प्रेमाची परवड अंतिम

Submitted by Swamini Chougule on 16 November, 2019 - 12:21

प्रवीण नव्वद टक्के भाजला होता तर सुमेधा साठ टक्के भाजली होती. प्रवीण दोनच दिवसात मरन पावला. सुमेधा मृत्यूशी झगडत होती. तीच्या मुलांना तीच्या नातेवाईक त्यांच्या घरी घेऊन गेले. इतक सगळ झाल्यावर सुमेधाची आई व भाऊ नसते आले तरच नवल सुमेधाचा भाऊ आता चांगल्या सरकारी नोकरीला लागला होता. त्याने सुमेधाच्या उपचाराची सगळी जबाबदारी घेतली . त्याने सुमेधाला सरकारी दवाखान्यातुन एका चांगल्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथे सुमेधाला चांगले उपचार मिळाले . सुमेधाच्या भावाने तीची चांगली काळजी घेतली.

सुमेधा हळूहळू बरी होऊ लागली. ती सतत भावा जवळ प्रवीणची विचारना करत असे पण तीचा भाऊ काही तरी बहाण्याने सुमेधा पासून सत्य लपवत होता .आता सुमेधा पूर्ण बरी झाली .मग तीच्या भावाने तीला प्रवीण गेल्याचे सांगीतले . सुमेधाला प्रवीण गेल्याचा धक्का बसला ती खूप रडली . तीने प्रवीणवर खूप प्रेम केले होते .पण प्रवीणने तीला प्रेमाच्या बदल्यात तीच्या शरिरावर जळण्याचे व्रण व मनात खूप सारे घाव दिले होते.

सुमेधा मुलां कडे पाहून लवकरच सावरली . एक वर्षात ती पूर्ण बरी झाली आणि पुन्हा आपल्या मुलांन बरोबर आपल्या घरी राहु लागली. सुमेधाचा भाऊ तीला काय हव काय नको ते तत्परतेने पाहत होता .पन सुमेधाचे मन तीला खात होते. किती दिवस ती भावाकडून मदत घेनार होती आधिच सुमेधाच्या भावाने तिच्या उपचारासाठी खूप खर्च केला होता. आता सुमेधा पूर्ण बरी झाली होती. भाऊ नको म्हणत असताना सुमेधा पुन्हा धुणीभांडी करू लागली.

तिची मुले हळूहळू मोठी होत होती. असेच पंधरा वर्षांचा कालावधी गेला. आता सुमेधाची मोठी मुलगी लग्नाला आली होती. सुमेधाने तिच्यासाठी चांगले स्थळ पाहुन तीचे लग्न करून दिले. तिचा मुलगा ही आता मोठा झाला होता. तो ही सुमेधाला काम करुन हातभार लावू लागला. शाळा करून तो पार्टटाईम काम करत होता. सुमेधाने तिच्या लहान मुलीचे ही तिच्या परिणे चांगले स्थळ पाहून लग्न करून दिले.

आता ती मुलाबरोबर सुखाने राहू लागली. मुलाचे ही योग्य मुलगी पाहून सुमेधाने लग्न लावून दिले. सुमेधा तिच्या जबाबदारीतून मोकळी झाली.

सुमेधाने प्रविणवर प्रेम केले होते. तिने त्याच्याशी लग्न ही केले, पण प्रविण तिच्या प्रेमास, तिच्या विश्वासास पात्र ठरला नाही. त्याने सुमेधाला आयुष्यभर दु:ख दिले. शेवटी जग सोडून जातानाही त्याने सुमेधाच्या मनावर व शरीरावर कधीही न मीटू शकणारे व्रण दिले. सुमेधाने प्रविणवर निस्सीम प्रेम केले,पण प्रविणने सुमेधाच्या प्रेमाची परवड केली....

Group content visibility: 
Public - accessible to all site users