आदर्श संगोपन - भाग २

Submitted by सतीश कुमार on 24 October, 2019 - 07:25

आदर्श संगोपन - भाग २

माबोवरील माझ्या प्रिय वाचक आणि वाचकिणीनों, ( मालक आणि मालकीण ह्या धर्तीवर. खरं म्हणजे नायक आणि नायिका असेल तर मालक आणि मालिका असायला हवं. कृपया सूज्ञ वाचकांनी मादक आणि मादकिण असा नवा शब्द प्रयोग रूढ करावा का याचा विचार करावा.)

आदर्श संगोपन ह्या माझ्या लेखाला जो प्रतिसाद मिळाला त्याने अर्ध शतकाचा टप्पा पार करून सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. कुणी प्रतिसाद दिला, कुणी प्रसाद दिला, कुणी प्रतिक्रिया दिली तर कुणी शेरा दिला.
शेरा देणाऱ्या शेरनी दुर्गाष्टमी संपली तरीही अजून दुर्गाव तारामध्येच वावरत आहेत हे ही छान झाले. काहीं शेरखान होते पण ते जंजीर मधील दिलेर शेरखान नव्हते पण खान बंधू होते. या बंधूंना किती गांभीर्याने घ्यायचे हे तुम्हाला ठाऊक आहेच. एका निष्पाप काळवीटाला मारणं काय, माणसाला गाडी खाली चिरडणं काय किंवा देश सोडून जातो म्हणणं काय आणि आयपीएल सामन्यात वानखेडेवर गोंधळ घालणं काय. असो.

कुणाला तो लेख एकांगी वाटला, कुणी त्याचे दुटांगी धोतर केले, कुणाला थ्री डायमेंन्शनल वाटला तर कुणी ए जी, ओ जी, लो जी सुनोजी असे फोर जी च्या स्पीड मध्ये सुनावले.

कुणी बिलो बेल्ट म्हणत येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट ब्लॅक बेल्ट असा कराटे मधील नव्या बेल्टचा शोध लावला तर कुणी असंबद्ध आणि कै च्या कै असं म्हणून आपण रामायणातील कैकयी आहोत हे दाखवून दिले.

कुणी लोकां सांगे ब्रम्हज्ञान असं म्हंटलं आणि " अहं ब्रह्मास्मी" असं म्हणवून घ्यायची परवानगी दिली. अगदी गाईड मधला देव आनंद असल्याचा भास झाला " सिर्फ मै हूं, मै हूं, मै हूं " असं म्हणताना!

एका अमिताव बच्चन यांनी " तुमचं वय झालंय, वान प्रस्थाश्रमात जा असा सल्ला दिला. लवकरच असा सल्ला ते आपल्या मात्यापित्यांना देतील आणि त्यांची रवानगी ( कि बोळवणी ) वृध्दाश्रमात करतील याची मला खात्री आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर त्यांचीही तीच गत होईल हे ही खरे. जिनके अपने घर शीशेके होते है वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते चिनॉय सेठ....

कुणाला या चर्चेत आपले सासरे दिसले जे अज्जीबात ( यात जो ज्जी आहे त्याला कितीही जी लावा ) काळजी घेत नाहीत म्हणजे त्यांचा काहीं उपयोग नाही. वेगळया अर्थाने ते बिनकामाचे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. पण ते नक्कीच अगंबाई सासूबाई मधल्या आसावरीच्या सासऱ्या इतके तरकट नसतील. जेंव्हा स्वतःच्या भावाची बायको आपल्या सासऱ्याना बिनकामाचे असे म्हणते तेंव्हा मात्र यांना वाईट वाटतं.

कठोर आया आणि आधुनिक ललना या विधानावर बरीच चर्चा झाली. एक आई अशीच आपल्या लहान मुलाला घसरगुंडीच्या हवाली करून सेल फोन पहात बसली होती. तो मुलगा नंतर दुसऱ्या घसरगुंडी वर चढला, घसरला आणि पुढच्या क्षणी त्याची किंकाळी ऐकू आली. घसरगुंडी जिथे संपते तिथला पत्रा गंजून मोठं भोक पडलं होतं त्यात त्याची टाच घुसली होती आणि तो इतका कळवळत होता कि सहन होत नव्हतं. त्याच्या मागे घसरत येणारा मुलगा त्याच्यावर इतका जोरात आदळला होता कि या मुलाची टाच त्या पत्र्यातून काढतांना मांस लोंबत असलेलं दिसत होतं.

आमच्या सोसायटीतच एक आई फोन कानाला लावून बोलत फिरत असतानाच सायकल चालवणारी तिची पाच वर्षाची मुलगी समोरच्या भिंतीवर अशी धडकली कि तिचा हात सायकलीच्या स्पोक्स मध्ये घुसला आणि तो कसा सोडवला हे तिलाच ठाऊक.

तिसऱ्या मजल्यावर राहणारी एक आई फोनवर बोलत बाहेर आली, वाऱ्याने दरवाजा बंद झाला आणि लँच लागले. आत दोन वर्षाचा मुलगा. गॅसवर दूध ठेवले होते. डूप्लीकेट चावी नाही. नवरा तीस किलोमीटर वरील कंपनीत आणि डूप्लीकेट चावीवाला सोसायटीच्या बाहेर दोन किलोमीटर अंतरावर. तिने बाहेरून त्या मुलाला हाक मारायला सुरुवात केली. तो दाराजवळ आला आणि त्याने आतून कडी लावली. शेवटी दार फोडावे लागले.

या आईच्या जागी बाबा असते तर असे झाले नसते असे नव्हे. होऊ शकतं. पण मुलाला थोडसं लागलं, खरचटलं, पडलं तर तोंडातून पहिला शब्द " आई गं " असाच निघतो. आईची महती काय वर्णावी. माधव ज्युलियन यांची कविता प्रेम स्वरूप आई विसरता येईल काय?

बसमध्ये माझ्यासमोर बसलेली ललना या बद्दलही चर्चा झाली पण तीन तासात तिने तिच्या छोट्याकडे पाहिले ही नाही हे सांगायला वाईट वाटतं. माबोवर इथेच पोस्ट पार्टम अशी एक कथा श्रीमती सई केसकर या माझ्या भगिनींनी लिहिली आहे. त्यानी जे लिहिले आहे ते तंतोतंत खरे आहे. अशा पोस्ट पार्टमचा प्रभाव मूल सात आठ वर्षाचे होईपर्यंत राहतो का, हा एक संशोधनाचा विषय आहे.

पुरुष कठोर असतात त्याबद्दल का लिहिलं नाही असा एक सवाल होता. ( पुरुष जात्याच कठोर असतात असं धरून चाललं तर काय हरकत आहे? ) त्यांनी " मिस मेरी (१९५७) या मीना कुमारीच्या चित्रपटातील गाणं यू ट्यूब वर ऐकावं किंवा इथे वाचावं: ये मर्द बड़े दिल सर्द बड़े बेदर्द न धोखा खाना मीठी मीठी बतियों में भूल के न आना होते हैं छोटे दिल के लम्बी ज़ुबान वाले देते हैं माल खोटा ऊँची दुकान वाले छोटा मुँह और बात बड़ी ये है दस्तूर पुराना मीठी मीठी बतियों में भूल के न आना ... बात पते की है ये मानो जो मेरा कहना अच्छा है आग से तो दूर ही दूर रहना झूठी इनकी जात बड़ी ये है दस्तूर पुराना मीठी मीठी बतियों में भूल के न आना ...

आता मुहम्मद रफी साहेब यांचं ही म्हणणं ऐका-

Rafi version ये मर्द बड़े दिल सर्द बड़े बेदर्द चलो जी माना मर्दों का फिर भी ग़ुलाम है ज़माना ... दुनिया के साथ चलो नया ज़माना है ये मर्दों को दोश देना राग पुराना है ये झूठी इनकी जात कहो या कहो इन्हें दीवाना मर्दों का फिर भी ग़ुलाम है ज़माना ... गुस्सा गुरूर लड़ना नारी की भूल है ये ठण्डा मिजाज़ रखना पहला उसूल है ये बात पते की कहता हूँ तुम चाहे कहो दीवाना मर्दों का फिर भी ग़ुलाम है ज़माना ...

लेखांबद्दल बाकी जे शेरे होते ते दुर्लक्ष करण्यासारखे होते. अनुल्लेखा ने मारावे तसे. असो.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर मला जे दोन प्रतिसाद भावले त्यात एक श्रीमती स्वाती२ यांचा आणि दुसऱ्या श्रीमती सामो यांचा.

लेखाच्या शेवटी " यावर कुणी प्रकाश टाकेल काय?" असे मी म्हंटले होते. याचा खरा अर्थ श्रीमती स्वाती२ यांना उलगडला. त्यांनी प्रकाश टाकला आणि बाकीच्यांनी उजेड पाडला. श्रीमती स्वाती२ यांचा प्रतिसाद श्रीमती सामो म्हणतात तसं जतन करण्याजोगा आहे. अतिशय संयत शब्दात, अश्लाघ्य भाषा न वापरता, अगदी तार्किक दृष्टिकोनातून त्यांनी माझ्या लेखाचा परामर्ष घेतला, काहीं मुद्द्यांची भर घातली आणि स्वतःचा सुसंस्कृतपणा दाखवून दिला. ज्या माणसांना आपण पाहिलेलं नसतं त्यांच्या बद्दल आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. स्वाती नक्षत्राचा विचार केला तर तूळ रास असते म्हणजे बॅलन्सड व्ह्यू, स्वामी शुक्र असतो म्हणजे साैंदर्य आणि स्वाती नक्षत्रात पाणी शिंपल्यात पडलं तर मोती. खरा मोती. कल्चरड नव्हे. श्रीमती स्वाती या अशाच गुणांनी युक्त असतील, नक्कीच. त्यांचा प्रतिसाद वाचकांनी मुळातूनच वाचावा.

श्रीमती सामो यांचीही प्रतिक्रिया संयत आणि सुसंस्कृत शब्दात होती. संतप्त लोकांना शांत करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांचा कुठलाही लेख त्यांच्या व्यासंगाची साक्ष देतो. त्यांचीही प्रतिक्रिया मुळातून वाचावी.

काहींना या लेखाच्या निमित्ताने आई आठवली हे चांगले झाले.आई हा शब्दच मुळात इतका महान आहे कि त्याची तुलना इतर कशाशीच होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपली आई प्रिय असते ( अगं बाई सासूबाई मधला सोहम हा अपवाद ) आणि लग्न झालेल्या मुलीला तर आई म्हणजे दैवत. जेंव्हा आपली आई आठवते तेंव्हा मन विषण्ण: होते आणि तेंव्हा भालजी पेंढारकर यांनी म्हंटलेलं गाणं सहज ओठावर येतं. ह्या गाण्यातले शब्द पहा. " आई तुझी आठवण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते वात्सल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें हांक मारितो 'आई' 'आई', चुके लेकरूं सुन्या दिशाही तव बाळाची हांक माउली का नच कानीं येते.... " हे शब्द आपल्याला रडवतात.

काहींना या लेखांमुळे चांगले डे-केअर सेंटर मिळाले हे पण बरे झाले.

आदर्श संगोपन असं काही नसतं हे अगदी खरे आहे श्रीमती स्वाती२ म्हणतात तसं. मूल आनंदी असलं कि सगळं आलं.

मला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही प्रतिक्रिया आवडल्या. पु. ल. यांच्या पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्ली याचा प्रत्यय आला. तुम्हा सर्वांचा, आदर्श संगोपन हा लेख वाचल्या बद्दल ऋणी आहे.

ये भी क्या एहसान कम है देखिए ना आपका
हो रहा है हर तरफ चर्चा हमारा आपका
चांद में तो दाग है पर आपमें वो भी नहीं
चौदहवीं के चांद से बढ़कर है चेहरा आपका
इश्कमे ऐसे भी हम डूबे हुए हैं आपके
अपने चेहरे पे सदा होता हैं धोका आपका
चांद सूरज धूप सुबहा कहकशां तारे शमा
हर उजाले ने चुराया है उजाला आपका.

ही दीपावली तुम्हा सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जावो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

'आई तुझी आठवण येते, ' हे गाणं श्रीयुत भालचंद्र पेंढारकर यांनी गायिले आहे.
श्रीयुत भालजी पेंढारकर चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि गीतलेखक होते. गायक असल्याचे माहीत नाही.