होईल आणि नवीन संधी नक्कीच मिळत राहतील.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults