डोळ्यांसम्बधि प्रश्न

Submitted by दक्षा on 6 November, 2019 - 05:25

नमस्कार,

माझा मुलाच्या डोळ्यांना धुळीची एलज्री आहे, मी दर ६ महीन्यांनी त्याला जे.जे. होस्पिटलमध्ये तपासायला नेते, पण या वेळेला मला डॉक्टरने सांगितले कि त्याच्या बुबुलाचा पडदा पातळ झाला आहे, त्याला डोळे जास्त चोळायला देऊ नका मी खुप काळजी घेते पण यावर अजून काहि उपाय आहे का?

धन्यवाद

दक्षा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्युट हैद्राबाद इथे चौकशी करा. फार चांगले सर्जन व आय स्पेशालिस्ट उपलब्ध आहेत.

दक्षा,
पनवेलला डॉ. हळदीपूरकर हे डोळ्यांचे स्पेशालिस्ट आहेत त्यांना दाखवा. त्यांचे पनवेल आणि अजून दोन ठिकाणी क्लिनिक्स आहेत.

<पनवेलला डॉ. हळदीपूरकर हे डोळ्यांचे स्पेशालिस्ट आहेत त्यांना दाखवा. त्यांचे पनवेल आणि अजून दोन ठिकाणी क्लिनिक्स आहेत.>
+1

टीअर ड्रॉप्स (किंवा तत्सम) वापरून (डॉ च्या सल्ल्यानेच) बघितले आहे का? माझ्या आईला असाच प्रॉब्लेम होता. तिला त्या ड्रॉप्सनी खूप आराम पडला होता. जास्त न चोळणे, धुळीत जाताना (जसे खेळताना वगैरे) आधी ते ड्रॉप्स घालणे अशा बेसिक काळजीने तो प्रॉब्लेम खूप आटोक्यात राहतो.

पडदा पातळ का झाला आहे? माझ्या पेशंटच्या बाबतीत स्टेरॉईड्सने तो प्रॉब्लम झाला होता. आधी गुण आला पण नंतर पडदा पातळ झाला.

डोळ्याला वारंवार अ‍ॅलर्जी होण्याचे कारण बर्‍याचदा डोळे कोरडे असणे (अश्रूग्रंथी पुरेसा द्रव तयार न करणे) हे असू शकते.
इथे आ.रा.रा. म्हणून आयडी आहे. त्यांच्याशी संपर्क साधा.

धन्यवाद
तुमच्या प्रतिसादाबद्दल, मी नक्की पनवेल ला जाऊन विचारते

दक्षा, खाली डॉ आफळेंचा नंबर देतेय, त्यांच्या ठाण्याच्या क्लिनिकचा आहे, त्यांना फोन करुन त्यांच्या दादरच्या क्लिनिकचा पत्ता घ्या. ह्या डॉक खुप अनुभवी आहेत अन ऊत्तम ऊपचार करतात. माझा स्वत:चा अनुभव आहे. कॉलेजात असताना मला एका डोळ्यासमोर मच्छरा एवढा काळा डाग दिसायचा, खुप डॉककडे गेले, डोळ्यांच्या स्पेशालिस्टला दाखविले पण फरक पडत नव्हता, पण ह्यांनी तो घालविला.
जर तुम्हाला योग्य वाटले तर बघा

Dr. Aphale's Eye Hospital
Phone: 098336 99623