लघु कथा - गोडसर लिंबू.....

Submitted by यतीन on 11 November, 2019 - 01:26

लघु कथा - गोडसर लिंबू.....

मी शकुंतला ऊर्फ शकु, शकुन की अपशकून च्या फेर्‍यात अडकलेली तशी मी श्रद्धा बाळगून अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारी एक सामान्य घरातील साधीसुधी गृहिणी पण रीती रिवाजाच्या किंवा प्रथेच्या चक्करात सापडलेली. वंश वेल जपणे एक तरी दिवा लावणे या अशा भोळ्या भाबड्या भ्रामक कल्पनेत बिधरलेली.
माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणूस प्राण्यांना काही ना काही तरी चाली रिती चिकटलेल्या असतात. समाजाने किती ही प्रबोधन केले तरी आपण त्या रूढी परंपरा च्या विळख्यात भरडले जातो.
या बंधनांना कसे आवरू हेच कळत नाही, जे जे सजीव त्यांना बंधने असतात का?
बरं असतील तर ती बंधने सजीव असतात का? का - ती - निर्जीव ???
पण खरं तर या बंधनांना तर आपण चिरंजीवी सारखे बाळगतो.

हे काय मी कुठल्या गोष्टीवर भाष्य करते आहे, चिंता - विवंचना याच आपल्या ब-या आपण आहोत तो पर्यंत त्या आपल्या बरोबर असतात अन् आपण गेलो की आपल्या बरोबरीने त्याही संपतात. जे पेरतो ते उगवते आणि काही काळानंतर ते अस्ताला जाते. जश्या छोट्या छोट्या झाडी झुडपे उगवतात आणि कुठल्या ही रीती रिवाजात न अडकता आपले कार्य करून जातात. सगळ्या सजीवता झाडाझुडपांनी बहरलेली बाग खुपच सुंदर व आपसूकच आकर्षित करणारी असते. त्यातल्या त्यात परसबाग ही एक खुपच छान टवटवीत दिसणारी रोजच्या रोज फुले उमलणाारी व आपल्याही ताजीतवानी ठेवणारी असते, अशीच माझी ही परसबाग आहे.
मा‍झ्या परसबागेत सुध्दा छोटी रोपटी, फुलझाडे किंवा थोडे मोठे पण फळ देणारे झाडे आहेत. असेच एक लिंबाचे झाड आहे आणि हो हे झाड सध्याला माझ्याशी छान गप्पा मारते, तशी मी सर्वच परसबागेशी हितगुज करते पण ह्या लिंबाच्या झाडा बरोबर छान गोड...... हो गोड गप्पा मारते. तसे हे लिंबाचे झाड खुप वर्षांपूर्वी पासून आमच्या परसबागेत आहे, ते छान बहरते फुलते, टवटवीत दिसते आणि पाना फुलांनी बहरून तरतरीत दिसते.
एवढे छान सुंदर अशा झाडाबद्दल मला कुठे तरी खटकले काहीतरी बिघडले असे मला जास्त जाणवले. सारखे मला वाटत होते की हे झाड गेले कित्येक वर्षे फळ न देताच ते तरतरीत दिसते पण आतून कुठे तरी मूग गिळून गप्प बसलेले वाटते म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारते आणि गप्पा मारता मारता दु:ख ही विचारते, पण ते काहीच बोलत नाही फक्त शांत राहते. हे असे बरेच दिवस चालू होते शेवटी मी त्याला खुप विनवण्या केल्या तेव्हा ते कुठे माझ्याशी बोलले आणि त्याने मनातले काळे आभाळ सगळे मोकळं केलं, तेव्हा कुठे मला कळलं की यांनीही काही वेदना असतात यांनाही काही दुःखे असतात.
त्याने सांगीतले गेल्या कित्येक त्रतूपासून मी एकही फळ देऊ शकलो नाही, या क्षितीजाला रुजवायला काहीच देऊ शकलो नाही. फळ न देता उदर भरण करायला नको वाटते, नुसतेच उभे राहायचे आणि फुले फळे ने देता ताडा माडा सारखे रुतून राहायचे हे पटत नाही म्हणूनच मी फार एकचित्त व शांत राहतो.
हे सगळे ऐकल्यानंतर मला थोडे गहिवरले, त्याचे दुःख माझ्या पेक्षाही जास्त वाटले.
न राहून मी त्याला एक विचारले की "तुला येणारे फळ तर आंबट, त्यात गोडवा नाही," तर मग तु का तुझे मन कडु करते.
फळ कसे गोड गोंडस असावे, ते सर्वांना हवे हवेसे वाटणारे हवे.
त्यावर तो म्हणाला अगं वेडे आपले फळ आपल्याला बळ देणारे असते, ते कसेही असले तरी ते आपले बाळ असते. त्याला वाढविणे व त्याला फळू देणे हेच तर आपले कार्य असते आणि असे होत नसेल तर आपला काय उपयोग, म्हणून मला टवटवीत असून हसता येत नाही आणि बहरत असून फळे देता येत नाही याचीच जास्त खंत आहे.
हे सर्व ऐकून मी पुरती गपगार झाले, प्रत्येकाला वाटत असते की "आपल्यालाच जास्त दुःख आहे" हे किती चुकीचे आहे.
मन भरून आल आंवढा गिळत तिचे दुःख कमी करण्याचा प्रयत्नात माझेच दुःख खुजे झाले. मी अशीच त्याच्या सारखीच दुःखी, कोमेजलेली होते.
या लिंबाच्या गोड झाडाकडे पाहून मला त्याच्या सारखेच छान बहरायचे अन् फुलायचे, पोटातले दडवायचे अन् सर्वांना तरतरीत दिसायचे.
हे मी शिकले माझ्या आंबडसर गोड हो गोड लिंबा कडून...........
यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults