खडतर आयुष्य ! तीच-१२

Submitted by रिना वाढई on 6 November, 2019 - 06:50

कॉलेज , घर आणि राजीव असा एक वेगळा विश्वच तिच्यासाठी बनला होता . पाहता पाहता दोन - चार वर्ष निघून गेले . तीच कॉलेजही संपलं होत . आता त्यांच्या सुखाच्या वेलीवर एक नवं फुल येण्याची चाहूल त्यांना लागली . दोघेही अगदी आनंदात होते . राजीव तिला खूप जपायचा .
लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी मुलं होत असल्याने थोडे comlications सुद्धा वाढले होते . या प्रेग्नेंसीचा नको तेवढा त्रास तिला होत होता . डॉक्टर च्या म्हणण्याप्रमाणे २-३ महिने असा त्रास होणे अगदी नॉर्मल होते . मात्र २-३ महिन्यानंतरही तिला उलट्यांचा त्रास सुरूच होता . जेवणाकडे नुसतं पाहिलं तरी तिला मळमळ वाटायची . आधीचे २-३ महिने तिने बेडवरच काढले होते . जेवण जात नसल्याने अंगात शक्तीच उरली नव्हती आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या बाळाचा वजन वाढतच नव्हता .
त्यांचं हे पहिलंच मुलं असल्याने राजीव आणि ती जरा जास्तच tenssion घेऊ लागले होते . घरात कोणीतरी मोठी व्यक्ती तिच्या काळजीसाठी पाहिजे होती , पण राजीव च्या घरून कोणीच यायला तयार नव्हते आणि तिच्या घरूनसुद्धा . घरच्यांचं मत होत कि ह्या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल आहेत . हि काही पहिली स्त्री नाही जी बाळाला जन्म देणार . त्यामुळे उगाचच काळजी करण्यासारखं काही नाही असं त्यांना वाटायचं .
राजीव सोबतीला होता म्हणून तिने ६-७ महिने त्रास सहन करतच काढले होते . पण राजीव ला अजून तिची परीक्षा बघायची नव्हती . तिला होणारा त्रास तो फक्त बघू शकत होता , मनात येऊनही ते वाटता येणे शक्य नव्हते . म्हणून त्याने तिला आता गावीच ठेवायचा निर्णय घेतला . दिवसभर ऑफिस असल्यामुळे तो तिच्या सोबत संपूर्ण दिवस राहू शकत नव्हता आणि तिला या अवस्थेमध्ये एकटी घरी ठेवू हि शकत नव्हता .
तिच्या सासरी सातव्या महिन्यात तिची ओठी भरण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला . त्यावेळेस राजीव ने तिच्या आई-वडिलांना सांगितलं कि आता तुम्ही आमच्याकडे येऊन नाही राहू शकत, तर निदान तिला तरी तुमच्यासोबत घरी ठेवा . दिवसभर तिला आता कोणाची तरी साथ हवी आहे .
इथे ठेवायला हरकत नाही पण इथेही तिची काळजी पूर्णपणे घेतली जाणार नाही . तिच्या आई-वडिलांना राजीव चे बोलणे पटले होते . तिची अवस्था तशी हि काळजी करण्यासारखीच झाली होती . ७ महिने होऊनसुद्धा तिला उलटी , मळमळ ह्यांचा त्रास होतच होता . कधी कधी तर रात्रभर झोप सुद्धा येत नव्हती तिला . ओठी भरण्याच्या आदल्या रात्रीच तिने एकदा रक्ताची उलटी केली होती . त्यामुळे तिची जास्त काळजी घेणे गरजेचे च होते .
ठरल्याप्रमाणे तिचे आई-वडील तिला घरी घेऊन आले . बाळाचे स्वप्न राजीव आणि ती , दोघांनी मिळून बघितले होते . त्याची संपूर्ण वाढ , तो जन्माला येईपर्यन्त राजीव तिला तिच्या सोबत हवा होता . पण परिस्थिती बदलली आणि ती राजीव ला सोडून आपल्या माहेरी गेली .
ती राजीव पासून दूर राहायला जरी गेली असली तरी तिला त्याची चिंता वाटत होती . राजीव हि उठता , बसता , खाता-पिता तिला फोन करत होता . दर पंधरा दिवसातून भेटायला सुद्धा येत होता .
९ महिने होऊन गेले , आतापर्यन्त सगळं सुरळीत चाललं होत . एक शेवटची सोनोग्राफी बाकी होती . ती झाली आणि त्यामध्ये कळलं कि तिच्या शरीरात पाहिजे तेवढा रक्त नाही आहे . मग अजून ट्रीटमेंट सुरु झाली . बाळ केव्हाही जन्माला येऊ शकणार होत आणि त्यासाठी तिला स्वतःच शरीर सुदृढ ठेवायचं होत . रोजचे इंजेकशन्स , रोजच्या सलाईन्स तिला देण्यात येत होते . एकदाच रक्त वाढलं तीच .
आई-वडील खेडे गावातले असल्यामुळे तिथे हॉस्पिटलच्या पाहिजे तेवढ्या सोयी नव्हत्या . राजीव ने सुचवलं कि डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या एक - दोन दिवस आधीच तुम्ही लोक माझ्या घरी जाऊन राहा .ती इकडे राहायला आल्यापासून तिची ट्रीटमेंट हि तिथेच सुरु होती . सासर हे शहरी ठिकाणी होत ,पण तिथे तीन -चार महिने काढणे शक्य नसल्याने ती आई-वडिलांकडे राहणे पसंत केली होती .
पण तोच निर्णय तिला आता अयोग्य वाटू लागला होता . एकदा मुलगी लग्न होऊन सासरी गेली कि आई-वडिलांसाठी ती फक्त पाहुनी असते असं तिला वाटायला लागलं होत . एवढे दिवस आपले सगळे चोचले पुरविणारे आई-वडील अशा क्षणी असा निर्णय घेतील असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं .
ती रात्र तिच्यासाठी वैरी ठरली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिना अहो एकाच व्यक्तीच्या आयुष्यात इतके वाईट प्रसंग एवढे टपुन बसलेले नसतात. ओ..>>>
मी इथे एका true स्टोरी बद्दल च लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . हं थोडेफार changes करून लिहिल्या आहेत त्या घटना .
आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे एकाच्याच आयुष्यात एवढे वाईट नाही घडू शकत . पण हे आयुष्यच असं आहे कि त्यामध्ये कोणाच्या वाट्याला काय येतो we never know .
बाकी तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

रिना अहो एकाच व्यक्तीच्या आयुष्यात इतके वाईट प्रसंग एवढे टपुन बसलेले नसतात. ओ..
असतात मी खुप बघितले आहेत असे प्रसन्ग

असतात मी खुप बघितले आहेत असे प्रसन्ग>>
सोनाली तुमचं अगदी बरोबर आहे . या पेक्षा हि मनाला हेलावून सोडणारे प्रसंग घडत असतात कोणाकोणाच्या जीवनात .

गरिबी ही क्लेशकारक असते. गरिब परिस्थितीमधील खूप महिलांचे याहून वाईट अनुभव ऐकले आहेत. खरेतर परिस्थिती पेक्षा आपल्या जवळपासच्या व्यक्ती चांगल्या असाव्या लागतात.मग कितीही वाईट प्रसंग आले तरी माणूस त्यातून बाहेर पडतो.

नमस्कार नाजिक छान लिखाण आहे सगळे बारा भाग काल वाचून झाले पण प्रतिसाद देण्यास वेळ मिळाला नाही आता प्रतिसाद देत आहे खूप छान लिखाण आहे पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे खरंच एवढे आयुष्य कठीण असते का हा प्रश्न मला पडला आहे असे आयुष्यात त्याच्यापेक्षाही पडतं प्रसंग लोकांच्या आयुष्यात आलेले मला बघण्यास मिळाले आहे तर आपण असेच सत्य घटनेवर लिहित रहावे हीच आशा करतो आणि थांबतो आपल्या प्रतिसादाची वाट बघत आहे धन्यवाद

धमाल धवल , मनापासून आभार तुमचे १२ हि भाग वाचल्याबद्दल . खरतरं समोरच भाग टाकण्याची इच्छा नव्हती (नाजूक कथा असणार होती म्हणून ) पण तुमचे प्रतिसाद लक्षात घेऊन नक्कीच पुढचे भाग टाकेल मी . धन्यवाद .