माझ्या नजरेतला रुपेरी पडदा (भाग 1)

Submitted by आत्रिक on 12 November, 2019 - 10:54

माझ्या नजरेतला रुपेरी पडदा (भाग 1)

http://surajponkshe.blogspot.com/2019/11/1.html

जसे मी थोडेफार छायाचित्रण करतो, त्या पेक्षा जास्त मी स्क्रीनला चिकटून असतो. हॉलिवूड चित्रपट बरेच पाहून झाल्यावर फ्रेंड्स या मालिकेपासून मी इंग्लिश मालिका पाहायला सुरुवात केली.
खरतर मालिकेवर लिहिताना पहिला मन मी फ्रेंड्स लाच दिला पाहिजे पण ती मालिका काहीशी विस्मृतीत गेल्यामुळे आणि काही भाग अनेकदा बघितल्याने विचारांना दहा दिशा फुटल्या आहेत.
मराठी मध्ये सुद्धा या विषयावर अनेक जणांनी नक्की लिहिले असेल, त्यात माझी थोडी भर.

तर आत्ता अगदी लिहिण्यास कारण की मी पाहत असलेल्या दोन मालिका..
१. Person of interest :
https://www.imdb.com/title/tt1839578/
२. Breaking bad: https://www.imdb.com/title/tt0903747/
अनायसे मी या दोन मालिका एकाच वेळी पाहत आहे. त्यामुळे त्यांची तुलना मनात चालू झाली.
दोन्हीही मालिका मी अजुन पाहतो आहे, त्यामुळे पुढे जाऊन अजुन मला नवीन तुलना सुचेलच, पण आत्ता आहे ते असे...

दोन्ही मालिकांचे विषय अतिशय वेगळे आहेत. पहिली आहे ती electronic गोष्टींमधून सर्वांवर नजर ठेवणाऱ्या मशीन विषयी. तर दुसरी आहे एक रसायन शास्त्राचा प्राध्यापक अमली पदार्थ काय साखळीत कसा शिरतो त्याविषयी.

दोन्हीही मालिका 3 4 सत्रांनंतर सुद्धा तितक्याच उत्कंठावर्धक आहेतच, शिवाय उत्कंठा तयार करण्याच्या नादात निर्माते दिग्दर्शकांनी तर्काला कुठेही फाटा दिलेला नाही
अशीच मी एक मालिका पाहिली, agents of shield
माझ्या लाडक्या मार्वल कॉमिक च्या चित्रपटिय विश्वाशी जोडलेली ही मालिका मी मोठ्या आशेने चालू केली. मित्राने आधीच कल्पना देऊन सुद्धा मी आशेने बघत होतो. पण दुसऱ्या सत्राच्या शेवटी एक पत्र एवढं बावळटपणा करते की सरळ सरळ पाणी घालून चार दिवस सासूचे केल्याचे कळले आणि मी त्या मालिकेला राम राम केला.

Person of interest मित्राने सुचवल्या वर जेव्हा मी पाहिले की 5 सत्रांमध्ये प्रत्येकी 23 24 भाग आहेत तेव्हा मला संशय आला की यात पाणी घातलेले असणार. पण अजुन तरी मालिकेची चव अप्रतिम आहे. एकदम झणझणीत.

Person of interest ही मालिका खूप वेगात घडते. प्रत्येक भाग हा नवीन पात्रे घेऊन येतो, अनेकांचे काम त्या भागापूर्तेच असते. मालिकेचे स्वरूपच तसे आहे. पण एवढी सगळी छोटी कथानके करत असतानाच काही मोठी कथानकं घडत असतात. ती लक्षात ठेवण्यात सुद्धा मजा येते. एकूणच मालिका इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे नजर ठेवण्याची असल्याने प्रसंग बदलताना वापरलेलं सीसीटीव्ही फुटेज वेगळे आणि उत्तम आहे.
मालिकेत काळात पाठी जाताना वापरलेले तंत्र पण उत्तम. शिवाय प्रसंग घडताना सीसीटीव्ही ची दृश्य दाखवल्याने खूप मस्त आणि कथानकाला साजेसा परिणाम आलाय. याशिवाय संभषणामध्ये विनोद ही आहे आणि तो सुद्धा अतिशय उत्तम प्रतीचा. अगदी चितळे बाकरवडीसारखा. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे तर्क कुठेही कमी पडत नाही, किंवा माझ्या भाषेत कथानकात कुठेही भेग सापडत नाही, एवढं मोठा पसारा अतिशय उत्तम रीतीने जोडलेला आहे.
अभिनय देखील उत्तम आहे. अभिनेत्रींची निवड थोडी जास्त चांगली करता आली असती पण हरकत नाही. सर्व प्रमुख अभिनेते अत्युत्तम. तसेच प्रमुख पुरुष पात्रांना अतिशय सुंदर शारीरिक वैशिष्ट्ये दिली गेल्याने आणि ती त्यानी अतिशय उत्तम रितीने सादर केल्याने नेत्रसुख मिळते.

हे थोडे झाले person of interest विषयी. आता breaking bad याच्या उलट आहे. अतिशय संथ गतीने जाणारी मालिका. मधेच वेगवान ही होते पण एकूणात संथच. तरीही अतिशय उत्तम रीतीने यात प्रसंग घेतलेले आहेत. या मालिकेत भावनांना जास्त स्थान असल्याने प्रत्येक व्यक्तिरेखेच्या चेर्यावर उमटणाऱ्या भाव भावना योग्य तेव्हढा वेळ घेऊन सादर केल्यामुळे मालिकेला उंची प्राप्त झालेय. कधी कधी उत्कटता या छोटया गोष्टींना भारी पडते आणि ते प्रसंग 10 सेकंदाने पुढे नेले जातात, पण म्हणून मालिका निर्म्यात्यांचे श्रेय कमी होत नाही. त्यांचे प्रयत्न जागोजागी दिसतात. या मालिकेत सुद्धा तर्काला, कथानकातील धाग्याना अतिशय उत्तम रीतीने जोडले गेले आहे. कुठेही फट दिसत नाही कथानकात. मालिका अगदी सुरुवातीला थोडी काळात पुढे मागे करते पण नंतर सरळ पुढेच जाते. तरी निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी काही क्लृप्त्या योजला आहेत, जसे की एक प्रसंग काहीही संबंध नसला तरी अनेक भागांच्या सुरुवातीला दाखवला आहे. आपण विचार करत राहतो की हे नेमके आहे काय? पण थांगपत्ता लागत नाही.
तर अशी ही माझी तुलना, दोन्ही मालिका उत्तम आहेत, नक्की बघा.

Group content visibility: 
Use group defaults

मालिकांविषयीचा आणि त्यांची ओळख घडवून आणण्याकरता चांगला धागा.

फक्त शीर्षक बदला - रूपेरी पडदा (silver screen) हा चित्रपटांकरिता वापरला जातो मालिकांकरता नाही. शीर्षकामुळे उगीच वेगळा समज होतो की हा लेख चित्रपटांबद्दल आहे.

पर्सन ऑफ इंटरेस्टचा विषय चांगला आहे आणि पहिले एक दोन सिझन ती चांगली चालू रहाते आणि मग गाडी रुळावरुन घसरते.
ब्रेकिंग बॅडबद्दल इथे भरभरुन लिहिलं गेलं आहे. नजरेखालून घाला.