स्त्री बॉसच्या हाताखाली काम करणे पुरुषांना त्रासदायक जाते का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2019 - 16:21

(माझ्या दुसरया एका धाग्यात पुरुषांवर कमवायचे दडपण असते का ही चर्चा थोडीशी ट्रॅक सोडून स्त्री बॉसवर उगाचच गेलीय. तिथली चर्चा रूळावर राहायला आणि हा देखील एका चांगल्या चर्चेचा विषय वाटल्याने स्वतंत्र धागा. तिथल्या प्रतिसादकर्त्यांना ईथे लिहायची विनंती)

तिथलेच मुद्दे घेऊन चर्चा पुढे न्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे माझे विचार न समजता, माझ्याशी वाद न घालता, या मुद्द्यांवर स्वतंत्र चर्चा अपेक्षित. माझी मते आणि विचार चर्चेदरम्यान प्रतिसादात येतील.

१) मेल फिमेल ईगो प्रॉब्लेम - स्त्री बॉस असेल तर हाताखाली काम करणारया पुरुषांचा ईगो दुखावतो. तिच्या ऑर्डर सहन होत नाहीत. तिने बॉसिंग गाजवलेली आवडत नाही.
याची दुसरी बाजू अशीही की स्त्री बॉसचा देखील पुरुषांना ऑर्डर सोडताना ईगो सुखावण्याची शक्यता असते.

२) अजय यांच्या मतानुसार मासिक पाळीच्या दिवसात स्त्री ची चीडचीड होते आणि त्याचा राग हाताखालच्यांवर निघतो. भले यात त्या स्त्री ची चूक नसेल. कारण हे नैसर्गिक आहे. पण हाताखालच्यांना त्रास व्हायचा तो होतोच.

३) आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता असते.

अजून काही मुद्दे असतील तर जोडा तसेच हे चुकीचे वाटल्यास खोडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरस कट हा फक्त सरांसोबत खेळला जातो, किंवा मॅड मस्कट हा फक्त मॅडम सोबत ही चुकीची समजूत आहे.
>>>

ईश्श! अस सांगा ना मग दोघांचा खेळ आहे.
पण नाव एकावरूनच हा अन्यायच आहे.
जसे लग्न हा दोघांचा खेळ आहे. पण आडनाव मात्र बाईच बदलून नवरयाचे लावणार.

कसले डबल मिनिंग टाकताय!!!
>>>
मी माझ्या धाग्यावरचे प्रतिसाद वाढवायला कुठल्याही थराला आणि कितव्याही अर्थाला जाऊ शकतो.

थर ढासळल्यामुळे इथुन कल्टी
>>>

अपेक्षित होते
जर मी समोरच्याला जाणीव करून देतो की मी त्याचा वापर माझ्या धग्यावरचे प्रतिसाद वाढवायला करतोय तेव्हा त्याचे कलटी मारणे अपेक्षितच असते Happy

रुन्मेष>>>तुझ्या हजर जबाबीपणाचे नेहमीच कौतुक वाटते,किती पटकन सुचते तुला गोल गोल बोलायला

मायबोलीवरच्या बॉस लोकांनी मिळून आता "मायबोलीवर टीपी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काम कसे करून घ्यावे?" असा धागा काढावा.

माझी मते आणि विचार चर्चेदरम्यान प्रतिसादात येतील. >>>>> हे आमिष आहे की भीती ?

स्त्री बॉसच्या हाताखाली काम करणे पुरुषांना त्रासदायक जाते का? >>> स्त्री बॉस खूप उंच असेल किंवा पुरूष बुटका असेल तर मग त्रास होणार नाही. अर्थात हात कमी उंचीवर धरला असेल तर अडचणीचे जाईल. पण हाताखालीच काम करायचा असा आग्रह का ?

हाताच्या समोर, पाठीमागे, वर, आजूबाजूला देखील काम करता येईलच.

३) आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता अस ते
हेच पूर्षांच्या बाबतीत का घडू शकत नाही

  • ३) आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता अस ते
    हेच पूर्षांच्या बाबतीत का घडू शकत नाही

  • ३) आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता अस ते
    हेच पूर्षांच्या बाबतीत का घडू शकत नाही

  • ३) आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता अस ते
    हेच पूर्षांच्या बाबतीत का घडू शकत नाही

  • माझ्या हाताखाली 2 पुरुष व 1 स्त्री काम करते. दोन्ही पुरुष अगदी मजेत असतात, आमचे मस्त ट्युनिंग आहे. माझ्या हाताखाली काम करताना त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही. स्त्री मात्र माझ्याविरुद्ध सतत तक्रारी करत असते. आमच्या hod ने तिला दुसऱ्या टीम लीड्ससोबत काम करायची ऑफर दिली, दोघेही पूरुष आहेत. तिला तेही नकोय, पण माझ्याविरुद्ध तक्रारीही करायच्या आहेत.

    गम्मत अशी आहे की हाताखालचे दोघेही पुरुष कामात बरे आहेत, एक पूर्ण फ्रेशर होता ज्याला मी सगळे शिकवले. जिथे अडते तिथे माझी मदत घ्यायला किंवा नवे काहीही ज्याबद्दल त्यांना माहिती नाही त्याबद्दल मला विचारायला त्यांना अजिबात लाज किंवा संकोच वाटत नाही. त्याविरुद्ध त्या स्त्रीला काम अजिबात येत नाही व हे लपवायची धडपड ती सतत करत राहते. असे करू नकोस, तुझेच नुकसान आहे हे मी हजारदा सांगूनही ती असेच करते आणि काम बिघडवून ठेवल्यावर मी शिव्या घातल्या की तक्रारी करते.

    आपल्याला कोणासोबत काम करताना त्रास होत असेल तर त्रासाचा जनक आपणच तर नाही ना हे एकदा तपासून पाहायला हवे.

    आपल्याला कोणासोबत काम करताना त्रास होत असेल तर त्रासाचा जनक आपणच तर नाही ना हे एकदा तपासून पाहायला हवे. >>
    बरोबर. बहुतेक सगळेच बॉसच्या नावाने खडे फोडतानाच दिसतात, स्वतः कुणाचे बॉस असलेले सुद्धा.

    मेल किंवा फिमेल कोणालाही मॅनेज करायला अथोरिटी, ज्या विषयात मॅनेज करायचं आहे त्याचं ज्ञान, ते ज्ञान नसेल तर लोकांना योग्य माहितगाराकडे रिडायरेक्ट करणं, त्या माहितगाराशी तो त्यांना माहिती देईल इतके चांगले संबंध असणं महत्वाचं असतं.'बायका घरातल्या भांडणाचा राग पुरुष रिपोर्टि वर काढतात' किंवा पुरुष 'मुद्दाम पॉवर डिस्प्ले करून बायकांना मूर्ख सिद्ध करून कामात खालच्या दर्जाला ठेवायचा प्रयत्न करतात' इतकं जनरलायझेशन सोपं 2+2=4 असं गणित नाहीये ते.यात बॉसेस चे प्रांतिक/वांशिक/जातीय पूर्वग्रह/पूर्वानुभव लक्षात घ्यावे लागतात.(लीडरशिप ट्रेनिंग मध्ये ऐकलेले जार्गन्स द्यायचे तर: परसेप्शन आणि फॅक्ट मधला फरक ओळखून निर्णय घ्यावे लागतात.)
    मला अत्यंत चांगले पुरुष बॉस, अत्यंत कुत्रे/डुक्कर पुरुष बॉस, अत्यंत चांगली स्त्री बॉस/असुरक्षित वाटून सर्वांसमोर चुका काढणारी स्त्री बॉस हे सर्व प्रकार भेटले आहेत.

    मला अत्यंत चांगले पुरुष बॉस, अत्यंत कुत्रे/डुक्कर पुरुष बॉस, अत्यंत चांगली स्त्री बॉस/असुरक्षित वाटून सर्वांसमोर चुका काढणारी स्त्री बॉस हे सर्व प्रकार भेटले आहेत.

    मला पण
    hence +1111111111

    >>>> मला अत्यंत चांगले पुरुष बॉस, अत्यंत कुत्रे/डुक्कर पुरुष बॉस, अत्यंत चांगली स्त्री बॉस/असुरक्षित वाटून सर्वांसमोर चुका काढणारी स्त्री बॉस हे सर्व प्रकार भेटले आहेत.<<<< +

    पण तरीही, मला पुरुष बॉस बरेच बरे वाटतात कारण त्यांचे ज्यास्त चांगले अनुभव आहेत स्त्री बॉस पेक्षा. किंबुहना, पुरुष बॉसचे प्रमाण( अनुभवाचे) ज्यास्त असल्याने मला असे वाटते.

    वाईट अनुभवात स्त्री/पुरुष दोन्ही असले तरी, त्यांचे पॅरामीटर वेगळे दिसलेत.
    स्त्री बहुतेक वेळा असुरक्षित, स्त्री ईर्षा तर पुरुष ज्यास्त पुरुषी ईगो वगैरे पॅरामीटर्स.

    मात्र माझ्या हाताखालील काम करणारे स्त्री/ पुरुष असल्याने मला फरक पडत नाही. आळशी (कामचुकार), अजागळ आणि हळू काम करणार्‍यांची मला अत्यंत चीड आहे, तेव्हा बहुतेक माझे सबऑरडिनेट तीच तक्रार करतात आणि अर्थातच ते, आळशीच प्राणी असतात असे माझ्या चौकशीत दिसते.

    Pages