एक मस्त फ्रिलचा शुभ्र परीचा फ्रॉक!

Submitted by mrsbarve on 21 October, 2019 - 02:10

बघता बघता छकुली सहा महिन्याची झाली. कुरळे कुरळे केस,गोरापान रंग मोठे पाणीदार डोळे,आणि एकदम गुटगुटीत !त्यामुळे ती अगदी एकदम गोंडस ,गोडुली दिसायची . आता भारतात सगळ्या मावशा,माम्या,आत्या,आज्ज्या,आणि बाकीच्या सगळ्यांनाच बाळाला कधी एकदा पाहू असे झाले होते. सवीलाही कधी एकदा आपलं गोड गोंडस बाळ सगळ्यांपुढे मिरवतो असे होऊन गेलेले. सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा छकुलीवर पडतील आणि मग तिचे नाक, डोळे, कपडे, बूट सग्गळं कसं त्या बायकांच्या बोलण्याचा विषय होऊन जातील हेतिला पक्के ठाऊक होते. त्या शिवाय इतर चुलत मावस आते भावंडांच्या छोट्या बाळांची आणि छकुलीची कम्पॅरिझन होणार हेही तिला माहित होत .अगदी कोणी तोंडावर बोलणार नाहीत पण कोण कसे कोण कसे हे पक्के ठाऊक होत तिला.

छकुलीचा पापा घेत तीन ठरवलं ,आजच मेसीज मधून बाळासाठी शॉपिंग करायचं !संध्याकाळी नवरा बाळ आणि ती यांची वरात मॉल मध्ये ! सुंदर सुंदर ड्रेसेस मधून एक मस्त फ्रिलचा शुभ्र परीचा फ्रॉक, मॅचिंग शूज ,मऊ मऊ फ्रिलचे मोजे, आणि मॅचिंग हेअरबॅन्ड अशी तब्बल सत्तरेक डॉलर्सची शॉपिंग करून ती खुशीत घरी परतली.

हळू हळू पॅकिंग सुरु झालं नि तिचा भारतात जायचा दिवस उजाडला. तिने बाळाला आंघोळ घातली. मस्त नवा नवा फ्रॉक घातला.मोजे ,शूज,हेअरबॅन्ड सग्गळं घातलं .छकुली ईतकी सुंदर दिसत होती !सवि खूप खुश झाली, एअरपोर्ट वर न्यायला येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना हे बाळ कधी एकदा उचलूनघेऊ असे होणार या विचाराने ती खूप खुश झाली..
नवरा एअरपोर्ट पर्यंत पोचवायला आला होता .एअरपोर्ट कडे जाता जाता छकुली थकून गाडीत झोपून गेली. सामान संभाळत नवरा चेक इन पर्यंत आला एव्हढ्यात ..... गोड छकुलीने एक जोरदार "ढं "केलं ! आणि बघता बघता .......आसमंत गोड़ छकुलीच्या नॉट सो गोड़ ढं च्या वासाने भरून गेला!! तिच्या हाताला ओले ओले लागले आणि डायपर ने डाय झाल्याची कबुली दिली.

आरारारा ,ना भूतो ना भविष्यती अशी छकुलीने पू पू करून ठेवली होती,बाथरूम कडे पोचता पोचता मोजे आणि ड्रेस पू पूमय झालेला!

कसा बसा तो डायपर बदलून ,मग तो फ्रॉक ...... शुभ्र ,परीचा,टॉप ऑफ द लाईन वगैरे वगैरे आता फुल्ल ऑफ पू पू झाला होता !

मोजे आणि बूटांचीही तीच अवस्था ! ते सगळं बदलून तिने छकुलीला झबलं घातलं ... पोट साफ झाल्याने आणि डायपर बदलला गेल्याने छकुली छान हसत होती. प्लास्टिक बॅग मधला तो ऐवज इतका वास मारत होता कि तो विमानात नेणे शक्य न्हवते. सविने नवऱ्याला तो ऐवज देऊन घरी जाऊन लॉउंड्री कर म्हणून खूप आर्जवे केली पण त्याने साफ नकार दिला आणि तो सुंदर परीचा फ्रिलचा फ्रॉक एअरपोर्ट च्या बाथरूम मधील बंद ट्रॅश मध्ये टाकून दिला!

सविला खूप हळहळ वाटत होती आणि छकुली दोन्ही पायाचे अंगठे हातात धरून गोड़ गोंडस हसत होती!

Group content visibility: 
Use group defaults

अरे पण फ्रॉ क इंडियात उतरताना घालायचा ना. किंवा घरी लोके आल्यावर?! इथून निघताना कशाला वेस्ट केला. नवी माता त्यामुळे माहीत नसावे कथेतल्या पात्राला. ही ही मस्त आहे कहानी मे ट्विस्ट.

अरे पण फ्रॉ क इंडियात उतरताना घालायचा ना. किंवा घरी लोके आल्यावर?! इथून निघताना कशाला वेस्ट केला.>>>>> बरोबर. हेच वाटलं.
पण मुलं उत्साही आईचा असा पचका करतात खरं Happy

Lol आई नवीन नवीन आहे म्हणूनच प्रवासात असा सुंदर फ्रॉक घातला. असल्या अनुभवांनी तर शहाणपण येतं Wink

Lol आई नवीन नवीन आहे म्हणूनच प्रवासात असा सुंदर फ्रॉक घातला>>>>अगदी अगदी,आता शहाणी झालेली आई बाळाला प्रवासात फक्त हलकं फुलक आणि आजिबात न टोचणारं ,सैलच काहीतरी अडकवेल यापुढे,बाकी मेक अप आणि परी बिरी चे ड्रेस फारतर डायरेक्ट घरी पोचायच्या 5 7 min अगोदर

लहान मुलं असं करतात खरं.
फ्रॉक छान छान येत राहतीलच.छकुली पोट साफ झाल्याने निवांत झोपून किंवा आनंदात खेळत प्रवास करेल.

ही आई जास्त करून अमेरिके तून मुम्बईस उतरणार त्यात पुढे पुणे चा कॅब प्र्वास. ह्यात आपले साधे जीन्स टी शर्ट कपडे पण खराब होतात व एक प्रकारचा मळका लुक लगेच येतो. त्या आधी त्या बाळाला इतके ओव्हर फीड केले. नक्की नवमाता कदाचित पोस्ट पार्टम डिप्रेशन मध्ये सुद्धा असेल. आता शिकेल हळू हळू तिचे पात्र कथे मधले.

नातवंडांच्या शी शूचे कौतूक असा एक ग्रूप करायला पाहिजे किंवा वर डिस्क्लेमर पाहिजे
काय होते जास्त करून माबो लंच टाइम मध्ये उघडून नवे लेख वाचले जातात जेवताना त्यात असे उल्लेख आले की जरा कसे तरी होते. अँड यु कां ट अन सी इट.

रच्या कने असले फ्रॉक मला जाम आव्ड तात. व शिवता पण येतात. म्हणूनच मी उघडले बाफ नवे काहीतरी असेल म्हणून. पिंटरेस्ट वर असे मस्त फ्रॉक चे पॅ टर्न खूपच बघितले जातात रोज. मेसीज, लॉरा अ‍ॅशले, व एक दोन ब्राझिलीअन बोर्ड्स मस्त आहेत अश्या ड्रेसेसचे.

नवीन कपडे सहसा कडक असतात. प्रवासात मुलांना मऊ, वापरलेल्या सुती कपड्यात न्यावे.
पण कथा मजेशीर आहे मात्र Happy

माझ्या आत्याची मुलगी होती.... काळी... तीच ही नाव छकुली होत. मी तिला काळी काळी म्हणून चिडवायचो....ती आता माझी बायको आहे

>>>अरे पण फ्रॉ क इंडियात उतरताना घालायचा ना. किंवा घरी लोके आल्यावर?! इथून निघताना कशाला वेस्ट केला. नवी माता त्यामुळे माहीत नसावे कथेतल्या पात्राला>>+११
जेंव्हा नवीन फ्रॉक घातला वाचले तेंव्हा मलाही असेच वाटले... पण छान आहे कथा .. बिच्चारी सवी