माझ्या इच्छापूर्ती/बकेट्लिस्ट मधली एक गोष्ट : काहितरी चाकोरीबाहेर करायचं जे कधी केलं नाही. म्हणजे अगदी पहिल्यापासून श्रीगणेशा करायचा. आतापर्यंतच्या आयुष्याचा, शिक्षणाचा, जमवलेल्या गणगोतांचा, आधार न घेता. म्हणजे अगदी ५ वर्षांचा होणं शक्य नव्हतं पण समजा १०-१२ वी पास झालेला मी, काय काय करू शकेल ते.
इच्छापूर्ती/बकेट्लिस्ट मधली दुसरी गोष्टः इथे अमेरिकेत अमेरिकन लोकांना त्यांच्याच भाषेत हसवायचं. Standup comedy. पण कुठलाही भारतीय्/मराठी टेकू न घेता. समोर कुणीही ओळखीचा किंवा मदतीचा चेहरा नसताना Rowdy पब्लीक समोर टिच्चून उभं रहायचं.
तिसरी गोष्ट अजिबात बकेट्लिस्ट नाही. ती झाली नाही तर काहीही फरक पडला नसता मला. घरचा टीव्ही आता १२-१४ वर्षे जुना झाला आहे. हाय डेफिनिशन आहे पण आता गेले दोन वर्षे 4K चे वेध लागले आहेत. पण दरवर्षी अजून एखादे वर्षे थांबू ,किमती कमी होतील अशी वाट पाहतो आणि ती पाहताना काहीही चुकल्यासारखे वाटत नाही.
पण पहिल्या दोन गोष्टी काही डोक्यातून जाईनात. मी गेल्या वर्षापासून वेगवेगळ्या ओपन माईक्स , स्टोरीस्लॅम ला जाऊन काहीतरी सादर करायला लागलो. मित्रांना , घरच्यांना कुणालाच न सांगता. कारण आपण जोरात आपटलो तर काय अशी भिती होतीच. पण मला कुणाची (अगदी ओळखीच्या आश्वासक चेहर्याचीही) मदतही नको होती. काही वेळा उभ्या उभ्या विनोद (Standup comedy) , काही वेळा कथा कथन (Story telling), काही वेळा त्यांचं मिश्रण असे प्रयोग चालू होते. नाईट क्लब, बार, कॅफे, कॉमेडी क्लब, बुक स्टोअर्स, शाळा अशा ठिकाणी जाऊन प्रयोग करू लागलो. काही वेळा खूप जोरात आपटलो. पण प्रेक्षकात कुणीच ओळखीचे नसल्याने पुन्हा नव्याने प्र॑यत्न करणे सोपे गेले.
बोस्टनच्या रॉझलिंडेल भागातला एक प्रयोग विशेष लक्षात आहे. आम्ही सादर करणारे १२ जण होतो. आणि प्रेक्षक होते ५. खूप कष्ट करून माझ्या विनोदांनी त्यांच्या चेहर्यावरची एक माशीही हलली नाही. पण अशा अनुभवातून गेल्यामुळे आत्मविश्वासही वाढत होता.
कथा कथन त्या मानाने सोपे वाटले. माझ्या प्रकृतीला ते जास्त जमले. अमेरिकन उभ्या उभ्या विनोद चांगलाच अवघड. त्यात सारखे चार अक्षरी शब्द आणणे मला फारसे आवडत नाही आणि पेलवत ही नाही. हे म्हणजे एका काडी पैलवानाने सारखे शड्डू ठोकून आवाज करण्यासारखे वाटायचे. त्यात उभ्या उभ्या विनोदासाठी प्रचंड स्पर्धा आहे. काही ओपन माईकमधे तीन , साडेतीन तास थांबल्यावर तुम्हाला ३ मिनिटांचा वेळ मिळतो. त्यात नशीब चांगले असेल तर प्रेक्षक अजून शिल्लक असतात , नाहीतर १-२ प्रेक्षकांसमोर सादर करायची सवय करुन घ्यावी लागते. शेवटी कथाकथन करायचे पण मधून मधून उभ्या उभ्या विनोद पेरायचे ही जातकुळी थोडी आपलीशी वाटू लागली.
काही महिन्यांपूर्वी केंब्रीजमधे Club Passim मधे एक गोष्ट सादर केली. बर्यापैकी चांगली झाली असावी. एक बाई भेटून गेल्या. एका चिठोर्यावर त्यांचं नाव आणि फोन नं लिहिला, मला दिला आणि म्हणाल्या "You should be on national TV". मी त्यांना "तुम्हाला मीच सापडलो का पाय खेचायला" अशा अर्थाचे काहीतरी म्हणालो. पण तरी नंतर त्यांना फोन केला. त्या म्हणाल्या , "तुझी तयारी आहे का नॅशनल टीव्ही वर प्राईम टाईम मधे सादर करण्याची? " मी कशाला नाही म्हणतोय ! पुढे म्हणाल्या, "७ मार्च, २०१९ , रेकॉर्डींग साठी राखून ठेव "
पण मग पुढे काहीच झाले नाही. म्हटलं या बाई गंडवतात की काय मला. कारण त्यांच्याशी झालेलं बोलणं या पलिकडे त्यांनी मला लेखी काहीच दिलं नव्हतं. मी थोडा शोध घेतला तर बाई खरोखरंच टीव्ही प्रोड्यूसर होत्या. पण मला हे ही कळालं की त्या जो काही कार्यक्रम करतात त्यात निवड होण्याची प्रक्रिया असते, वेगवेगळ्या चाचण्यातून , टप्प्यातून जावे लागते मगंच तुमची वर्णी लागते. पण मला असे काहीच बोलावणे आले नव्हते.
मी परत त्यांना फोन केला. तेंव्हा म्हणाल्या " अरे तुझा कार्यक्रम मी प्रत्यक्ष पाहीला आहे. तुला ऑडीशन वगैरे काही नको. तुझी निवड झालीय". तरी माझा काही पूर्ण विश्वास बसला नव्हता.
जानेवारी काही दिवस आणि सगळा फेब्रूवारी भारतात होतो. वडील हॉस्पीटलमधे होते. त्यांच्याबरोबर पूर्णवेळ तिथेच असायचो. ७ मार्च पर्यंत परत जाता येईलच याची खात्री नव्हती. त्यातंच फेब्रूवारीच्या शेवटच्या आठवड्यात, पहिल्यांदाच, टीव्ही चॅनलकडून ईमेल आली. त्यांना माझ्या आवाजात गोष्टीचे रेकॉर्डींग हवे होते (audio). हॉस्पीटल मधे ते करणे खूप अवघड होते. शेवटी एका दिवशी रात्री १ वाजता थोडी शांतता मिळाली आणि माझ्या फोनवर रेकॉर्डींग करून पाठवले. ७ मार्चचा दिवस जवळ आला होता. टीव्ही चॅनलकडून आता अधिक माहीती देणार्या ईमेल सुरु झाल्या.
वडीलांची तब्बेत थोडी सुधारली. त्यांना डिसचार्ज मिळाला. त्यांच्या बरोबर काही दिवस घरी थांबून मी ३ मार्चला बॉस्टनला परत आलो. मी घरी पोहोचलो इतके वडीलांशी बोललो. अर्ध्या तासाने भावाचा फोन आला , वडील गेले. प्रोड्यूसर बाईंना कळवले मी काही रेकॉर्डींग साठी येऊन शकत नाही. आणि लगेच मिळेल त्या विमानाने परत भारतात गेलो.
काही दिवस भारतात थांबून परत बॉस्टनला आलो. आयुष्य सुरु होतेच. मी रेकॉर्डींग वगैरे विसरून गेलो. कारण प्रत्येक एपीसोडची डेडलाईन असते ती जमली तरच तुम्ही त्यात भाग घेता. मे च्या शेवटच्या आठवड्यात प्रोड्यूसर बाईंचा अचानक फोन आला. ६ जूनला परत रेकॉर्डींगला जमेल का, वेगळ्या एपीसोड साठी? मी तयारच होतो. पण २७ मे पासून मला खूप खोकला आणि अॅलर्जीचा त्रास सुरु झाला. नेहमीच्या औषधांमुळे काहीच फरक पडेना. म्हणून डॉ. ने १ जून ला औषध बदलून दिले. त्याचा साईड इफेक्ट म्हणून माझा आवाज पूर्ण बसला. आता परत एकदा रेकॉर्डींगची संधी हुकणार असे वाटू लागले. सुदैवाने डॉ ने नवी औषध बंद केले. तेंव्हा ६ जूनला ८०% आवाज परत आला.
मग पुढे काय झाले?
टीव्ही प्रोड्यूसर बाईंचे बोल खरे ठरणार असे दिसते आहे. सोमवार , २८ ऑ़क्टोबर २०१९ ला, बॉस्टन वेळेप्रमाणे रात्री ९:३० वाजता , प्राईम टाईम मधे अमेरिकन नॅशनल टिव्ही वर माझ्या कथाकथनाचे प्रक्षेपण आहे. कथाकथनाच्या अगोदर माझी छोटीशी मुलाखत आहे त्यात मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा उल्लेख आहे.
तुम्ही अमेरिकेत असलात तर या दुव्यावर जाऊन , तुमचा झीप कोड दिलात तर तुमच्या जवळ कुठल्या चॅनेलवर हे पाहता येईल याची माहीती मिळेल ( सहसा तुमचे PBS station) इथे सध्या एक झलक आहे.
https://worldchannel.org/show/stories-stage/
नाहीतर (आणि जगातल्या कुणालाही) खालील लिंकवर जाऊन २८ ऑ़क्टोबर २०१९ ला, बॉस्टन वेळेप्रमाणे रात्री ९:३० वाजता किंवा २९ ऑ़क्टोबर २०१९ ला भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ७:०० वाजता कथाकथन पाहता येईल. इथे सध्या दुसरी झलक आहे,
https://worldchannel.org/episode/sfts-summertime/
आणि हो. या आठवड्यात घरी नवीन 4K TV आला आहे. दिवाळी जवळ असली तरी तो दिवाळीसाठी घेतला नाहीये हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असलेच
अभिनंदन अजय. खूप अभिनव बकेट
अभिनंदन अजय. खूप अभिनव बकेट लिस्ट.
TV साठी पण अभिनंदन.
Sorry to hear about your father.
अरे वा! खूप खूप अभिनंदन, अजय.
अरे वा! खूप खूप अभिनंदन, अजय. कार्यक्रम नक्की पाहणार. झलक तरी मस्तच वाटतेय.
वडिलांबद्दल वाचून वाईट वाटलं. त्यांना मनापासून श्रद्धांजली.
>>> Submitted by रूनी पॉटर
>>> Submitted by रूनी पॉटर on 23 October, 2019 - 09:39
या कोण बाई? नाव ऐकल्यासारखं वाटतंय...
जबरीच अजय !! खूप अभिनंदन !!
जबरीच अजय !! खूप अभिनंदन !!
कार्यक्रम नक्की बघणार.
तुमच्या वडीलांबद्दल माहीत नव्हतं. त्यांना श्रद्धांजली.
भारीच की! WGBH बोस्टन चे
भारीच की! WGBH बोस्टन चे कार्यक्रम नेहेमी ऐकतो रेडिओ वर, आणि आवडतात. हा शो पण अनेकदा ऐकला आहे मला वाटतं.
नक्की ऐकेन/ बघेन.
पुढच्या बकेट लिस्टीत टेरी ग्रोस कडून मुलाखत add करा, आणि ते लवकर होवो
वडिलांना श्रध्दांजली.
भारीच. हार्दिक अभिनंदन!
भारीच. हार्दिक अभिनंदन!
तुमच्या वडिलांना श्रद्धांजली.
शुभेच्छा. निरीक्षण पटलं.
शुभेच्छा. निरीक्षण पटलं. श्रोते वेगळे. हसवणं कठीण.
अरे वा अभिनंदन. बघणार.
अरे वा अभिनंदन. बघणार.
अभिनंदन अजय !! चिकाटीने
अभिनंदन अजय !! चिकाटीने स्टॅण्ड अप सुरू ठेवून लोकांना हसवणे हे खुपच अवघड काम साध्य केले !! सलाम.
अभिनंदन!
अभिनंदन!
अजय , एकदम भारी आहात तुम्ही.
अजय , एकदम भारी आहात तुम्ही. सतत काहीतरी नविन प्रयोग चालु असतात तुमचे. नक्की बघणार .
महाराष्टाचे जेरी साईनफिल्ड म्हणुन आता बॅनर तयार करायला पाहिजे.
खतरनाक !!
खतरनाक !!
अमेरीकन टीव्हीवर एक भारतीय, तो देखील एक मराठी, तो देखील आपल्या मायबोलीवरचा मित्रयादीतला... खतरनाक!
मला मुळातच हा प्रकार आवडतो कारण हा माझ्या बापालाही न जमणारा आहे. फक्त सकाळी सातला माझे आजोबाही कधी उठल्याचे आठवत नसल्याने तेव्हा बघणे अवघड आहे. रिपीट टेलीकास्ट वा यूट्यूब लिंक रेकॉर्डींग वगैरे काही जमवा नंतर बघायला..
अभिनंदन |
अभिनंदन |
बादवे तुमची बकेट लिस्ट क्रमांक एक आणि दोन सेमच नाही का?
अभिनंदन! इथे पुढे कधी लिंक
अभिनंदन! इथे पुढे कधी लिंक वगैरे देऊ शकाल का कार्यक्रमाची?
वडिलांबद्दल वाचून वाईट वाटले. वर मेधाने म्हटले आहे तसे पितृशोक कधीच न भरणारी जखम आहे, हे खरे. त्या दु:खातून सावरण्यासाठी शुभेच्छा.
मस्त च रे अजय ! तुझ्या
मस्त च रे अजय ! तुझ्या व्यक्तिमत्वाला एकदम साजेसे आहे. कार्यक्रमासाठी मन:पूर्वक अभिनंदन !!!
सर्वप्रथम वडिलांच्या
सर्वप्रथम वडिलांच्या निधनाबद्दल तुमचं सांत्वन!
वेगळाच प्रवास आहे तुमचा! शुभेच्छा!! कार्यक्रम नक्की बघणार.
अभिनन्दन!
अभिनन्दन!
अजय धन्य आहेस, अशी बकेत
अजय धन्य आहेस, अशी बकेत लिस्टचा विचारही करणे कौतुकास्पद आहे! ब्राव्हो
मस्त! मराठी माणसांमध्ये
मस्त! मराठी माणसांमध्ये (कम्युनिटी अॅट लार्ज) खुप पोटेंशियल आहे तुम्हाला मटिरियल पुरवण्याचं. शुभेच्छा!!
मनातली एक ईच्छा पूर्ण करायला
मनातली एक ईच्छा पूर्ण करायला लोकल क्लब, कॅफेमध्ये निघालेले तुम्ही थेट नॅशनल टेलिव्हिजनवरच जाऊन पोहोचलात.. True passion and great achievement. ते म्हणतात ना True passion can not die with circumstances. Way to go Ajay!
story slam प्रकार अलिकडेच लाईव अनुभवला. टोस्टमास्टर प्रोग्राम फॉलो करणारा एक फिलिपिनो कलिग खूप ईंट्रेस्टेड आहे परफॉर्म करण्यात.
---
पाचव्या ईयत्तेत क्रश...
म्हणजे तुम्ही मास्टर असल्यापासून सगळ्यांचे मास्तर आहात तर.
मित्रांना , घरच्यांना कुणालाच न सांगता.>> तरीच ईथे लोक, अॅडमिनचं लक्ष नाही हल्ली वगैरे लिहितात सारखं.
अभिनंदन
अभिनंदन
पितृशोक म्हणजे कधी न भरुन येणारी जखम आहे. शेवटच्या दिवसात त्यांच्या सोबत रहायला मिळालं हे भाग्य ! तुम्हाला आणि तुमच्या भावंडांना या दु:खातून सावरण्याकरता शुभेच्छा >>> +१
अभिनंदन! फेसबुक वर एक छोटी
अभिनंदन! फेसबुक वर एक छोटी क्लिप पाहिली आत्ता. पूर्ण बघण्यात नक्कीच इण्टरेस्ट आहे. चेक करतो वरच्या लिन्कवर.
sorry to hear about your father.
पितृछत्र हरपले त्याबद्दल वाईट
पितृछत्र हरपले त्याबद्दल वाईट वाटले, कारण तो पण एक मानसीक आधार असतो.
पण तुमच्या प्रयोगाकरता मात्र अनेक शुभेच्छा आणी अभिनंदन !
Wow! U r inspiring!
Wow! U r inspiring!
हार्दिक अभिनंदन अजय!!!
हार्दिक अभिनंदन अजय!!!
हार्दिक अभिनंदन...बकेटलिस्टचा
हार्दिक अभिनंदन...बकेटलिस्टचा हा प्रवास खूपच हटके आहे.
वडिलांबद्दल वाचून वाईट वाटले..ओम शांती.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
वा वा..... मनापासुन अभिनंदन.
वा वा..... मनापासुन अभिनंदन. आणि खूप शुभेच्छा.
अभिनंदन अजय! फेसबुक वर क्लिप
अभिनंदन अजय! फेसबुक वर क्लिप पाहिली, कार्यक्रम नक्की बघणार.
Sorry to hear about your father
Pages