त्याग भाग ३

Submitted by Swamini Chougule on 17 November, 2019 - 11:46

दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर ते दोघे ठरलेल्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये भेटले ,अन्विका अगोदरच कॉफी शॉप मध्ये बसून अनिकेतची वाट पाहत होती. तिला अनिकेत दारातून आत येतांना दिसला. बाहेर पाऊस पडत होता हवेत गारवा होता .

अनिकेत ," अरे अन्विका तू आज चक्क लवकर येऊन माझी वाट पाहतेस ! किती छान "

अन्विका , " हो का ? तुला छानच वाटत असेल ना "

( ती जरा नाराजीने म्हणाली )

अनिकेत , " बर तू काय घेणार ते सांग ऑर्डर करतो "

अन्विका , " काही गरज नाही मी दोन हॉट कॉफीची ऑर्डर दिली आहे आत्ताच आणि किती भिजलास तू तुला छत्री आणता येत नाही बरोबर"

अनिकेत , " बर ते राहू दे ऐक मी एक निर्णय घेतलाय आपण दोघे लग्न करू "

अन्विका , " काय ? ( अन्विका जवळ जवळ किंचाळली त्यामुळे कॉपी शॉप मधले बाकीचे लोक तिच्या कडे पाहू लागले )

अनिकेत , " ओरडतेस काय ? जरा हळू बोल "

अन्विका , " मग काय करू ? हे बघ मी तुझ्या बरोबर पळून वगैरे येणार नाही "

अनिकेत , " मी काय म्हणतोय ते तर ऐक , आज घरी गेल्यावर तुझ्या आई बाबांना विश्वसात घेऊन आपल्या बद्दल सांगून टाक ते काय म्हणतात ते आपण पाहू मग पुढेच ठरवू ; काय करायचं ते , माझ्या घरून विरोध होणार नाही पण तुझ्या घरून होऊ शकतो हे तुला ही माहिती आहे "

अन्विका , " हो मला त्याची कल्पना आहे पण मी आज धाडस करून आई - बाबांना आपल्या बद्दल सांगते .मग पाहू काय म्हणतात ते ."

अनिकेत ," बर , मग तू आज सांग घरी मग पाहू ,कॉफी
घे आपण निघू "

अन्विका ने होकारार्थी मान हलवली दोघांनी कॉफी घेतली आणि ते घरी जायला निघाले .

अन्विका घरी आली आणि संध्याकाळी तिने जेवताना तिचा आणि अनिकेत चा विषय काढला . आई - बाबांना आणि भावाला तिने तिच्या व अनिकेत बद्दल सगळे सांगितले . तसच अनिकेत ची सगळी माहिती त्यांना सांगितली.

आई - बाबा आणि तिच्या भावाला हे सर्व अकल्पित होते . त्या मुळे ते स्तब्ध झाले .थोडया वेळाने ते सावरले आणि बाबा बोलू लागले.

बाबा ," दोन वर्षां पासून हे सगळं सुरू आहे तुझं आणि तू हे आम्हांला आत्ता सांगतेस ?ते ही आम्हीं तुझ्या लग्नाचा विषय काढल्यावर"
( बाबांचा आवाज आता चढला होता ते रागाने लालबुंद झाले होते.)

अन्विका ," बाबा माझं ऐकून तरी घ्या " ( अन्विका
आर्जव करून बोलत होती)

बाबा , " काही बोलू नकोस ,तो मुलगा कुठला ? कोण कोणत्या धर्माचा ? वर तूच म्हणतेस त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे . तू आपल्या सुखवस्तू कुटुंबात वाढलेली .तुझ्या साठी आम्हीं खूप मोठी स्वप्ने पाहिलेली पण तू ती धुळीस मिळवलीस . मला हे नाते मान्य नाही .
विसरून जा त्याला "

अन्विका , " ते शक्य नाही " (अन्विका ठामपणे म्हणाली)

आई , " चांगले पांग फेडलेस पोरी आमचे "

(अस म्हणून रडू लागली)

अन्विकाच्या घरून तिच्या प्रेमाला विरोध होणार हे अन्विका आणि अनिकेत दोघांना ही माहिती होते .तशी कल्पना होती दोघांना . घडलेला प्रकार अन्विकाने रूम मध्ये गेल्यावर अनिकेतला फोन करून सांगितला व ती रडू लागली .अनिकेत फोन वर अन्विकाला समजावत होता.

अनिकेत ," रडू नकोस अन्विका आपल्याला या गोष्टी ची कल्पना होती . तू धीर सोडू नकोस मी उद्या तुझ्या बरोबर येईन तुझ्या घरी तुला मागणी घालायला"

अन्विका, " तुझा अपमान करतील बाबा;ते खूप चिडलेत , आता नको , बाबांचा राग शांत झाला की मग एक दिवस तुला मी घरी घेऊन जाईल .आपण उद्या नेहमीच्या ठिकाणी भेटू "

अनिकेत , " ठीक आहे पण तू रडू नकोस ओक बाय काळजी घे good knight "

अन्विका , " by take care gn "

अन्विका सकाळ पासून ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. ती कोणाशीच एक शब्द सुध्दा बोलली नाही . ती ऑफिस साठी बाहेर पडणार तेव्हढ्यात बाबांनी हाक मारली .

या अगोदर चे भाग वाचा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Knight म्हणजे राजा किंवा सम्राट, तर शब्द night असा लिहावा. ते नसेल शक्य तर शुभरात्र वगैरे शब्द वापरले तरी काही फरक पडणार नाही.

छान !!
शुद्ध लेखनावर खुपसे मनःपूर्वक लक्ष दिल्याबद्दल अभिनंदन. अजूनही काही सुधारणा नक्कीच अपेक्षित आहेत, पण तुम्ही आतापर्यंतचे प्रतिसाद गांभीर्याने घेऊन सुरुवात तर केलीत हेही नसे थोडके !

@अज्ञानीजी
धन्यवाद शुद्ध लेखन अजून सुधारण्यासाठी प्रयत्न करत राहिन