२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

Submitted by हस्तर on 12 November, 2019 - 01:48

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

आमच्या वार्ताहराकडून
हाती लागल्या बातमी नुसार राष्ट्रवादी ने सरकार बनविण्यास असमर्थता दाखवली आहे व अजित यावर छातीत सुकून (दुखून) लीलावती मध्ये ऍडमिट झाले आहेत ,भाजप चे पण विखे,राणे ह्यांच्या छातीत दुखत आहे पण हॉस्पिटल बंद करायची इच्छा नसल्याने त्यांना दाखल केले गेले नाही

शेवटी राज्यपालांनी काँग्रेस ला बोलावले पण मॅडम दिल्ली हुन येणे अवघड असल्याने राज्यपाल स्वतः १० जनपथ येथे गेले व सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे अशी चिट्ठी घेऊन आले
( गुप्त सूत्रणानुसार ह्या दररोज च्या वैताग वाडी पेक्षा मला अफगाणिस्तान किंवा सिरिया मध्ये टाका असे विनन्ती मोदी यांना करायचा मुख्य उद्देश्य माननीय राज्यपालांचा होता असे कळले ,लौकरच आपली आयुष्य भराची कमाई घेऊन निवृत्त होऊन काश्मीर मध्ये प्लॉट घेणार आहेत असे पण कळले )

प्रत्यक् पक्षाला सरकार बनवण्यास दिला गेलेला वेळ
भाजप- १०५ ३ दिवस
शिवसेना - ५६ १ दिवस
राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
काँग्रेस- ४४ दोन्ही मिळून एक दिवस
बहुजन विकास आघाडी- ३ १२ तास
एमआयएम- २ ८ तास
समाजवादी पार्टी- २ ४ तास
प्रहार जनशक्ती पार्टी- २ २ तास
माकप- १ १ तास
जनसुराज्य शक्ती- १ ३० मिन
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १ १५ मिन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १ १० मिन

राष्ट्रीय समाज पक्ष- १
स्वाभिमानी पक्ष- १
शेकाप - १
अपक्ष- १३
एकूण जागा- २८८

पण जेव्हा राज ठाकरे ह्यांना आमंत्रण दिले गेले तेव्हा जादू ची कांडी फिरली व राज्यपाल (पहिल्यांदा) हस्तर (हसत) मुखाने बाहेर येऊन सरकार स्थापन झालायची घोषणा करून आले

भाजपच्या गोटात ' ह्यांना बहुतेक काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी ने पाठिंबा दिला आहे ,आपण विरोधी बाकावर बसलो तर विखे ह्यानंच पक्ष प्रमुख करतील विरोधी पक्षाचा अनुभव असल्याने त्या पेक्षा आपण पाठिंबा देऊन टाकू "

शिव सेनेच्या गोटात ' ह्यांना बहुतेक काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी ने पाठिंबा दिला आहे,बाळा साहेबांचा शब्द खरा करू राज ला मुख्य मंत्री करू ,विरोधी बाकावर बसलो तर हसे होईल "

काँग्रेस आणि राष्ट्रवादी "ह्यांना बहुतेक भाजप शिवसेना पाठिंबा दिला आहे,आपण पण पाठिंबा देऊन टाकू कारण राज ने आपल्या बाजूने प्रचार केला आहे "

शेवटी अश्या प्रकारे राज ठाकरे एका आमदारावर मुख्यमंत्री झाले

राज्यपाल ह्यांचा बीपी १९० ,दररोज प्रकाश आंबेडकर ,ओवेसी आणि राजू शेट्टी विरोधी पक्ष नेते पद साठी भांडत आहेत

तळटीप
सादर लेख खरा नसून http://www.fakingnews.com/ च्या धर्तीवर लिहिलेला आहे ,हलक्यात घेणे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults