वाचून झालेल्या दिवाळी अंकांच्ं काय करायचं?

Submitted by स्वप्ना_राज on 2 November, 2019 - 13:58

मंडळी, दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुध्दा मी दिवाळी अंक घेतलेत. पण मागच्या वर्षीपर्यंत ज्या वॉचमनला मी ते वाचायला देऊन टाकायची तो आता आमच्या सोसायटीत नोकरीला नाही. लायब्ररीवाल्याने आम्ही अंक लायब्ररीत ठेवू शकत नाही असं सांगितलंय. अंक रद्दीत टाकायला जीव होत नाही. मुंबईत असे वाचून झालेले अंक वृध्दाश्रमाला किंवा लायब्ररीत द्यायची काही सोय/उपक्रम माहित असेल तर कृपया कळवा. धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठेऊन द्या घरातच. ५-६ वर्षांनी पुन्हा दिवाळीत काढा आणि वाचा. आत्ता वाचलेले ५-६ वर्षात विसरलेले असतेच. पुन्हा नवीन दिवाळी अंक वाचल्यासारखे वाटेल. असे करत राहिल्यास काही वर्षांनी नवीन दिवाळी अंक घेण्याची गरजच पडणार नाही.

असा उपक्रम माहेत नाही. पण असं वैयक्तिक पातळीवर करणार्‍या व्यक्ती माहीत आहेत.
माझे एक नातलग दरवर्षी कोकणातल्या एका गावात ल्या वाचनालयासाठी पुस्तकं देतात. सगळ्या वयोगटासाठी. पुस्तकं विकत घेण्याची त्या वा चनालयाची क्षमता नाही. गेल्या वर्षी मीही त्यांच्या हाती माझ्याकडची काही पुस्तकं पाठवली होती. ते दिवाळी अंकसुद्धा नेतात आणि माझ्याकडचे दिवाळी अंक तिथेच पोचवायचा बेत आहे.

वृद्धाश्रमात स्वतःच जाऊन विचारता येईल. आनंदवन का कोणाचं तरी पुस्त कं मागणारं एक आवाहन मायबोलीवर वाचल्यासारखं आठवतंय.
अशा संस्थांतही विचारता येईल.

गुगलबाबाला विचारलं तर अनेक उपक्रम दिसले. त्यातला हा एक माझ्या कॉलेज कडूनच चालवला जातोय.
https://bookshareindia.com/#0

रद्दीत दिलेली पुस्तकं स्क्रॅप केली जातातच असं नाही. जुन्या बाजारात येतात. (पूर्वी तरी यायची. आताचं माहीत नाही.)

माझ्याकडेही गेल्या काही वर्षांचे दिवाळी अंक आहेत. रीडर्स डायजेस्टचं कलेक्शन आहे.

भरत म्हणतात तसं,
मी दिवाळी अंकच काय पण वाचुन झालेली सगळीच मासिके, पुस्तके साठवून ठेवते.... एक कलेक्शन आहे. अगदी पु.लंच्या हसवणूक फसवणूक पासून गृहशोभीका पर्यंत.... त्याची अडचण वगैरे होत नाही..... उलट एक छान छोटेखानी संकलन तयार होते.

नवीन काही वाचण्यासारखं शिल्लक नसेल तर, दोन-चार वर्षांपूर्वी चे वाचलेले पुस्तक, अंक पुन्हा कधीतरी बाहेर काढायचे.... ते परत परत वाचतानाही डोक्याला काही ना काही खुराक नव्याने मिळतच असतो.

- ठेवायला अगदीच जागा नसेल तर मग आश्रमात दान करणे योग्य.

चित्रलेखा चा एक दिवाळी अंक होता.त्यात अत्तर वगैरे बद्दल सुंदर लेख होता.कोणाकडे रद्दीत/ऑनलाइन विकत मिळत असल्यास कळवा

आणि हो स्वप्नाली तू अंक विकत वगैरे देणार असशील तर सांग.....मला दे.
- माझ्याकडे बहुतेक अंक आहेतच.पण माझ्या आईला मिळाले नाहीत तिच्यासाठी. तीला सुद्धा जुने पुराणे अंक काढून वाचत बसण्याची सवय आहे.

थोडा वेगळा विचार मांडतो.

वाचून झाल्यावर अंक रद्दीत घालण्यात काही गैर नाही. रद्दी दुकानांची एक योजना चांगली असते. ते असे अंक वेगळ्या गठ्ठ्यात विक्रीस ठेवतात. ते ग्राहकाला २० रु. ला विकतात. वाचून झाल्यावर परत केला की १० रु. परत देतात.
माझ्या मते हा उत्तम पुनर्वापर आहे.

दिवाळी अंकातील जाहिरात-पानांचे प्रमाण जबरी असते. प्रत्येक अंकाला साठवणमूल्य नसते. एखादा लेख खूप आवडल्यास त्याचा फोटो काढून जतन करता येतो.

Hi pl put a list out . I want naval dhanurdhari if you can send to me i will pay courier charges.

अमांशी सहमत,
तुम्ही लिस्ट टाका ज्याला हवा आहे अंक तो मागवेल आणि स्वतः करियर चा खर्च करेल,तुमच्या ही प्रॉब्लम चे सोल्युशन आणि समोरच्याला सुद्धा मस्त,
फक्त थोडा वेळ जाईल तुमचा यासाठी,तो घालवायची तयारी असेल तर खूप छान उपक्रम होईल हा
त्याचबरोबर कोणाकडे पुस्तके वगैरे असतील तरी हा मार्ग अवलंबता येईल

मायबोलीवर कोणीतरी पुढाकार घेऊन एक माबो वाचनालय सुरू.करा. प्रत्येकाने आपापले दिवाळी अंक वा वाचून झालेली नको असलेली पुस्तके तिथे जमा करायची. ज्यांना हवी त्यांनी तिथे जाऊन आणायची वाचायची परत ठेवायची. जो जी देवाणघेवाण करेल ती लागलीच ईथल्या धाग्यात अपडेट करायची.

सॉरी आधी फोन वरून पोस्टत होते. मराठीत लिहिता येइना. मी पण उद्या परवात इथे लायब्ररी आहे तिथे दिवाळी अंकांसाठी लावणार आहे. एक म्हणजे फार बारीक प्रिंट आता वाचवत नाही. डोळे डोके दुखतात पण वाचयचा सोस जात नाही अजून. तुम्ह्यी इथे यादी द्या काय अंक आहेत ती.
सेंट्रल साइड ल असाल तर मी येउन पण घेउन जाइन. नाहीतर दादर झिंदाबाद.

>>स्कॅन करून पाठवा की watchman ला . किंवा त्याच्या नवीन सोसायटीत जाऊन द्या त्याला .

बाप रे! एव्हढा वेळ, उत्साह आणि चांगूलपणा नाहिये हो माझ्याजवळ. आणि तो इथून कुठे गेला तेही माहित नाही.

>>ठेऊन द्या घरातच. ५-६ वर्षांनी पुन्हा दिवाळीत काढा आणि वाचा

हे ऑप्शन असतं तर नक्की वापरलं असतं पण घरात आधीच बरीच पुस्तकं आहेत.

>>त्यांच्या हाती माझ्याकडची काही पुस्तकं पाठवली होती. ते दिवाळी अंकसुद्धा नेतात आणि माझ्याकडचे दिवाळी अंक तिथेच पोचवायचा बेत आहे.

भरत, तुमचे हे नातेवाईक कुठे असतात रहायला?

>>आणि हो स्वप्नाली तू अंक विकत वगैरे देणार असशील तर सांग.....मला दे.

अग, माझा पहिला प्रेफरन्स एखाद्ं वाचनालय किंवा वृध्दाश्रम आहे कारण तिथे त्याचा बर्याच लोकाना उपयोग होईल. तसं काही जमलं नाही तर तुला नक्की देईन. विकायचे वगैरे नाहियेत ग.

अमा, तुम्हाला हवे असलेले अंक नाहीत हो माझ्याकडे. तसंच अजून अंक वाचून व्हायचेत. आदू, शक्यतो अंक एकगठ्ठा द्यायचेत. एरव्ही तुमची कल्पना चांगली आहे. साद, तुमचा विचारही पटला. हे असं असतं हे माहित नव्हतं. ऋन्मेष, कल्पना छान पण implementation कठीण आहे. Sad DJ, माझ्याकडे बंब नाही Proud

सर्वांना धन्यवाद! इथे जवळ एखादा वृध्दाश्रम असेल तर तिथेच चौकशी करते.

आमच्या शेजारच्या काकू वाचून झालेले दिवाळी अंक बंब पेटवायला वापरायच्या. ५-६ महिने तरी पुरायचे ते अंक.>>>>>>> काय हे Sad

आमच्या शेजारच्या काकू वाचून झालेले दिवाळी अंक बंब पेटवायला वापरायच्या. ५-६ महिने तरी पुरायचे ते अंक.>>>>>>> काय हे Sad >> हो.. आम्हालाही आधी हे असंच वाटायचं 'काय हे' वगैरे पण नंतर कळले की काकांवर सूड उगवण्यासाठी त्या तसं करायच्या. लग्नाच्या बायकोला दिवाळीला पैठणी हवी तर शिफॉनवर बोळवण करायचे आणि १०००-५०० चे दिवाळी अंक घ्यायला बरे पैसे असतात म्हणुन त्या असे करायच्या म्हणे. दिवाळी अंकांचे एक एक पान जळताना पाहुन काकांचा जीव दिवाळीनंतर पुढे अक्षय्य तृतिये पर्यंत रोज तीळ तीळ जळायचा.. Uhoh

Dj. Biggrin

रीडर्स डायजेस्टचं कलेक्शन आहे.>> माझ्याकडे पूर्वी होतं जुनं रीड र्स डायजेस्ट फार छान असायचं. अनेक विषयांची बाबींची ओळख झाली. तेव्हा इंटरनेट नव्हते व परदेशातील राहणी मान, प्रश्न, छानसे इंग्रजी विनोद , वर्ड क्विझ हे सर्व फार आव्ड्ते आहे व होते. आता त्यांचा फॉर्मेट बदलून फार कमर्शिअल झाला आहे. वाचवत नाही. माझे पूर्ण इंगर्जी हे आरडी वाचून डेव्हलप झाले आहे. इतके छान की त्यावर कॉप्राइटर चा जॉब पन मिळून गेलेला. त्याचा बुक सेक्षन, एक जीवनातील सनसनाटी घटना टाइप, हाउ आय सर्वाइ वड वगैरे, प्लस नव्या प्रकारच्या रोगांची ओळख
मधूनच जीझस सेवज वगिअरे यायचे.

माझ्याकडे मॅड मासिका चे पण हार्ड कॉपी कलेक्षन मस्त होते. मी करंट्याने देउन टाकले एकांच्या मुलांना वाचायला. त्यांचे पुढे ऑफिसात भांडान झाले व ते जॉब सोडूनच गेले माझी मॅड परत केली नाहीत. आता बंद झाले मॅड.

माबो वर बा फ काढले तर निर्णय घ्यायला नक्की मदत होते . जे मनात आहे ते दृढ होते. जसे हे दिवाळीअंक खरे तर वाचनालय किंवा वृद्धाश्रम ला द्यायचे आहेत. अब लायब्ररी जाना पडेंगा.

>>माबो वर बा फ काढले तर निर्णय घ्यायला नक्की मदत होते . जे मनात आहे ते दृढ होते. जसे हे दिवाळीअंक खरे तर वाचनालय किंवा वृद्धाश्रम ला द्यायचे आहेत.

असेल कदाचित. माझा निर्णय हा धागा काढण्या आधीच झाला होता म्हणून मी असा काही उपक्रम कोणाला माहित आहे का असंच स्पष्टपणे विचारलं होतं.

कुठलेही पाककृती विशेषांक (साप्ताहिक सकाळ सोडून) असतील तर प्लिज मला सांगा. साप्ताहिक सकाळचे असे अनेक अंक मी जमवले आहेत.

>>कुठलेही पाककृती विशेषांक (साप्ताहिक सकाळ सोडून) असतील तर प्लिज मला सांगा

सॉरी सई. मी पाककृती विशेषांक नाही घेत हो. सध्या तरी मुशाफिरी आणि अक्षरलिपी एव्हढे दोनच वाचून झालेत. लोकमत, लोकसत्ता, भवताल, कालनिर्णय, अनुवाद वगैरे बाकी आहेत वाचायचे. किल्लाचे अंक मी जपून ठेवते म्हणून ह्या लिस्टमध्ये दिलेलं नाहिये.

वृद्धाश्रम हीच योग्य जागा आहे असे मलाही वाटते. तिथे ते अंक एकापेक्षा जास्त लोकांकडून वाचले जातील. आणि ती जनरेशन दिवाळी अंक आवडीने वाचणारीही असेल.

>>वृद्धाश्रम हीच योग्य जागा आहे असे मलाही वाटते. तिथे ते अंक एकापेक्षा जास्त लोकांकडून वाचले जातील. आणि ती जनरेशन दिवाळी अंक आवडीने वाचणारीही असेल

अगदी अगदी. अंक कुठे दिले ते इथे नक्की पोस्ट करेन. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार Happy

कागदाच्या कलाकृती बनवायला उपयोगी पडतात. पानं गुळगुळीत असल्याने विमानांना हवेचा रेझिस्टन्स जास्त फेस करावा लागत नाही. साध्या कागदाच्या विमानापेक्षा दिवाळी अंकांची विमानं जास्त लांबचा पल्ला गाठतात. तसेच जहाजावर पाण्याचा परिणाम लवकर होत नाही त्यामुळे ते सुद्धा लांबवर जातात.

बोकलत Lol

लहानपणीचे उद्योग आठवले

मला दे, मी वाचेन. किंमत सांग, पत्ता देते, तिथे पाथव, प्लीज. त्यानिमित्ते मला वाचता येतिल.

ईथे आणुन इथल्या लायब्ररीत देईन, इथल्या मराठी आजी आजोबांची सोय होईल.

काय हे... मी घेतलेले (मोजून 3) अंक उघडलेही नाहीयेत, आणि वाचून झालेल्या अंकांचे काय करू म्हणून धागा सुद्धा आला Sad

माझा निर्णय हा धागा काढण्या आधीच झाला होता म्हणून मी असा काही उपक्रम कोणाला माहित आहे का असंच स्पष्टपणे विचारलं होतं.>> बरोबर आहे तुमचे. मी उगीच डीरेल केले. क्षमस्व.