मैत्रीची वीण

Submitted by शीतल.. on 5 November, 2019 - 12:35

थकलेले जीव सारे,
रात्रीच्या कुशीत निजले होते.
आभासी दुनियेत हळूच जाऊन,
स्वप्न आपली रंगवत होते.

दिवसभराचा ताण शीणवटा,
हिरावून घेतला स्वप्नांनी.
कोवळी किरणे सूर्याची,
अन् पक्षांच्या किलबिलाटानी.

सुरू झाला दिवस मैत्रीच्या हाकेनी,
Good morning ला साथ दिली उत्स्फूर्त कवी मनानी.
एकमेकांपासून आपण लांब जरी,
मैत्रीची वीण आहे गुंफलेली.

Group content visibility: 
Use group defaults

Good morning! Happy
कविता अप्रतिमच.. आवडली..