मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही शिवसेना तडजोड करील काॽ

Submitted by ashokkabade67@g... on 30 October, 2019 - 11:15

महाराष्ट्रात जनतेने भाजपचे अबकि बार दोसो बिसके पार हे घोषवाक्य सपानच ठरवत भाजपला सत्तेपासून दुरच ठेवले ,पण पाच वर्ष सेनेला झुलवत ठेवत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या भाजपला आज सत्तेसाठी सेनेचे पाय धरण आवश्यक झाले आहे आणि त्यामुळे सेनेची बारगेनिंग पावरही वाढली आहे त्यातच आघाडीच्या नेत्यांनी सुचक वक्तव्य करुन सेनेपुढे अनेक पर्याय खुले केले आहेत तसे पाहिले तर यावेळी ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री बनवणे शक्य असतांना सेना उपमुख्यमंत्री पद स्विकारेल का हाही एक प्रश्न आहे पण तसे झाल्यास भाजप कुठल्याही थराला जाऊ शकते आणि संख्याबळ वाढवण्यासाठी सेनेतील काही आमदारांना गळाला लाऊ शकते आता सत्तेसाठी भाजपचे कुठलाही विधिनिषेध पाळत नाही हे या निवडणुकीत दिसुन आले आहे. अश्या परीस्थितीत सेनेला आपले आमदार सांभाळून ठेवावे लागतील.अशावेळी सेना तडजोडीला तयार होईल का.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults