रेंज नाही त्या तिथे गेलास तू

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 November, 2019 - 20:51

भेटलो ना फोनही केलास तू
रेंज नाही त्या तिथे गेलास तू

सजवते आयुष्य मी निर्जीव हे
प्राण तर देहातला नेलास तू

सांग ना भडका कसा विझवू मना ?
चांदणे म्हणतोस जर तेलास तू

सांब मिळतो का कुठे शोधूनही ?
वाहते आहे जरी बेलास तू

बाप करतो चौकशी आईकडे
करवदत म्हणतो जरी 'मेलास तू !'

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users