अपूर्ण प्रेम

Submitted by Swamini Chougule on 11 November, 2019 - 08:56

विभा ने सुदेश ला whats app वर अनन्या च्या लग्नाची पत्रिका पाठवली आणि अनपेक्षित पणे सुदेश चा फोन विभा ला आला .तो तो अनन्याचे अभिनंदन करण्या साठी विभा ने फोन अनन्या कडे दिला . सुदेश ; " अभिनंदन अनन्या लग्न कधी आहे.

आणि हे मला विभाने सांगितले का आपल्या ह्या गरीब मित्राला विसरलिस होय?"

सुदेश अगदी सहज पणे बोलत होता पन अनन्या इकडे त्याला बोलताना अवघडली होती .ती सुदेशशी बोलताना कधी नव्हे ते संकोचत होती .पन आपली स्थिती सुदेश ला न कळु देता तीने अभिनंदन स्वीकारले;

अनन्या ; " धन्यवाद सुदेश " एवढच ती म्हनाली. तिने

ना सुदेशला लग्नाला येन्याचा आग्रह केला ना त्याला दुसर काही बोलली.

अनन्या वेगळ्याच विचारात हरवली तिला मनातुन अप्राध्यासारख वाटत होत . आणि ती तिच्या हि न कळत दोन वर्षे मागे गेली. तिला सुदेश च्या पहिल्या भेटी पासून सगळ अठवु लागल .

अनन्या एका उच्च मध्यम वर्गीय कुटुंबातील उच्च शिकक्षित मुलगी गोल चेहरा ,गोरा रंग,थोडी स्थूल, गालावर छानशी खळी ,आकर्षक व्यक्तिमत्त्व पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडाव अशी सुंदर

सुदेश ही दिसयला गोरापान ,घारे डोळे , आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा एक उच्च शिक्षित तरुण. सुदेश आणि अनन्याची ओळख अनन्याच्या चुलत भावाच्या लग्नात झाली होती दोघेही जवळ पास एकाच वयाचे होते . सुदेश अनन्याच्या भावाचा मित्र होता . सुदेश आणि अनन्याची चांगली मैत्री झाली होती.तसा सुदेश अनन्या चा fiamaly friend झाला होता .तो अनन्या च्या घरी काही ना काही कारनाने सतत यायचा अनन्या च्या घरचे वातवरण तस्स फ्रि होत त्यामुळे गप्पा मरने whats app वर बोलने रोजचेच होते .

सुदेश चा स्वभाव तसा चेस्टेखोर होता दोघांच हि छान पटायच . त्यातच सुदेश च्या लग्ना साठी मुलींचा शोध त्याच्या घरच्यानी सुरु केला होता मग काय अनन्या देखील तिच्या चांगल्या मित्रा साठी मुलगी शोधु लागली .पन सुदेश च्या मनात काही तरी वेगळेच होते .

सुदेश जेव्हा अनन्या च्या घरी यायचा तेव्हा लग्नावरुन अनन्या त्याला छेडायची चिडवायची

इतकच काय पन तिने सुदेश साठी एक स्थळ ही सुचवले होते.पन सुदेश नेहमीच म्हनायचा कि माझ्या साठी मुलगी इथेच कुठे तरी असेल मग अनन्या त्याला म्हणायची कि कर ना मग लव म्यारेज सुदेश हि काही कमी नव्हता तो म्हनायचा कि मग मला मुली शोधतेस ती इथेच आहे .ह्या उत्तरावर अनन्या त्याला मग कर कि लग्न तिच्याशी उगच आमचा ही वेळ वाचेल अस म्हनायची मग काय सुदेश गप्प बसायचा .

सुदेश बरेच दिवस अनन्या ला भेटला नव्हता . किव्हा त्याने फोन ही केला नव्हता अनन्या ला वाटले कि तो बिजी असेल त्याच्या कामात पन तिच्या भावने सांगितले कि सुदेश आजारी आहे आणि तो दवखन्यात ॲडमिट आहे. अनन्याने त्याला फोन केला आणि त्याची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितल कि त्याला कसली तरि गाठ आली होती घशाला ती काडली आता मी बरा आहे आणि मला सोडलय आता घरी मी ठिक आहे.मी येइन एक महिन्यात घरी तुला भेटायला. पन अनन्या चे समाधान झाले नाही ती सुदेश ला पाहायला ती त्याच्या घरी गेली सुदेश ची तब्बेत खूपच ढासळली होतीअनन्या त्याला आराम करायचा सल्ला देउन घरी आली.

सुदेश आणि अनन्याचा संपर्क whats app वर चालुच होता . अनन्या सुदेश कडे एक चांगला मित्र म्हणून पाहत होती पन सुदेश च्या मनात तिच्या बद्दल वेगळ्याच भावना होत्या पन सुदेश त्या व्यक्त करु शकत नव्हता कारण त्याला अनन्याची मैत्री गमवायची नव्हती.पन एक दिवस त्याने हीम्मत करून अनन्या समोर त्याच्या भावना व्यक्त केल्या त्याच प्रेम आहे अस त्याने अनन्याला सांगितले .अनन्यासाठी हा धक्काच होता कारण तिने सुदेश बद्दल असा कधीच विचार केला नव्हता आणि त्याला तश्या नजरेतुन कधी पाहिले नव्हते.ती त्याला स्व:ता चा एक चांगला मित्र समजत होती तीला सुदेशला काय उत्तर द्यावे ते कळत नव्हते म्हणून तिने त्याच्या कडे विचार करायला वेळ मागीतला आणि सुदेश ने हि तो आनंदाने दिला

अनन्या विचारात पडली कारण हे तिला अनपेक्षित होत. आणि होकर दिला तरी त्यांचे प्रेम घरच्यान कडून स्वीकारले जाईल न्ह्याची शाश्वती नव्हती कारण त्यांच्या कास्ट वेगवेगळ्या होत्या पन सुदेश तिला मित्र म्हणून आवडत होता. तीने विचार करायला पंधरा दिवस लावले आणि सुदेशला होकार द्यायचा निर्णय घेतला पन लग्न करन्याच्या अटिवर

इकडे सुदेश बरेच दिवस online नव्हता . अनन्या ने त्याला तीचा होकार त्याला फोन करुन कळवला आणि लग्न करन्याची अट हि सांगितली तिला वाटले होते सुदेश लगेच होकार देइल कारण सुदेश ने तिला स्व:ता प्रपोज केल होत पन घडले उलटेच ......

सुदेश अनन्या शी ह्या गोष्टीवर बोलन्यास टाळाटाळ करु लागला. अनन्याला सुदेश च्या वागन्याचे आश्चर्यवाटू लागले आणि त्याचा राग ही येउ लागला .तीला वाटू लागल कि सुदेश ला नुसती girl friend हवी त्याला जबाबदारी नको आहे म्हणून ती सुदेश शी खुप भांडली त्याच

पुढील कथा खालील लिंक वर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी कथा आवर्जून शोधून वाचल्या बद्दल धन्यवाद सर तुम्ही माझ्या कथा, कविता व वैचारिक लेख www. swaminichougule08.ml या माझ्या ब्लॉग वर ही वाचू शकता .

सगळी कथा इथे का नाही पोस्ट करत? अर्धी इकडे अर्धी तिकडे अशी का पोस्ट करताय. मायबोलीचा वापर स्वतःचे ब्लॉग view वाढवण्यासाठी करताय का?

कोण वाचतंय आणि कोण नाही हे जाऊ द्या. पण स्वतःच्या ब्लॉगच्या लिंका इकडे देण्यापेक्षा पूर्ण गोष्ट इथे लिहा. अ‍ॅडमिनने अजुन हे बीबी बघितलेले दिसत नाहीत.

दुसऱ्या संकेतस्थळांची, अथवा आपल्या ब्लॉगची कळत/नकळत जाहीरात करणे माबो धोरणात बसत नसावे.
त्यामुळे इथले जुने सदस्य पूर्ण लेख / कथा इथे पोस्ट करा असे सांगत आहेत.

आणि माबो धोरणात असो नसो, माबो सारखे संकेतस्थळ जे लिखाणाची पूर्ण मुभा देते तिथे आपल्या लिखाणाची केवळ झलक देऊन पुढील कथा अमुक तमुक ठिकाणी वाचा असे का बरे करता? पूर्ण लिखाण इथे पोस्ट करून "पूर्वप्रकाशीत : "ही त्या पूर्वप्रकाशनची लिंक"" असेही करता येईल.